NCPOR Education eSakal
साप्ताहिक

विज्ञानतीर्थे

सुधीर फाकटकर

माणूस १९१०च्या सुमारास उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर पोहोचला. यानंतर साहजिकच या ध्रुवांवरील शास्त्रीय संशोधनाला चालना मिळाली. आपल्या देशानेही ध्रुवीय आणि त्या अनुषंगाने ध्रुवीय संशोधनात अग्रेसर राहण्यासाठी १९८१पासून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत ध्रुवीय मोहिमा सुरू केल्या. पुढे चारच वर्षांत दक्षिण ध्रुवीय प्रदेशात ‘दक्षिण गंगोत्री’ या नावाचा संशोधन तळ उभारला गेला.

पुढे १९९८मध्ये ध्रुवीय मोहिमांच्या अनुषंगाने पृथ्वीविज्ञान मंत्रालयाने ‘राष्ट्रीय ध्रुवीय आणि समुद्र संशोधन केंद्र’ (नॅशनल सेंटर फॉर पोलर ॲण्ड ओशन रिसर्च -एनसीपीओआर) स्थापन केले. गोव्यातील वास्को-द-गामा शहरातील हे केंद्र उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर विविधांगी वैज्ञानिक संशोधन साध्य करणे तसेच समुद्रांमध्ये दूरवर आणि खोलवर अजैविक घटकांचा शोध घेणे यासाठी कार्यरत आहे.

संशोधनाच्या अनुषंगाने येथे ध्रुवीय आणि समुद्र विज्ञान, भूवैज्ञानिक सर्वेक्षण, अरबी समुद्रातील संशोधन, वायू-जल संयुग संशोधन असे स्वतंत्र विभाग आहेत. यामध्ये ध्रुवीय आणि समुद्र विज्ञान विभागात घनावस्थेतील जल अभ्यास, समुद्रविषयक हवामान, ध्रुवीय प्रदेशातील पर्जन्यमान, सूक्ष्मजैवविविधता, दक्षिणेकडील सागरी पर्यावरण, प्राचीन हवामानविषयक अभ्यास, पर्यावरणीय अवलोकन असे उपविभाग आहेत.

याशिवाय उत्तर ध्रुवाजवळील ‘कॉन्ग्स्फ्जॉर्डन’ या अतिशीत बेटाजवळ खास संशोधन मोहीम आखण्यात आली आहे. भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागात अनन्यसाधारण आर्थिक क्षेत्र, समुद्र बेटांच्या सीमांचा अभ्यास, हिमालय आणि मॉन्सूनचे मूल्यमापन समुद्रातील स्फटिकांचा अभ्यास आणि सागरी भूगोल असे या संशोधनाचे विषय आहेत.

या संस्थेचे उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे ध्रुवीय प्रदेशात उभारलेले संशोधन तळ तसेच आखलेल्या अभ्यास मोहिमा. सर्वात प्रथम उभारण्यात आलेल्या ‘दक्षिण गंगोत्री’ने भारताचे नाव ध्रुवीय संशोधनात जगाच्या पटलावर आले. १९८८मध्ये या तळाची उपयुक्तता संपल्यानंतर जवळच ‘मैत्री’ हा दुसरा तळ दक्षिण ध्रुवीय प्रदेशात उभारण्यात आला.

त्यानंतर पुन्हा काही अंतरावर ’भारती’ तळ उभारण्यात आला. उत्तर ध्रुवीय प्रदेशात ‘हिमाद्री’ तर हिमाचल प्रदेशातील लाहोल-स्पिती खोऱ्यात ‘हिमांश’ संशोधन तळ स्थापन करण्यात आला आहे. या सर्व संशोधन तळस्वरूपातील केंद्रांमध्ये जीवविज्ञान, पृथ्वीविज्ञान, वातावरणीय विज्ञान, हवामानशास्त्र तसेच हिमनदीविषयक विज्ञान या विषयांचा अभ्यास व संशोधन होते.

याच बरोबरीने मानवी शरीरविज्ञान, औषधविषयक हेही या केंद्रांमधील अभ्यासाचे विषय आहेत. ध्रुवीय तळ उभारताना देशातील संस्थेतून रेडिओ संदेशवहन साधणे हे आव्हानात्मक असते. त्या दृष्टिकोनातून रेडिओ संदेशवहनावरही संशोधन केले जाते. याखेरीज ध्रुवीय प्रदेशातून खगोलशास्त्रीय निरीक्षणेही केली जातात.

ध्रुवीय प्रदेशातील संशोधनात हिमनदीविषयक प्रवाह, वस्तुमान, तापमानातील बदल; देशातील बर्फाच्छादीत प्रदेशांमधील पर्जन्यमान, बर्फाचे आच्छादन तसेच अन्य हवामानविषयक नोंदी इत्यादी विविध घटकांच्या मोजमापातून माहितीचे संग्रहण, संकलन तसेच पृथःकरण केले जाते.

या माहितीतून पृथ्वीशी संबंधित हवामान तसेच पर्यावरणविषयक बदल आणि मानवी जीवनावरील परिणाम अशा अनेक मुद्यांचा अभ्यास केला जातो. उच्चशिक्षण तसेच संशोधनासंदर्भात या संस्थेत विविध विज्ञान तसेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध असतात.

- सुधीर फाकटकर

राष्ट्रीय ध्रुवीय आणि समुद्र संशोधन केंद्र,

हेडलॅन्ड सडा, वास्को 403804 (गोवा)

संकेतस्थळः https://ncpor.res.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta fadnavis on CM Post: महायुतीचा मोठा विजय, राजकीय चर्चेला उधाण! मुख्यमंत्री पदाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

Chandgad Assembly Election 2024 Results : चंदगडला भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील ठरले जायंट किलर; मिळवला मोठ्या मताधिक्याने विजय

Devendra Fadnavis: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद कुठल्याही निकषांवर नाही!

BJP Candidate Ravisheth Patil Won Pen Assembly Election : प्रसाद भोईर यांना पराभूत करत भाजपच्या रवीशेठ पाटीलांचा दणदणीत विजय

Sneha Dubey Vasai Assembly Election 2024 Result: वसई मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला; स्नेहा दुबे यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT