legal will esakal
साप्ताहिक

Legal Will : तरुणवयातच मृत्युपत्र करावं का?

मित्रमंडळींशी बोलल्यावर त्यांनी ‘अजून लहान आहेस. आतापासून कशाला?’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या...

साप्ताहिक टीम

अॅड. सायली गानू- दाबके

इच्छापत्र, मृत्युपत्र, विल ह्या शब्दांचीदेखील अनेकांना धास्ती वाटते. इच्छापत्र करण्याबाबत अनेकांच्या मनात अनेक शंकाही असतात.

माझे वय ४२ वर्षे आहे. माझे लग्न झाले असून आम्हाला दोन मुले आहेत. मुले वयाने लहान आहेत. माझ्या काही गुंतवणुकी आहेत व स्वतःचे घर आहे. मला कुठलाही आजार नाही. इच्छापत्र करण्याची माझी इच्छा आहे.

याबद्दल मित्रमंडळींशी बोलल्यावर त्यांनी ‘अजून लहान आहेस. आतापासून कशाला?’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तरी विल करण्याच्या कायद्यानुसार लवकर विल करण्यावर काही बंधने आहेत का? असल्यास कोणती? विल कधी करावे?

विल ज्याला मराठीत मृत्युपत्र किंवा इच्छापत्र म्हटले जाते हा कायद्यानुसार सज्ञान असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला करता येण्याजोगा दस्त आहे.

स्वतःच्या मृत्यूनंतर स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वतःच्या मालकीचे मालमत्तांचे वाटप कसे व्हावे याबद्दल सूचना देणारा हा दस्त असतो.

फक्त वयस्कर किंवा खूप आजारी व्यक्तींनी विल करावे /एका विशिष्ट वयानंतरच विल करावे अशी कुठलीही कायदेशीर तरतूद नाही.

कायद्यानुसार कोणतीही सज्ञान व्यक्ती इच्छापत्र करू शकते. इच्छापत्र करताना इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीची मानसिक क्षमता/ समज महत्त्वाची असते त्यामुळे खरेतर कुठलाही आजार, व्याधी, अडचण वा समस्या (आर्थिक अथवा इतर) नसताना विल करणे उत्तम.

म्हणजे मग विल मानसिक अथवा अन्य कुठल्या दबावाखाली केले होते का, याप्रकारच्या शंका नंतर उद्‌भवण्याची शक्यता कमी होते.

त्यामुळे तुम्हाला तुमच्या मालमत्तांचे वाटप विशिष्ट प्रकारे करायचे असेल तर आत्तादेखील विल करायला काहीच हरकत नाही. मित्रमंडळी/ नातेवाइकांच्या सल्ल्यांपेक्षा वकिलांचा सल्ला घेऊन तुमच्या इच्छेप्रमाणे लवकरात लवकर विल करून ठेवायला हरकत नाही.

माझे वय ५५ वर्षे आहे. मी सात – आठ वर्षांपूर्वी एक विल केले होते पण ते रजिस्टर केले नव्हते. आता मी माझ्या काही मिळकती विकल्या आहेत.

तसेच मला त्या विलमध्ये लिहिल्यापेक्षा काही वेगळ्या लोकांनाही काही गोष्टी देण्याची इच्छा आहे. आता मला नवीन विल करता येईल का? ही प्रक्रिया कितपत किचकट असते?

तुम्ही तुमचे इच्छापत्र तुमच्या इच्छेनुसार कितीही वेळा बदलू शकता. नव्या इच्छापत्रात तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे नव्या लाभार्थींची नावे लिहू शकता, लाभार्थी बदलू शकता, लाभार्थी तेच ठेवून त्यांना मिळणारे लाभ बदलू शकता, तसेच मालमत्तांमधील बदलांनुसार नव्या मालमत्तांच्या वाटपाबद्दल तरतुदी करू शकता.

त्यामुळे आधी विल केलेले नसताना पूर्णपणे नवीनच विल केल्याप्रमाणे तुम्ही हव्या त्या तरतुदी नव्या विलमध्ये करू शकता. फक्त नवीन इच्छापत्र करताना जुन्या इच्छापत्राचा/ पत्रांचा तारखेनिशी संदर्भ देऊन ते रद्द केले आहे, असे त्या नव्या इच्छापत्रात स्पष्टपणे नमूद करावे.

जुने विल रद्द करून नवीन विल करण्याची प्रक्रिया अजिबात किचकट नाही. तुमचे वाटपाबद्दलचे विचार निश्चित असतील तर ही प्रक्रिया वेळखाऊदेखील नाही.

रजिस्टर केलेले विल बदलायला नवे विलदेखील रजिस्टरच करावे लागते. परंतु तुमच्या बाबतीत आधीचे विल रजिस्टर नसल्याने नवे विलदेखील रजिस्टर करणे बंधनकारक नाही.

जेव्हा ४० ते ५० वयोगटातील व्यक्तींनी विल केलेले असते तेव्हा त्यांनी दर पाच वर्षांनी स्वतःचे मिळकतीचा, परिस्थितीचा व केलेल्या विलमधील तरतुदींचा आढावा घेऊन नवे विल करावे लागणार आहे का, याचा विचार करावा तसेच आयुष्यात एखादी मोठी घटना घडली किंवा एखाद्या लाभार्थ्याचा मृत्यू झाला किंवा मालमत्तांमध्ये खूप बदल झाले तर नक्कीच विल बदलावे व नवे विल करावे.

महत्त्वाचेः या लेखमालेत प्रश्‍नकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना, त्यांनीच दिलेल्या माहितीच्या आधारावर उत्तरे देण्याचा प्रयत्न आहे. तरी या उत्तरांना कायदेशीर सल्ला समजू नये. या उत्तरांच्या आधाराने कुठलेही कायदेशीर पाऊल उचलू नये. आपले प्रश्न व शंकांबद्दल वकिलांचा सल्ला घेऊनच योग्य ती कृती करावी.

--------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT