doing nothing esakal
साप्ताहिक

तणाव व्यवस्थापनासाठी कधीतरी ‘काहीही करू नका’ असं आता तज्ज्ञ का म्हणू लागलेत? तुम्हाला जमतं का हे ‘काहीही न करणं’...?

‘माझी सगळ्यात आवडती गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे काहीही न करणं - डुइंग नथिंग!’

साप्ताहिक टीम

इरावती बारसोडे

फ्रेंड्स या जगप्रसिद्ध मालिकेतील जोयीची भूमिका केलेल्या मॅट ल’ब्लांक या अभिनेत्याच्या मुलाखतीचा एक छोटा व्हिडिओ मध्यंतरी सोशल मीडियावर फिरत होता. त्यात मॅट म्हणतो, ‘माझी सगळ्यात आवडती गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे काहीही न करणं - डुइंग नथिंग!’

काय मस्त कल्पना आहे ना! डुइंग नथिंग... काहीही न करणं. तुम्हाला जमतं का हे ‘काहीही न करणं’...?

‘काहीही न करणं’ हीसुद्धा एक कला आहे, अशी एक संकल्पना पुढं येऊ लागली आहे. निक्स (Niksen) म्हणून ओळखली जाणारी ही संकल्पना डच आहे. परदेशांमध्ये तर फिटनेस क्लबमध्ये निक्स क्लास आयोजित केले जातायत. सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये तणाव व्यवस्थापनासाठी कधीतरी ‘काहीही करू नका’ असं आता तज्ज्ञ म्हणू लागले आहेत.

पण ‘काहीही करायचं नाही’ म्हणजे काय करायचं? कारण आपण काहीना काही करतच असतो. झोपतो तेव्हासुद्धा मेंदू जागाच असतो. त्यामुळे या संकल्पनेची नेमकी व्याख्या करणं जरा कठीणच आहे. पण निक्स ः एम्ब्रेसिंग द डच आर्ट ऑफ डुइंग नथिंग या पुस्तकात लेखिका ओल्गा मेकिंगनं यांनी व्याख्या केलीये ती साधारण अशी - निक्स म्हणजे डोळ्यासमोर कोणताही उद्देश ठेवून एखादी कृती करायची नाही. मग ते चित्रपट बघणं असो, किंवा सोशल मीडियावर स्क्रोल करणं असो. खातानासुद्धा आपण, या पदार्थामुळं आपलं वजन वाढणार आहे का असे विचार करत असतो. थोडक्यात, आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीची काहीतरी निष्पत्ती आपल्या डोक्यामध्ये असते. म्हणूनच निक्स म्हणजे कृती करताना निष्पत्तीचा विचार न करणे.

युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल लँकशायरमध्ये सायकॉलॉजिस्ट असलेल्या सँडी मान यांच्या संशोधनानुसार, तुम्ही काहीही न करता स्वस्थ बसला, की साहजिकच दिवास्वप्नं पाहायला लागता. पण याच दिवास्वप्नांमुळे सर्जनशीलता वाढते, नव्या कल्पना सुचतात, त्यांना खतपाणी मिळतं; प्रश्नांची उत्तर सापडतात. पण त्यासाठी पूर्ण स्वस्थता मात्र आवश्यक आहे, असं मान म्हणतात.

हल्ली आपण नेहमीच कसल्यातरी घाईमध्ये असतो. आपल्याला सतत काहीतरी करायचं असतं... हे झालं की ते, ते झालं की हे... यादी संपतच नाही. आपण स्वस्थ बसतच नाही, बरं बसलोच तर डोक्यातले विचार थांबायचं नाव घेत नाहीत. गाडीवरून ऑफिसला जाताना ऑफिसचे विचार, घरी जाताना घरच्या कामांचे विचार डोक्यात धावतच असतात. मेकिंग म्हणतात त्याप्रमाणे, कामातून ब्रेक हवा म्हणून टीव्हीवर आपण चॅनेल बदलत राहतो, किंवा गाणी ऐकताना पुढचं गाणं लावत राहतो तेव्हासुद्धा आपल्या डोक्यात मनोरंजनाचा उद्देश असतो.

या भागमभागीमधून ब्रेक हवा हे सगळ्यांना कळतं, पटतंही. पण ब्रेक घ्यायचा म्हणजे काय करायचं? कधी खिडकीतून उगाचच बाहेर बघत बसलाय का तुम्ही? किंवा काही बघायला तरी कशाला हवं? नुसतं डोळे मिटून पडावं आणि कुठल्याही ठरावीक गोष्टीवर लक्ष एकाग्र न करता विचारांना स्वैर भटकू द्यावं. हे जमलं तर मग जमेल तुम्हाला कदाचित ‘काहीही न करणं’. याला काहीजण ‘काय हा आळशीपणा’ असं म्हणतीलही. पण तो आळशीपणा नसेल, स्वस्थपणा असेल! थकलेल्या मेंदूला रिचार्ज करायचा एक मार्ग असेल!

मग, हे ‘काहीही नं करणं’ करून पाहूया का? थोडं स्वस्थ बसून बघूया का?

---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT