Hair Botox Treatment  esakal
साप्ताहिक

हेअर बोटॉक्स ट्रीटमेंट म्हणजे नेमके काय?

कुठलीही ट्रीटमेंट घेण्याआधी त्याबद्दल माहिती करून घेणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे, हे खूप महत्त्वाचे आहे.

सकाळ डिजिटल टीम

Hair Botox Treatment : केसांच्या कंडिशननुसार कोणती ट्रीटमेंट घ्यावी हे तज्ज्ञांना विचारावे. कुठलीही ट्रीटमेंट करायची असल्यास ती एक्स्पर्टकडूनच करून घ्यावी. त्याआधी त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घ्यावी, पोस्ट ट्रीटमेंट केअरबद्दल जाणून घ्यावे. हेअर बोटॉक्स प्रोसेसमध्ये हिटिंग टूल वापरत नाहीत, त्यामुळे इतर प्रोसेसपेक्षा हेअर बोटॉक्स आणि हेअर स्पा ह्या हेअर हिलिंग प्रोसेस आहेत.

हेअर बोटॉक्स ट्रीटमेंट म्हणजे नेमके काय असते? स्किन बोटॉक्ससारखेच इंजेक्शन देतात का? देत असतील तर डोक्यामध्ये इंजेक्शन घ्यावे लागेल का? पार्लरमध्ये बरेच वेळा ऐकले आहे, केरटीन ट्रीटमेंट, बोटॉक्स ट्रीटमेंट, स्मूथनिंग, स्पा ट्रीटमेंट आणि बरेच काही.

ही सगळी नावे ऐकून गोंधळल्यासारखे होते. ह्या सगळ्याची खरेच गरज असते का? त्यात हल्ली बऱ्याच पार्लरमध्ये एक विचारले तर दहा गोष्टी सजेस्ट करतात, अमुक करा, चेहरा तरुण दिसेल; तमुक करा मग केस गळायचे थांबतील आणि असेच बरेच सल्ले दिले जातात.

‘बोटॉक्स फॉर हेअर’ नेमके काय आहे आणि कोणी करावे ?

आपल्या स्किन आणि हेअर केअरबद्दल जागरूक असणे, कुठलीही ट्रीटमेंट घेण्याआधी त्याबद्दल माहिती करून घेणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे, हे खूप महत्त्वाचे आहे. खूप वेळेस आपण पार्लरमध्ये सांगतील ते करून घेतो, पण खरेच ती ट्रीटमेंट आपल्याला आवश्यक आहे का, याकडे आपले दुर्लक्ष होते.

तसेच जी व्यक्ती आपल्याला सल्ला देतीये, ती या क्षेत्रातील कितपत तज्ज्ञ आहे, ह्याबद्दल फार कमी लोक जागरूक असतात. अशा वेळेस ‘स्वस्त आणि मस्त’ फार महागात पडू शकते, ह्याचा विचार केला जात नाही.

असो, तुम्हाला पडलेला प्रश्न अगदी योग्य आहे, की ‘बोटॉक्स’ म्हटले की इंजेक्शन डोळ्यासमोर येते. स्किन बोटॉक्स इंजेक्शन ‘बोट्यूलिनम टॉक्सिन’चे असते. त्यामुळे त्वचेची लवचिकता वाढून बारीक सुरकुत्या कमी अथवा नाहीशा होतात आणि त्वचा टवटवीत दिसते.

पण हेअर बोटॉक्समध्ये असले काहीही नसते अन् इंजेक्शनदेखील घ्यावे लागत नाही. हेअर बोटॉक्स ही एक टॉपिकल प्रोसेस आहे, म्हणजे केसांवर बाह्यस्वरूपात प्रॉडक्ट लावले जाते. त्यामुळे केसांचे रिजुव्हिनेशन होते, आणि केस चमकदार, हेल्दी आणि सॉफ्ट दिसतात.

ज्यांचे केस फ्रीझी आहेत, डॅमेज झालेले आहेत, स्प्लिट एन्ड खूप आहेत, केस वीक असतील आणि सारखे तुटत असतील, त्यांनी हेअर बोटॉक्स ट्रीटमेंट जरूर करावी. केसांवर वारंवार केमिकल ट्रीटमेंट केली असेल, उदाहरणार्थ, स्ट्रेटनिंग, पर्मिंग किंवा तत्सम हीट ट्रीटमेंट सारखी करून केस डल आणि निर्जीव झाले असतील त्यांनीही ही ट्रीटमेंट घ्यायला हरकत नाही.

बोटॉक्स प्रोसेसमध्ये केसांना भरपूर हायड्रेट केले जाते. जे केस डॅमेज झालेत अथवा तुटलेत, त्या केसांना पोषण देऊन तुटलेल्या हेअर फायबरमध्ये आवश्यक ते फायबर फील केले जाते. त्यामुळे केसांचा व्हॉल्युम छान दिसतो आणि केस चमकदार व स्मूथ दिसतात.

