construction  esakal
साप्ताहिक

काय सांगता.. सहा महिन्यात एवढी घरे विकली गेली?

Shraddha Kolekar

अंकुश आसबे

एके काळी पेन्शनरांचे शहर म्हणून असलेली ओळख, नंतरच्या काळात 'ऑक्सफर्ड ऑफ दी ईस्ट' म्हणून मिळालेला मान आणि आता देशातील मेट्रो शहरांमध्ये वेगाने विकसित होणारी, परवडणारी आणि प्राधान्याने वाढणारी रिअल इस्टेट बाजारपेठ हा गेल्या काही दशकातील पुणे शहराचा प्रवास खरेतर आशादायी आहे आणि पुणेकरांच्या दृष्टीने अभिमानास्पददेखील.

आकड्यांमध्ये बोलायचे झाल्यास नुकत्याच वाचनात आलेल्या बातमीनुसार भारतातील इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत पुणे शहरातील रिअल इस्टेट बाजारपेठ ही खऱ्या अर्थाने ‘व्हायब्रंट’ आणि ‘ग्रोईंग’ आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

यावर्षाच्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी- जून २०२३) समोर आलेल्या आकडेवारीनुसार पुनर्विक्री वगळून पुणे रिअल इस्टेट मार्केटमध्ये ४५ हजार घरांची विक्री झाली आहे. या घरांची एकूण मिळून किंमत तब्बल २८ हजार कोटी रुपये इतकी आहे. २०१९च्या तुलनेत हा आकडा ९० टक्क्यांनी वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. म्हणजेच पुणे रिअल इस्टेट मार्केटने गेल्या चार वर्षांत अभूतपूर्व कामगिरी केली आहे, असे आपण म्हणू शकतो.

२०१९ आणि २०२३च्या पहिल्या सहामाहीचा विचार केल्यास पुणे शहरात २०२३ मध्ये ४० हजारांहून अधिक घरांची विक्री झाली आहे. २०१९साली पहिल्या सहामाहीत घरांची विक्री ३२ हजारांच्या आसपास होती. त्यामुळे कोविडपूर्व काळाच्या तुलनेत २०२३च्या पहिल्या सहामाहीत घरांची विक्री ४० टक्क्यांनी वाढली आहे, असे म्हणता येईल.

शिवाय पुण्यात २०२३ साली पहिल्या सहामाहीत विक्री झालेल्या घरांची सरासरी किंमत २०१९च्या तुलनेत ३७ टक्क्यांनी वाढली आहे, हेदेखील एका अहवालात नमूद करण्यात आले होते. पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटचा विचार केल्यास शहरातील घरांचा सरासरी आकार आणि किंमत या दोन्ही गोष्टी वाढत आहेत, हेसुद्धा आता लक्षात घ्यायला हवे.

सजग नागरिक आणि महारेरासारख्या कायद्यामुळे बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आली आहे, हे आपल्याला मान्य करायलाच हवे.

आज प्रत्येक ग्राहकाला त्याच्या हक्कांची पूर्ण जाणीव आहे. घराचा ताबा वेळेवर मिळण्याची ग्राहकांची रास्त अपेक्षा आहे आणि ते या मागण्या बांधकाम व्यावसायिकांसमोर योग्य पद्धतीने ठेवतदेखील आहेत.

हे करीत असताना गेल्या काही वर्षात स्थापन झालेले समन्वय मंच, ग्राहक पंचायत यांसारख्या संस्था यांचा फायदा ग्राहकांना होत आहे आणि बांधकाम व्यावसायिकांवरदेखील त्यांचा योग्य वचक राहत आहे, ही जमेची बाजू आहे.

या सर्व बाबी महत्त्वाच्या असल्या तरीही आजही बांधकामाची गुणवत्ता आणि वेळेत ताबा या गोष्टी ग्राहकांसाठी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. काळ बदलला तरी ग्राहकांच्या असलेल्या या प्राथमिक अपेक्षा कालानुरूप बदलल्या नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे.

पुणे शहराचा विचार केल्यास याठिकाणी शिक्षण, सामाजिक व पायाभूत सोयीसुविधा, कायदा व सुव्यवस्था, हवामान, मेट्रो प्रकल्पाचा भविष्यात होणारा विस्तार, रस्ते, सार्वजनिक वाहतूक सुविधा या इतर शहरांच्या तुलनेत सुखकर असल्याने येथे बांधकाम व्यवसाय क्षेत्राला भविष्यात मोठी संधी आहे.

थोडक्यात आता बांधकाम विकसकांनी ग्राहकांच्या अपेक्षा, आवश्यकता आणि मागण्या समजून घेत वेळेवर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यायला हवा. हे करीत असताना प्रत्येक प्रकल्पाच्या अंमलबजावणीपासून त्यासाठीचा आवश्यक वित्तपुरवठा आणि दस्तावेजीकरणापर्यंत एक अतिशय व्यापक योजना विकसकांकडे असणे आवश्यक आहे. याच जोरावर आजच्या स्पर्धेच्या युगात ते तग धरू शकतील.

शिवाय नजीकच्या भविष्यात घरांची वाढती मागणी लक्षात घेत वाढत असलेला बांधकाम साहित्याचा खर्च, रेडी रेकनर दर, बांधकाम व्यवसायिकांची इनपुट कॉस्ट यांकडेही काळानुरूप लक्ष द्यायला हवे, असे आमचे मत आहेच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

Sangli Election Results : 83 जणांचे 'डिपॉझिट' जप्त, मातब्बर नेत्‍यांचा समावेश; सोळा लढले, बाकीचे फक्त नडले

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

Latest Marathi News Updates : नागपूरमधील CM एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानासमोरील नावाची पाटी काढली

SCROLL FOR NEXT