millet food  esakal
साप्ताहिक

Millet: जाणून घ्या कोणती आहेत भरडधान्य आणि त्याचे पदार्थ

सकाळ डिजिटल टीम

मृणाल तुळपुळे

लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत आणि विविध शारीरिक आजार असणाऱ्यांसाठी भरडधान्यापासून केलेले पदार्थ खाणे लाभदायक ठरते. ह्या धान्यांत भरपूर प्रमाणात खनिजे, कॅल्शियम व प्रथिने असतात. त्यांचे सेवन शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. ही धान्ये म्हणजे पोषक तत्त्वांचे आगर असून त्यांच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्ये वर्ष (International Millets Year) म्हणून घोषित केल्यामुळे सध्या भरडधान्ये म्हणजेच मिलेटविषयी बरीच चर्चा होत आहे. भरडधान्याचे सेवन शरीराला कशा प्रकारे फायदेशीर ठरू शकते, ह्याबद्दलची जागरूकताही समाजामध्ये वाढत आहे. भरडधान्ये आपल्याच मातीतील असूनदेखील आपल्याला त्यांचा विसर पडला आहे. आजही ग्रामीण भागांत लोक ह्या धान्यांचा वापर करताना दिसतात; पण शहरातील लोक भरडधान्यांच्या फायद्यांविषयी काहीसे अनभिज्ञच आहेत.

भरडधान्य हे अतिशय पुरातन धान्य असून आफ्रिका, आशिया आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागांतही पूर्वापार त्यांचे पीक घेतले जात आहे. त्या त्या देशाच्या भौगोलिक रचनेनुसार तिथे वेगवेगळी भरडधान्ये पिकवली जातात. जगातील भरडधान्य उत्पादकांपैकी भारत हा एक प्रमुख देश मानला जातो.

येथे ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, राळा, जव, कोटो, राजगिरा अशा भरडधान्यांची मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. ज्वारी, बाजरी व नाचणीच्या तर विविध जाती विकसित केल्या गेल्या असून त्या युनायटेड किंग्डम, अमेरिका व आखाती देशांत निर्यात केल्या जातात. प्रत्येक भरडधान्याचे स्वतःचे असे एक वैशिष्ट्य असते आणि त्यात अत्यंत प्रभावी अशी पोषक तत्त्वे असतात.

पूर्वीच्या काळी उखळ आणि मुसळ वापरून ह्या धान्यांवरचे साल भरडून काढले जायचे व त्यावरूनच अशा धान्यांना भरडधान्य म्हटले जाते. त्यापैकी जरा मोठ्या अशा ज्वारी व बाजरीला ग्रेटर मिलेट व वरई, राळा, राजगिरा अशा लहान आकाराच्या धान्याला मायनर मिलेट असे म्हटले जाते.

भरडधान्याची शेती करताना जमिनीची फारशी मशागत करावी लागत नाही. ही धान्ये हलक्या व कमी प्रतीच्या जमिनीत तसेच माफक पाण्यावरदेखील चांगली येतात. काही प्रमाणात दुर्लक्षित असलेल्या ह्या धान्यांची लागवड हल्ली धान्य आणि चारा अशा दुहेरी हेतूने केली जाते.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने भरडधान्यांची शेती करणे अनेक कारणांमुळे फायदेशीर ठरते. ज्यांच्याकडे अगदी अल्प प्रमाणात जमीन आहे अशा शेतकऱ्यांना ही पिके स्वतःच्या आरोग्यासाठी, शेतावरील गुरांसाठी चारा म्हणून वापरण्यासाठी, तसेच इंधनासाठी उपयुक्त ठरतात.

पूर्वी भरडधान्ये हा आपल्या आहारातला एक महत्त्वाचा भाग होता व ऋतूनुसार त्यांचा आहारात समावेश करण्यात येत असे. बाजरी उष्ण असल्यामुळे त्याची तीळ लावून केलेली भाकरी हिवाळ्यात खाल्ली जाते. रागी आणि राळेदेखील उष्ण असल्याने हिवाळ्यात खाण्यास योग्य असे आहेत. कोडो, ज्वारी, कुटकी, वरी ही धान्ये थंड असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत खाल्ली जातात.

पूर्वी ज्वारी-बाजरीची भाकरी व त्याबरोबर गूळ तूप, नाचणीचे सत्त्व वापरून केलेले पदार्थ, वरीचा भात तसेच बाजरीची खिचडी असे पदार्थ घरोघरी खाल्ले जात. हल्ली वरीचा पुलाव, नाचणीच्या इडल्या व धिरडी, राजगिऱ्याच्या वड्या व लाडू हे पदार्थ केले जातात. वेगवेगळ्या भरडधान्यांची पिठे व लाह्या बाजारात मिळू लागल्या आहेत, तरीही सध्याच्या आहारशैलीत ह्या धान्यांचा म्हणावा तसा उपयोग केला जात नाही.

गहू व तांदूळ हे आपल्या रोजच्या आहारातला महत्त्वाचा भाग असले तरीही वेगवेगळी भरडधान्ये हा त्यांना पौष्टिक आणि चविष्ट असा पर्याय आहे. ही धान्ये अन्नसुरक्षेच्या जोडीने पोषणसुरक्षा आणि आरोग्यसुरक्षादेखील देतात.

लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत आणि विविध शारीरिक आजार असणाऱ्यांसाठी भरडधान्यापासून केलेले पदार्थ खाणे लाभदायक ठरते. ह्या धान्यात भरपूर प्रमाणात खनिजे, कॅल्शियम व प्रथिने असतात. त्यांचे सेवन शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. ही धान्ये म्हणजे पोषक तत्त्वांचे आगर असून त्यांच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

त्यातील बहुतेक सगळी धान्ये ग्लुटेन फ्री असल्यामुळे सेलिॲक व्याधी वा ग्लुकोज संवेदनशीलता असणाऱ्या लोकांसाठी त्यांचे सेवन हा सुरक्षित आणि पौष्टिक पर्याय ठरतो. ही धान्ये पचायला अगदी हलकी असल्यामुळे बद्धकोष्ठता व पोटाचे अन्य विकार होण्याची शक्यता कमी होते.

योग्य आहाराच्या अभावामुळे सध्या मधुमेह, हृदयविकार आणि स्थूलता यांसारख्या आजारांचे वाढते प्रमाण ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळेच भरडधान्यांचा आहारात समवेश करणे आवश्यक आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

त्यांच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यास मदत होते. त्यातील तंतुमय पदार्थ, लोह आणि कॅल्शियमच्या मात्रेचा उपयोग वजन कमी करण्यासाठी व रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी होतो. त्यात भरपूर फायबर असल्यामुळे ती खाल्ली असता दीर्घ काळ पोट भरलेले राहते, त्यामुळे कमी खाल्ले जाते व त्याचे पर्यावसन वजन कमी होण्यात होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरडधान्याला ‘श्री अन्न’ म्हटले आहे. ते म्हणतात, ‘आपल्या देशात भरपूर भरडधान्ये पिकतात. ती पचायला हलकी आणि अतिशय पौष्टिक असल्यामुळे त्यांचा रोजच्या आहारात नियमितपणे वापर केला पाहिजे.

’ ते स्वतः भरडधान्यांपासून केलेले पदार्थ खाणे पसंत करतात व लोकांनी आपल्या आहारात ह्या धान्यांचा समावेश करावा असे आवाहन करतात. त्यांनी भरडधान्ये आणि योगा ह्याच्यातले एक साम्य सांगितले आहे आणि ते म्हणजे दोन्हीमुळे आपले आपले आरोग्य आणि तब्येत उत्तम राहते.

ह्या सगळ्यावरून आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षासाठी केलेले ‘इंडियाज् वेल्थ, मिलेट्स फॉर हेल्थ’ हे घोषवाक्य किती योग्य आहे ते लक्षात येते. त्यामुळे आपल्या आहारशैलीत आपल्या देशात पिकणाऱ्या भरडधान्यांचा वापर करणे ही उत्तम आरोग्य राखण्याची गुरुकिल्ली आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सोलापुरात भाजपच्या माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात पैसे वाटताना वकील सापडला; 80 हजार रुपयांची पाकिटे सापडली, पोलिसांत गुन्हा दाखल

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Woolen Clothes Skin Allergy: हिवाळ्यात स्वेटर घातल्यानंतर त्वचेला अ‍ॅलर्जी होते? हे टाळण्यासाठी करा सोपे घरगुती उपाय

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

SCROLL FOR NEXT