ह्या ट्रीटमेंटसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रॉडक्टमध्ये भरपूर प्रोटीन आणि व्हिटॅमिन असतात, ते केसांच्या पोषणासाठी आवश्यक असतात. ही ट्रीटमेंट घेताना केसांना डीप कंडिशनिंग तर होतेच, शिवाय केसांना आवश्यक ते प्रोटीन आणि व्हिटॅमिन मिळून केस हेल्दी दिसतात.

स्प्लिट एन्ड नाहीसे होतात. हे प्रॉडक्ट सहसा फॉर्मलडीहाईड फ्री असतात, त्यामुळे केस स्ट्रेट होत नाहीत. हायड्रेशनमुळे थोडेफार सरळ झाल्यासारखे वाटू शकतात. पण केरटीन आणि स्मूथनिंग प्रोसेससारखे केस स्ट्रेट होत नाहीत.

त्यामुळे हेअर बोटॉक्स ट्रीटमेंट अगदी सेफ आहे. पण तरीही कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा चांगला नव्हेच, त्यामुळे हेअर बोटॉक्स वर्षातून तीनपेक्षा जास्त वेळा करू नये, नाहीतर त्याचे केस गळणे, तुटणे, वीक होणे असे विपरीत परिणाम होऊ शकतात; कारण शेवटी बोटॉक्स प्रॉडक्ट केमिकल युक्त आहेत.

हेअर बोटॉक्स केल्यानंतरही काळजी घेणे आवश्यक आहे. सल्फेट फ्री, सिलिकॉन फ्री आणि पॅराबेन फ्री शाम्पू वापरावा. त्यामुळे शाम्पू घेताना त्यावर दिलेले घटक वाचून नंतरच प्रॉडक्ट विकत घ्यावे. अथवा, तुमच्या हेअर एक्स्पर्टला विचारून शाम्पू आणि डीप कंडिशनिंग मास्क घ्यावा.

आठवड्यातून एकदा डीप कंडिशनिंग जरूर करावे. असे केल्यास बोटॉक्स ट्रीटमेंटचा इफेक्ट दीर्घकाळ टिकून राहतो. साधारणपणे तीन ते चार आठवड्यांपर्यंत बोटॉक्सचा इफेक्ट चांगला राहतो, पण नीट काळजी घेतली तरच!

शक्य असल्यास वरचेवर कोणत्याही प्रकारचे स्टायलिंग आणि हीट ट्रीटमेंट करणे टाळावे, म्हणजे केस चांगले राहतील. केस कलर करायचे असल्यास अथवा मेंदी लावत असल्यास आधी कलर करावे आणि नंतर हेअर बोटॉक्स ट्रीटमेंट करावी.

कारण ह्या प्रोसेसमध्ये कलर वॉश होत नाही, त्यामुळे रंग फेडही होणार नाही. पण जर नंतर कलर करायचा असेल तर चार ते पाच वेळेस शाम्पू झाल्यानंतर कलर करावा. कारण केसांवर ट्रीटमेंट झाली असल्यामुळे लगेच जर कलर केले, तर कलर स्लिप होऊ शकतो आणि नीट डाय होणार नाही.

बाकी कोणती ट्रीटमेंट करणे चांगले, तर असे सांगता येणार नाही. तुमच्या केसांच्या कंडिशननुसार काय करावे, हे तज्ज्ञांना विचारून तुम्ही स्वतः ठरवायचे. कुठलीही ट्रीटमेंट करायची असल्यास ती एक्स्पर्टकडूनच करून घ्यावी.

त्याआधी त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घ्यावी, पोस्ट ट्रीटमेंट केअरबद्दल जाणून घ्यावे. ह्या प्रोसेसमध्ये हिटिंग टूल वापरत नाहीत, त्यामुळे इतर प्रोसेसपेक्षा हेअर बोटॉक्स आणि हेअर स्पा ह्या हेअर हिलिंग प्रोसेस आहेत असे म्हणू शकतो.

(लेखिका - स्वप्ना साने)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: CRPF जवानाची बायको अन् टोल कर्मचाऱ्यामध्ये जुंपली! एकमेकांच्या झिंज्या पकडून फ्रीस्टाईल हाणामारी

Health Tips : टॉयलेट सीटवर बसून टाईमपास करणं महागात पडेल, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा, सवय बदला नाहीतर...

Latest Maharashtra News Updates : विद्यार्थ्यांची मतदानासाठी जनजागृती

Solapur Travel Place : हिवाळ्यात फिरायला जायचं प्लॅन करताय, हे ठिकाणे नक्की एक्सप्लोर करा

AUS vs PAK: ग्लेन मॅक्सवेलने पाकिस्तानला 'गर्रगर्र...' फिरून धुलते; नंतर गोलंदाजांनी नाक घासायला लावले, बिच्चारे वाईट हरले

SCROLL FOR NEXT