María del Mar Galcerán Gadea esakal
साप्ताहिक

Maria del Carmen Galcerán : कोणत्या घटनात्मक बदलांसाठी आहे मारियाचा लढा?

जनुकीय अपसामान्यता असलेल्या व्यक्तींनी मुख्य प्रवाहात यावं यासाठी ती गेल्या काही दशकांपासून प्रयत्न करत आहे.

साप्ताहिक टीम

केतकी जोशी

देशाच्या लोकप्रतिनिधिगृहात महिला लोकप्रतिनिधी निवडून येणं ही आता काही नवीन बाब नाही. पण तरीही काही महिला प्रतिनिधी विशेष असतातच. सध्या जगभरात मारिया गल्सेरनची चर्चा आहे.

मारिया ही स्पेनमधील पीपल्स पार्टीची (पीपी) सदस्य. तिनं नुकताच एक इतिहास घडवला आहे. गल्सेरनला डाऊन्स सिंड्रोम आहे. गतिमंदत्व असलेली पण देशाच्या संसदेपर्यंत पोहोचलेली जगातील ती पहिली महिला आहे.

पण इतकीच तिची ओळख नाही. रोजच्या जगण्यातील असंख्य अडचणींना सामोरं जात तिनं लोकसेवेचा, देशसेवेचा वसा उचलला आहे.

मारिया गल्सेरनचा (María del Mar Galcerán Gadea, b. October 1977) राजकीय प्रवास वयाच्या १३व्या वर्षापासूनच सुरू झाला.

वयाच्या १८व्या वर्षी ती पीपल्स पार्टीची सदस्य झाली आणि तेव्हापासूनच राजकारणातून लोकसेवा हे ध्येय तिनं ठरवलं. पीपल्स पार्टी ही स्पेनमध्ये कन्झर्वेटिव्ह म्हणून ओळखली जाते.

तिच्या या प्रवासात काही काळ मारियाने व्हॅलेंशियाच्या अध्यक्षांसोबत इंटर्नशिप केली. या इंटर्नशिपनंतर तिला कायदा विषयात रस आहे हे तिच्या लक्षात आलं.

राजकारणात ३० वर्षांहूनही अधिक काळाचा अनुभव असणाऱ्या मारियानं व्हॅलेन्शियामधील डाऊन्स सिंड्रोम असोसिएशनमध्येही चार वर्षं काम केलं आहे. मारियाचा प्रवास तिच्यासारख्या डाऊन्स सिंड्रोम असणाऱ्या असंख्य जणांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

तिच्याही आधी डाऊन्स सिंड्रोम असलेली अँजेला बॅशिलर ही २०१३मध्ये स्पेनची पहिली सिटी काऊन्सिलर झाली होती.

अँजेला अधिकारपदावर असलेली पहिली डाऊन्स सिंड्रोमग्रस्त महिला होती. तिच्याच पावलावर पाऊल टाकत मारियाही राजकारणात आली.

पण अँजेलाच्याही पुढे जात ती संसदेपर्यंत पोहोचलेली पहिली डाऊन्स सिंड्रोमग्रस्त महिला लोकप्रतिनिधी ठरली आहे.

मात्र आपल्याला आपल्या आजारामुळे ओळखलं जाऊ नये तर एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आपली ओळख असावी इतकी साधी आपली इच्छा असल्याचं मारियानं म्हटलं आहे.

जनुकीय अपसामान्यता असलेल्या व्यक्तींनी मुख्य प्रवाहात यावं यासाठी ती गेल्या काही दशकांपासून प्रयत्न करत आहे.

‘‘गतिमंदत्व असलेल्या व्यक्तीही समाजाच्या प्रगतीमध्ये भरपूर योगदान देऊ शकतात यावर आता समाज विश्वास ठेवू लागला आहे. पण तरीही अजून बराच पल्ला गाठायचा आहे, असं मारियानं तिच्या नियुक्तीनंतर द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

अजूनही लोकांचा गतिमंदत्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आपल्याला बरंच काम करायचं आहे असं मारिया सांगते.

पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून मारिया सातत्याने काम करत होती. त्याचाच परिणाम म्हणजे २०२३मध्ये व्हॅलेन्शियन स्थानिक निवडणुकीत तिला पक्षाच्या यादीत २०वं स्थान मिळालं होतं.

आता लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत प्रवेश केल्यावर स्पेनच्या राज्यघटनेतील ‘अपंग’ (Disminuido) हा शब्द बदलणे हे तिचं सगळ्यांत पहिलं ध्येय आहे.

त्याऐवजी “काही व्यंग असलेले लोक” असा शब्द सिनेटच्या वरिष्ठगृहाने मंजूर केला आहे. ‘अपंग’ हा शब्द आक्षेपार्ह आणि अपमानकारक असल्याचं तिचं म्हणणं होतं.

या सुधारणेमुळे त्यांचे हक्कही वाढले आहेत. १९७८ नंतर स्पेनच्या राज्यघटनेत अशा प्रकारे झालेला हा तिसराच बदल आहे.

घटनात्मक बदल हे तिचे सर्वोच्च प्राधान्य आहे. हा बदल होणे न्याय्य आणि आवश्यक आहे असंही मारियानं म्हटलं आहे.

लहानपणापासूनच ‘वेगळी’ असल्याच्या वेदना आपल्याला माहिती आहेत, टीनएजमध्ये सातत्याने सगळीकडे ‘नाकारले’ गेल्याचाच अनुभव होता, असं मारिया सांगते. खरंतर या वयात मित्र हेच आपलं सगळं विश्व असतं.

आपल्या आजूबाजूला खूप मुलेमुली होती. पण खरे मित्र मात्र कुणीच नव्हते. याला कारण सामाजिक मानसिकता असल्याचं मारिया म्हणते. तिच्या प्रत्येक निर्णयात तिच्या कुटुंबीयांनी मात्र तिला मनापासून साथ दिल्याचं ती आवर्जून सांगते.

पण आपल्याला आलेले नकारात्मक अनुभव यापुढे कोणालाही येऊ नयेत यासाठी ती झटते आहे. त्यामुळेच मुक्त आणि समानतेच्या वातावरणात, कोणत्याही भेदभावाशिवाय दिव्यांग व्यक्तींना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी ती प्रयत्नशील आहे.

महिला आणि दिव्यांग मुलींच्या विशेष गरजांकडे लक्ष देण्याचं महत्त्वही ती अधोरेखित करत आहे.

आपल्यातील कमतरता हीच आपली ताकद बनवून उत्तुंग झेप घेत इतिहास घडवणाऱ्या मारियाचा प्रवास अगदी धडधाकट असणाऱ्यांसाठीही एक प्रेरणादायी धडा आहे.

--------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT