physiotherapy  esakal
साप्ताहिक

Physiotherapy: फिजिओथेरपी म्हणजे काय? जाणून घ्या त्यातील थेरपीबद्दल

सकाळ डिजिटल टीम

विनाऔषध केली जाणारी फिजिओथेरपी अधिक लाभदायक ठरते का? त्यात ट्रीटमेंट दिली जाताना नेमके कोणते टप्पे पाळले जातात ? थेरपी देताना कोणती उपकरणे वापरली जातात आणि कोणत्या आजारांवर ही थेरपी दिली जाते ? हे प्रश्न तुम्हालाही पडले आहेत का?

डॉ. नेहा गोगटे

फिजिओथेरपिस्ट उपचार देताना जी विशेष साधने आणि तंत्रे वापरतात त्यांना इलेक्ट्रो-मोडॅलिटी असे म्हटले जाते. यांचा उपयोग वेदना कमी करण्यासाठी, स्नायूंची ताकद सुधारण्यासाठी आणि रक्तप्रवाह वाढविण्यासाठी केला जाऊ शकतो. ही उपकरणे स्नायूंना आराम अथवा उत्तेजन देण्यासाठी वापरली जातात. ही पद्धत, विशेषतः मोठ्या जखमा किंवा शस्त्रक्रियांमधून बरे होणाऱ्या व्यक्तींसाठी उपयुक्त आहे.

‘गेले काही महिने माझे गुढघे दुखतायत आणि मला खूप वेळ उभं राहून काम करायला किंवा आधीसारखं चालायला जमत नाही’. ‘कंबर दुखते म्हणून ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी फिजिओथेरपिस्टकडे जायला सांगितलं.

फिजिओथेरपिस्टकडे गेल्यावर मात्र मला खरंच बरं वाटलं’. असे अनेक संवाद तुम्ही ऐकले असतील. दुखापतीतून बरे होण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी फिजिओथेरपीमुळे मदत होते.

फिजिओथेरपी ही बिनाऔषधांची उपचारपद्धती असल्यामुळे व्यायाम, निरनिराळी इलेक्ट्रिक उपकरणे, म्यॅनुअल थेरपी यांच्या मदतीने शारीरिक स्वास्थ्य राखले जाते. तसेच सांध्यांची कार्यक्षमता, स्नायूंची कार्यक्षमता, रोगनिदान आणि कार्य निदानपद्धती वाढवण्यासाठी बऱ्याच अत्याधुनिक उपचारपद्धतीसुद्धा वापरतात. या लेखात आपण विविध मशिनच्या वापराबद्दल चर्चा करू.

फिजिओथेरपिस्ट उपचार देताना जी विशेष साधने आणि तंत्रे वापरतात त्यांना इलेक्ट्रो-मोडॅलिटी असे म्हटले जाते. यांचा उपयोग वेदना कमी करण्यासाठी, स्नायूंची ताकद सुधारण्यासाठी आणि रक्तप्रवाह वाढविण्यासाठी केला जाऊ शकतो. ही उपकरणे स्नायूंना आराम अथवा उत्तेजन देण्यासाठी वापरली जातात.

ही पद्धत, विशेषतः मोठ्या जखमा किंवा शस्त्रक्रियांमधून बरे होणाऱ्या व्यक्तींसाठी उपयुक्त आहे. यामध्ये अल्ट्रासाउंड थेरपी, डायथरमी, टेन्स (ट्रान्सक्युटेनियस इलेक्ट्रिक नर्व्ह स्टिम्युलेशन्स - टीईएनएस), आयएफटी (इंटरफेरेंशियल थेरपी), ट्रॅक्शन, लेझर, इन्फ्रारेड करंट ह्यांचा उपयोग केला जातो.

ह्या थेरपी साधारण तीन ते दहा वेळा दिल्या जातात. कितीवेळा थेरपी घेण्याची आवश्यकता आहे, हे थेरपिस्ट पहिल्या तपासणीनंतर ठरवतात. थेरपीबरोबरच इतर व्यायामही शिकवले जातात. ह्या थेरपींमुळे व्यायाम करणे सोपे होते आणि लवकर बरे होण्यास मदत होते.

अल्ट्रासाउंड थेरपी : अल्ट्रासाउंड या पद्धतीत दुखणे कमी करण्याबरोबरच सूज कमी करण्यासाठी हाय फ्रिक्वेन्सी साउंडचा वापर केला जातो. टेनिस एल्बो, पाय मुरगळणे, लिगामेंट आणि प्लान्टर फेशिआयटिसच्या दुखापतीमध्ये याचा खूप वापर होतो.

टीईएनएस : ही पद्धत वेदना कमी करण्यासाठी प्रभावी आहे. टीईएनएस युनिट ही पोर्टेबल उपकरणे असतात. ही उपकरणे त्वचेवर ठेवली जातात. त्यातल्या इलेक्ट्रोडद्वारे विद्युत प्रवाह सोडला जातो. यामुळे वेदनेचे सिग्नल मेंदूपर्यंत पोहोचण्यापासून रोखले जातात. टीईएनएसचा वापर सामान्यतः तीव्र वेदना कमी करण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ सायटिका, मानदुखी, पाठदुखी इत्यादी आजारांमध्ये याचा खूप उपयोग होतो.

कॉम्बिनेशन थेरपी : यामध्ये अल्ट्रासाउंड थेरपी आणि टीईएनएस थेरपी एकत्रितरित्या वापरल्या जातात, म्हणून त्याला कॉम्बिनेशन थेरपी म्हणतात. या उपचारात दोन्ही थेरपींचे फायदे एकत्रितपणे मिळतात.

वायरलेस आणि पोर्टेबल उपकरणे : काही इलेक्ट्रो-पद्धती आता वायरलेस आणि पोर्टेबल स्वरूपात उपलब्ध आहेत, त्यामुळे रुग्णांना घरीसुद्धा त्या वापरणे सोपे होते. या उपचारांमुळे सहज कृती होण्यास मदत होते. खेळाडूंसाठी ही उपकरणे सर्वात जास्त वापरली जातात. खेळताना काही वेदना झाल्यास तिथेच त्वरित उपचार घेणे सोईचे होते.

लेझर : लेझर या उपकरणात काही विशिष्ट प्रकारच्या किरणांचा वापर केला जातो. ही किरणे स्नायूंमध्ये शोषली जाऊन वेदना कमी होतात, तसेच जखम बरी होण्याची प्रक्रिया सुधारते. साधारणतः याचा वापर जुनाट दुखण्यामध्ये केला जातो, उदाहरणार्थ स्लिप डिस्क, संधिवात तसेच लिगामेंट आणि दुखावलेली नस यांसाठी हे वापरले जाते. ही किरणे डोळ्यांसाठी हानिकारक असल्यामुळे हे उपकरण वापरताना चष्मा वापरावा लागतो.

ट्रॅक्शन : कंबर किंवा मान दुखण्यावर ट्रॅक्शन थेरपी दिली जाते. स्पाँडिलायसिस, स्लिप डिस्क, सायटिका यांसारखी दुखणी ट्रॅक्शन घेतल्यानंतर बऱ्याच प्रमाणात सुसह्य होतात.

शॉकवेव्ह थेरपी : शॉकवेव्ह हा शब्द ऐकताना इलेक्ट्रिक शॉक ट्रीटमेंट आहे की काय असे वाटते. पण हे उपचार स्नायूंची लवचिकता वाढवायला खूप मदत करतात. एकदा लवचिकता वाढली की स्ट्रेचिंगचे व्यायाम करणे सोपे होते. मानेचे स्नायू, पाठीचे किंवा मांडीचे स्नायू, पोटऱ्या जर आखडल्या असतील तर या उपकरणामुळे ते पुन्हा लवचिक होण्यासाठी मदत होते.

साधारणतः वैयक्तिक गरजेनुसार उपचार ठरविले जातात. तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्यांना फिजिओथेरपीची गरज असल्यास, इलेक्ट्रो-पद्धती तुमच्या उपचारातील एक फायदेशीर भाग असू शकेल का, हे तुमच्या फिजिओथेरपिस्टला विचारणे आवश्यक आहे.

दुखण्यावर गोळ्या घेण्यापेक्षा फिजिओथेरपी, म्हणजेच भौतिक उपचारांची मदत घेऊन दुखण्यातून बाहेर येता येऊ शकते. खूप दिवस गोळ्या खाऊन त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात, पण या थेरपींचे तसे दुष्परिणाम होत नाहीत. फिजिओथेरपिस्ट पूर्ण तपासून आणि विचारपूस करून तुमच्यासाठी कोणती थेरपी योग्य ठरेल याचा निर्णय घेतात.

आपल्या दैनंदिन कार्यातील क्षमता वाढवायला भौतिक उपचार मदत करतात. परदेशात ह्या क्षेत्रात अनेक विकसित उपकरणे वापरली जातात. भारतातही काही फिजिओथेरपी सेंटर आहेत, जिथे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून लवकर बरे व्हायला मदत करतात. शेवटी व्यायामाला पर्याय नाही, पण जेव्हा दुखणे खूप असते तेव्हा व्यायामही करता येत नाही.

अशा वेळी चांगली साधने वापरून आराम मिळू शकतो. त्यामुळे व्यायाम करायलाही मदत होते आणि दुखणेदेखील कमी होते. हॉस्पिटलायझेशननंतर जर डॉक्टरांनी फिजिओथेरपी सांगितली असेल आणि तुमचा आरोग्य विमा हॉस्पिटलायझेशननंतरचे कव्हरेज देऊ करत असेल, तर फिजिओथेरपीचा खर्च कव्हर होऊ शकतो.

दरवर्षी सप्टेंबर महिन्यात आठ तारखेला फिजिओथेरपी दिन साजरा केला जातो. फिजिओथेरपी ही येणाऱ्या काळाची गरज आहे. आजकाल या क्षेत्राबद्दल जागरूकता वाढली आहे. छोट्याशा दुखण्यापासून शस्त्रक्रिया टाळण्यापर्यंत आणि शस्त्रक्रियेनंतरसुद्धा तुम्हाला तंदुरुस्त बनवायला फिजिओथेरपिस्टची मदत लागतेच. मात्र हे उपचार तुम्ही परवानाधारक (लायसन्स्ड) फिजिओथेरपिस्टकडूनच घ्यावेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT