mehandi Esakal
साप्ताहिक

Mehandi Design Types : मेंदीचे विविध प्रकार

Different Mehndi Designs : राजस्थानी, अरेबियन मेंदी, फुलांची साखळी, मॅजिक मेंदी किंवा चंदेरी मेंदी, जरदोशी मेंदी, कॉपर सिल्वर किंवा गोल्डन स्पार्कल मेंदी, ब्रश पेंटिंग मीनाकारी मेंदी, नेल पॉलिश मेंदी (नेल आर्ट), स्टिकर मेंदी

साप्ताहिक टीम

राजश्री बिनायकिया

राजस्थानी मेंदी

ही मेंदी हाताच्या कोपरापासून बोटापर्यंत पुढे-मागे काढली जाते. या मेंदीत दुल्हा-दुल्हन, तुतारीवाला, गणपती, कलश, पाने-फुले, मोर, सनई, तोरण असे नानाविध आकार काढले जातात. नक्षीने आजूबाजूची सजावट पूर्ण करतात.

फुलांची साखळी

मनगटाभोवती सारख्या अंतरावर ५-६ बिंदू काढून प्रत्येक बिंदूभोवती भरीव फुले काढतात. नंतर सर्व फुले फुलांच्या दांड्यासारख्या नाजूक भरीव नागमोडी रेषांनी जोडतात. प्रत्येक दांडीभोवती नाजूक भरीव पाने काढतात.

अरेबियन मेंदी

अरेबिक डिझाईनमध्ये नक्षीच्या रेषा जाड असतात. भरीव मेंदीमध्ये हातावर वेगवेगळे आकार काढून त्यामध्ये मेंदीची नक्षी काढता येते. शेप्स‌मध्ये मेंदीने गडद, फिके असे शेडिंगही करतात.

मॅजिक मेंदी किंवा चंदेरी मेंदी

चंदेरी रंगाने सर्व नक्षीला आउटलाइन काढली जाते, प्रत्येक छोटा भाग चंदेरीच पाहिजे असे नाही. मेंदीचे मूळ सौंदर्य न झाकता फक्त महत्त्वाच्या काहीच रेषा चंदेरी कराव्यात. हात अत्यंत स्थिर असावा. ही मेंदी ऐनवेळी काढली जाते. यात स्पार्कलचे वेगवेगळे रंग वापरले जातात, शिवाय कुंदन, लेस, मणी, स्टोन चिकटवता येतात.

leg mehandi design

जरदोशी मेंदी

या प्रकारात मेंदीबरोबरच विविध मण्यांचा वापर केला जातो. शिवाय टिकल्याही वापरल्या जातात. कपड्यांच्या रंगानुसार मॅचिंग मणीसुद्धा वापरले जातात.

स्टिकर मेंदी

यामध्ये गोल्डन, सिल्व्हर किंवा इतर कलरचे मेंदी स्टिकर हातावर लावले जातात. हा झटपट मेंदीचा प्रकार आहे.

ब्लॅक मेंदी किंवा डाय मेंदी

ही मेंदी दिसायला खूप गडद व काळ्या रंगाची दिसते. पण या प्रकारची मेंदी सर्वांनाच सूट होईल असे नाही. ही मेंदी लावायची असल्यास प्रथम बाजारातून डाय मेंदी पावडर आणून गुलाब पाण्यात मिक्स करावी. नंतर हाताच्या कोपऱ्यावर थोडीशी मेंदी लावून बघावी. जर खाज सुटत असेल तर ती लावू नये. या मेंदीने प्रथम हातावर हवे ते आकार काढून घ्यावेत नंतर त्या आकारात साध्या मेंदीने नक्षी काढावी किंवा शेडिंग करावे.

कॉपर सिल्वर किंवा गोल्डन स्पार्कल मेंदी

या मेंदीसाठी डाय मेंदीचा वापर करावा. ॲलर्जी असल्यास साध्या मेंदीचा वापर करावा. ही मेंदी काढताना अरेबिक डिझाईन काढावे, नंतर डिझाईनचा प्रत्येक आकार सिल्वर, गोल्डन किंवा कॉपर चमकीने भरून घ्यावा किंवा शेडिंग करावे. ही मेंदी ऐनवेळी काढावी, कारण पाण्यात हात घातला तर चमकी निघून जाते.

figure mehndi design

हिरा-मोती मेंदी

नक्षी काढून झाल्यानंतर किंवा मेंदीची नक्षी ओली असतानाच चमचमणारे खडे जडवले जातात. शिवाय रंगीबेरंगी टिकल्याही लावल्या जातात, त्यामुळे नक्षीमध्ये नावीन्यता येते. नक्षी काढून झाल्यावर खडे किंवा टिकल्या लावायच्या असतील, तर ओली मेंदी त्वचेला जास्त वेळ टिकून राहावी म्हणून टिकल्या व खडे लावण्यापूर्वी लिंबू व साखरेचे पाणी भरपूर लावावे.

नेल पॉलिश मेंदी (नेल आर्ट)

हातावर नेल पॉलिशच्या साहाय्याने नक्षी काढली जाते. खऱ्या मेंदीचा कुठेही वापर होत नाही. नखांवर मेंदी न लावता नेल पॉलिशने सुंदर चित्र व नक्षीकामही केले जाते. नखांना मोती, टिकल्या, कुंदन इत्यादींनी सजवले जाते. एकाच वेळी दोन व तीन रंगाच्या नेल पॉलिशनी आडव्या, तिरप्या रेषा ओढून नखांना सुशोभित करता येते.

ब्रश पेंटिंग मीनाकारी मेंदी

या प्रकारात विविध मण्यामण्यांची रंगीबेरंगी ज्वेलरी वापरून आधुनिक हायटेक युगात शोभतील अशा नक्षी काढल्या जातात. यात मेंदीचा वापर होत नाही, वेगवेगळ्या रंगांचा व ब्रशचा वापर केला जातो. रंग, दागिने, नक्षी यांचा समतोल ठेवला जातो. शिवाय नक्षीचे रंग दागिन्यांशी मिळतेजुळते असतात.

टॅटू

मेंदी अगदी तात्पुरत्या काळासाठी हवी असेल तर रंगणारी मेंदी वापरून चालत नाही. अशावेळी बाजारात तयार मेंदीचे टॅटू वापरता येतात. हे टॅटू बऱ्याच रंगात म्हणजे अगदी सॉफ्ट पेस्टल शेडपासून ते अगदी गडद काळ्या, करड्या रंगातही उपलब्ध असतात. शिवाय डिझाईनचेही असंख्य प्रकार पाहायला मिळतात. या टॅटूंवर असणाऱ्या चंदेरी रंगाच्या चमकीमुळे विशेषतः रात्रीच्या लग्नासमारंभांना हे फारच खुलून दिसतात, शिवाय काम झाले की लगेच काढून टाकता येतात.

(राजश्री बिनायकिया ललित लेखिका व कवयित्री आहेत.)

------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT