साप्ताहिक

Winter Food Recipies: भाजलेले सॅल्मन फिश ते टोमॅटो तुळस सूप, हिवाळ्यासाठी खास हेल्दी सूप्स, सॅलड आणि करी

हिवाळ्यात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खायला आपल्या सर्वांनाच आवडते. हेल्दी सूप्स, सॅलड आणि करीसारख्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करायला हरकत नाही.

सकाळ डिजिटल टीम

(लेखिका - अश्विनी कस्तुरे)

भाजलेले सॅल्मन फिश

साहित्य

साधारण अर्धा किलो सॅल्मनचे तुकडे, २ चमचे ऑलिव्ह ऑईल, एका लिंबाचा रस, १ चमचा जिरे पूड, १ चमचा धने पूड, अर्धा चमचा हळद, १ चमचा मीठ, १ चमचा लाल तिखट , १ चमचा बडीशेप, थोडे गाजर, थोडी फरसबी.

कृती :

पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लिंबाचा रस सॅल्मनला चोळावे आणि दहा मिनिटे बाजूला ठेवून द्यावे. १० मिनिटांनी धुवावे. हलकेच टॅप करून कोरडे करावे. एक टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल आणि सर्व मसाल्यांनी सॅल्मन मॅरीनेट करावे आणि १० ते १५ मिनिटे तसेच ठेवावे, म्हणजे मसाले छान मुरतील.

नंतर ४२० अंश फॅरेनहाइट किंवा २०० अंश सेल्सिअस तापमानावर १२ ते १५ मिनिटे बेक करावे. गाजर आणि फरसबी स्वच्छ धुऊन चिरून घ्यावे, मोठे मोठे तुकडे करावेत. तुकड्यांना मीठ, मिरपूड आणि थोडे तेल चोळावे २५० सेल्सिअसवर २० मिनिटे बेक करावे. या भाज्या सॅल्मन फिशबरोबर सर्व्ह कराव्यात.

मशरूम-पनीर/टोफू करी

साहित्य

शंभर ग्रॅम मशरूम, १०० ग्रॅम पनीर किंवा टोफू, पाऊण कप मलई किंवा नारळाचे दूध, १ कप बारीक चिरलेला कांदा, ३ बारीक चिरलेले टोमॅटो, १ टीस्पून आले लसूण पेस्ट, २ वेलची, १ इंच दालचिनी, २ लवंगा, मीठ आणि मिरपूड चवीनुसार, १ चमचा चिली फ्लेक्स, १ चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, १ चमचा धने पूड, ३ चमचे तेल.

कृती :

मशरूम धुऊन तुकडे करून घ्यावेत. मशरूम व पनीर किंवा टोफू १ चमचा तेलावर दोन ते पाच मिनिटे परतून घ्यावे. २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात वेलची, दालचिनी, लवंगा घालाव्या आणि सुगंधी होईपर्यंत परतावे. मग कांदा, आले, लसूण पेस्ट घालावी.

गुलाबी रंग येईपर्यंत परतावे. टोमॅटो घालावा व तेल सुटेपर्यंत शिजवावा. हळदी, धने पावडर आणि चिली फ्लेक्स घालावेत. हे मिश्रण थंड होऊ द्यावे. नंतर बारीक वाटून घ्यावे. थोड्या तेलावर वाटलेले मिश्रण परतावे. त्यात मशरूम, पनीर किंवा टोफू घालून २ ते ५ मिनिटे परतावे. मलई किंवा नारळाचे दूध आणि मीठ, मिरपूड घालावी. ५ ते १० मिनिटे उकळावे. करी तयार!

कुरकुरीत ग्रॅनोला

साहित्य

अर्धा कप दही, पाव कप दूध, भाजलेले नारळाचे तुकडे, ६ भिजवलेले बदाम, पाव चमचे स्वीटनर, १ चिमूटभर मीठ.

कृती :

याची कृती अतिशय सोपी आहे. दही व दूध मिक्स करावे. त्यात बदामाचे तुकडे करून घालावेत. स्वीटनर व चिमूटभर मीठ घालावे. बदामाचे तुकडे व कोको निब्सने सजवावे.

टोमॅटो तुळस सूप

साहित्य

तीन टोमॅटो, १ लाल भोपळी मिरची, अर्धे बीट, अर्धा कांदा, 1 कप व्हेजिटेबल ब्रॉथ, १ चमचा ऑलिव्ह ऑईल.

मसाल्यासाठी

एक चमचा आले लसूण पेस्ट, २ मोठे चमचे लोणी किंवा ऑलिव्ह ऑईल, १ चमचा ठेचलेली काळी मिरी, १ चमचा मीठ, १ चमचा तिखट, २ चमचे तुळस अर्क किंवा ताजी तुळस (चिरलेली)

कृती

ओव्हन २०० अंश सेल्सिअसवर प्रीहीट करावा. ट्रेवर भाज्या ठेवून त्यांना व्यवस्थित तेल लावावे. २० ते २५ मिनिटे बेक करावे. नंतर भाज्या थंड करून आणि मिक्सरमधून बारीक कराव्यात. २ टेबलस्पून बटर किंवा तेल गरम करून त्यात आले लसूण पेस्ट घालावी. मग बारीक केलेल्या भाज्या घालाव्यात. व्हेजिटेबल ब्रॉथ, मिरपूड, मीठ आणि तुळस घालावी व ७ ते १० मिनिटे उकळवावे. तयार सूप गरमागरम सर्व्ह करावे.

पनीर, ताहिनी प्रोटीन सॅलड

साहित्य

एक तृतीयांश कप ऑलिव्ह ऑईल, पाव कप क्रीमी ताहिनी किंवा पीनट बटर, २ चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर, अर्धा लिंबाचा रस, २ लसूण पाकळ्या, १ चमचा वाळलेले व कुटलेले आले, अर्धा चमचा मीठ, पाव कप कोथिंबीर, चवीनुसार मिरपूड, आवडीच्या ताज्या भाज्या, १ कप पनीर.

कृती

पनीर, भाज्या सोडून ताहिनी सॉस/पीनट बटर, ऑलिव्ह ऑईलसह सर्व साहित्य नीट मिक्स करून घ्यावे. गरज पडल्यास मिक्सरमधून फिरवून घ्यावे आणि सॅलड ड्रेसिंग तयार करावे. त्यात ताज्या हिरव्या भाज्या जसे की बेबी पालक किंवा चिरलेला लेट्युस किसलेले, गाजर, भोपळी मिरची अशा आवडीच्या भाज्या एकत्र कराव्यात. चौकोनी तुकडे केलेले पनीर घालावे. सगळे व्यवस्थित मिक्स करून सर्व्ह करावे.

बदाम ब्रेड

साहित्य

पाच मोठी अंडी, ५ चमचे खोबरेल तेल किंवा लोणी, १ चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर, मीठ, पावणे दोन कप बदामाचे पीठ, अर्धा चमचा बेकिंग सोडा.

कृती

ओव्हन १७५ अंश सेल्सिअसला प्रीहीट करावा. ८ इंच लोफ पॅनमध्ये पार्चमेंट पेपर लावून ठेवावा. एका मध्यम आकाराच्या वाडग्यात अंडी फेटावीत. त्यात खोबरेल तेल, व्हिनेगर, मीठ, बदामाचे पीठ आणि बेकिंग सोडा घालून पुन्हा फेटून घ्यावे. तयार पीठ लोफ पॅनमध्ये घालावे. स्पॅच्युलाने एकसारखे करावे. ब्रेड गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ३५ ते ४० मिनिटे बेक करावा. वायर रॅकवर १० मिनिटे थंड करून सर्व्ह करावा.

गाजर बदाम केक

साहित्य

दीड कप बदामाचे पीठ, अर्धा कप दाणेदार साखर, पाव कप ब्राऊन शुगर, दीड चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा मीठ, दालचिनी, अर्धा टीस्पून जायफळ, थोडीशी लवंगा, १ कप किसलेले गाजर, ४ अंडी, ४ चमचे अनसॉल्टेड लोणी, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स.

फ्रॉस्टिंगसाठी

एक कप मऊ क्रीम चीज, ५ चमचे अनसॉल्टेड मऊ लोणी, १ टेबलस्पून आंबट मलई किंवा साधे दही, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स, अर्धा कप पिठीसाखर.

कृती

बदामाचे पीठ, साखर, ब्राऊन शुगर एकत्र करून त्यात बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ, दालचिनी, जायफळ, लवंगा घालावी. दुसऱ्या भांड्यामध्ये लोणी फेटून घ्यावे, त्यात अंडी घालून फेटावे. मग किसलेले गाजर व व्हॅनिला इसेन्स घालू मिक्स करावे. त्यामध्ये कोरडे मिश्रण मिक्स करावे. हे मिश्रण केकच्या भांड्यात ओतावे. प्रीहीटेड ओव्हनमध्ये १७५ अंश सेल्सिअसवर २०-२५ मिनिटे बेक करावा. केक झाल्यावर रॅकवर थंड करावा.

फ्रॉस्टिंगसाठी

पिठीसाखर सोडू फ्रॉस्टिंगचे सर्व साहित्य एकत्र करून एकत्र करावे, ढवळावे. साखर घालून फ्लफी होईपर्यंत मिसळावे. तयार फ्रॉस्टिंगने केक सजवावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT