Scars Of 1947: Real Partition Stories Sakal
प्रीमियम आर्टिकल

Scars Of 1947: Real Partition Stories : फाळणीतील वेदनांच्या सत्यकथा

द्विराष्ट्रवादाच्या संकल्पनेतून मुस्लिम लीगने देशाच्या फाळणीची मागणी केली आणि तत्पूर्वी भारतात कधीही न आलेल्या रॅडक्लिफ या ब्रिटिश वकिलाने भारत आणि पाकिस्तानच्या सीमारेषा निश्चित केल्या.

सकाळ वृत्तसेवा

- राहूल गोखले

द्विराष्ट्रवादाच्या संकल्पनेतून मुस्लिम लीगने देशाच्या फाळणीची मागणी केली आणि तत्पूर्वी भारतात कधीही न आलेल्या रॅडक्लिफ या ब्रिटिश वकिलाने भारत आणि पाकिस्तानच्या सीमारेषा निश्चित केल्या.

त्यानंतर प्रचंड प्रमाणावर स्थलांतर सुरु झाले आणि हिंसाचार, महिलांवर बलात्कार अशी निंदनीय कृत्ये सीमेच्या दोन्ही बाजूंना सर्रास घडली. जे बचावले त्यांच्या मनात फाळणीच्या आठवणी इतक्या वर्षांनीदेखील पुसल्या गेलेल्या नाहीत.

पत्रकार-खासदार राजीव शुक्ला यांनी hdjmdlgl पुस्तकात संकलित कहाण्यांतून याचा प्रत्यय येईल. या कहाण्या काल्पनिक नाहीत. फाळणीचे चटके सोसलेल्यांच्या या कहाण्या आहेत. पत्रकार म्हणून शुक्ला यांना पाकिस्तानला भेट देण्याची संधी अनेकदा मिळाली.

त्यामुळे फाळणीनंतर पाकिस्तानात स्थलांतर करावे लागलेल्या काहींशीही त्यांना संवाद साधता आला. पूर्वाश्रमीच्या मिनी चोक्सी यांना ते भेटले. ऐंशी वर्षांच्या असलेल्या या महिलेचे तरुणपण मुंबईत गेलेले; फाळणीपूर्व भारतात नौदलात कार्यरत असलेले मोहमद असगर खान यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्या पाकिस्तानात स्थायिक झाल्या.

मात्र इतक्या वर्षांनीदेखील त्यांना आस होती ती मुंबईची माती कवटाळण्याची. फाळणी झाल्यांनतर काही काळ घर सोडावे लागेल; पण देश नाही या अपेक्षेने लाहोरच्या `मॉडेल टाऊन’ या उच्च्भ्रू वस्तीत वस्तीत राहणारे रामलाल कुमार थोडे कपडे आणि दहा हजार रुपयांसह भारतात आले ते कायमसाठी.

लाहोरमधील घर आणि तेथे जमिनीत पुरून ठेवलेले दागिने-ज्यांचे मूल्य वर्तमानात दोनशे कोटीचे झाले असते-. यांच्या त्यांच्या आठवणी ताज्या होत्या. दागिने सोडवून आणावेत म्हणून त्यांनी शुक्ला यांच्यामागे तगादा लावला होता.

फाळणीच्यावेळी कुमार यांनी आपले काही दागिने आपल्या मेहुण्याच्या सामानाबरोबर भारतात पाठविले; पण मेहुण्याने ते लंपास केले ही बाजूही लेखकाने सांगितली आहे. लाहोरमधील उच्चभ्रू घरांमधील हिंदूंना भारतात येणे अपरिहार्य झाल्याने त्यांची घरे मोकळी झाली आणि भारतातून पाकिस्तानात गेलेल्यांनी ती घरे नियम धाब्यावर बसवून काबीज केली.

त्यासाठी तेथील अधिकाऱ्यांना भरभक्कम लाचही दिली. हिंदू-मुस्लिम संघर्षातदेखील मानवी स्वभावाचे हे कंगोरे दबलेले नव्हते, हे लेखक दाखवून देतो. त्याउलट, सहअस्तित्व मान्य करून अनेक वर्षे एकोप्याने राहिलेल्या हिंदू आणि मुस्लिम कुटुंबीयांनी हिंसाचाराच्या वातावरणात परस्परांचा बचाव कसा केला, याच्याही कहाण्या सांगितल्या आहेत.

बँकेत नोकरी करणारे फकीरचंद आनंद यांच्या लाहोरमधील घरावर पठाणांनी हल्ला केला, तेव्हा त्यांचा बचाव मौलवी अहमद व त्यांच्या पत्नीने केला होता. या आनंद यांनी अखेरीस लाहोर सोडून दिल्लीला येण्याचे ठरविले. मुंबईत शिक्षणासाठी आलेल्या सय्यद इम्तियाजचे कुटुंबीय नाईलाजाने जालंधरमधून पाकिस्तानात जावे लागले.

त्यांचा शोध घेताना इम्तियाजला आलेले अनुभव लेखकाने कथन केले आहेत. रेल्वेने निघालेला असता झाशी रेल्वे स्थानकावर डब्यात घुसलेले समाजकंटक इम्तियाजच्या पायातील पेशावरी चपला पाहून त्याला लक्ष्य करतील या चिंतेने स्वतःच्या चपला त्याला देऊन आपण अनवाणी राहिलेले गोपाळ दास यांची कहाणी रोमांचक.

लेखकाने ऐन फाळणीच्या धुमश्चक्रीतदेखील जागृत असलेल्या माणुसकीच्या हकीगतींवर प्रकाश टाकला आहे. इंदरकुमार गुजराल यांचे वडील अवतार नारायण गुजराल, डॉ मनमोहन सिंग, मदनलाल खुराणा, ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर, महमूद हक्क अल्वी अशा अनेकांच्या कहाण्यांमधून लेखकाने फाळणीने उद्‍ध्वस्त झालेल्या आणि तरीही नवीन उमेदीने उभ्या राहिलेल्यांच्या हकिगती मांडल्या आहेत.

ल्यालपूर येथील मनोऱ्यावर कोरलेले संस्कृत श्लोक, वैदिक मंत्र मिटविण्यात आलेले नाहीत; तेथून जवळच प्रभू रामचंद्राचे मंदिर शाबूत असल्याचा उल्लेख लेखकाने केला आहे. फाळणीने सर्वस्व गमावलेल्यांच्या मनात वेदनाही आहेत;

पण आपल्या फाळणीपूर्व वास्तव्याच्या ठिकाणाविषयी ओढही कायम आहे, हे सांगणाऱ्या या कथा आहेत. त्यानिमित्ताने मोहम्मद अली जीनांचे ‘सेक्युलर’ पाकिस्तानचे असणारे स्वप्न त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी कसे मातीस मिळविले, यावरही लेखकाने बोट ठेवले आहे.

पुस्तक: स्कार्स ऑफ १९४७: रिअल

पार्टिशन स्टोरीज

लेखक : राजीव शुक्ला

प्रकाशक: पेंग्विन व्हायकिंग

पाने: १९२; मूल्य: रुपये ४९९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

'असे' असेल पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान; KDCA कडून प्राथमिक आराखडा तयार, 'या' एमआयडीसीत 30 एकरांत साकारणार

DY Chandrachud: ''कशाची सुनावणी घ्यायची अन् कशाची नाही, हे एखादा पक्ष ठरवू शकत नाही'' उद्धव सेनेच्या आरोपांवर चंद्रचूड संतापले

Ratnagiri Assembly Election Results : साडेनऊ हजार मतदारांनी नाकारले उमेदवार

Umpire Jobs : क्रिकेट अंपायर बनायचं आहे? जाणून घ्या प्रक्रिया आणि मिळणारी लाखोंची पगार

SCROLL FOR NEXT