रिअल इस्टेटमधली गुंतवणूक Esakal
Home Loan

Akshayya Tritiya Special रिअल इस्टेट - अक्षय्य गुंतवणुकीचे क्षेत्र...

मागील पिढीचा विचार करता या गुंतवणुकीचे स्वरूप बदललेय. मालमत्तेत Real Estate प्राधान्याने गुंतवणूक होताना दिसते.

नरेंद्र जोशी

आपण नेहमीच म्हणतो की, आज दोन पिढीतील अंतर तुलनेने खुप कमी झालेले आहे. ही तुलना आपण ज्या-ज्या गोष्टींच्या आधारे, मोजमापाने करतो, त्या गोष्टी देखील फार वेगळ्या नसतात. त्या अगदी आपल्या रोजच्या आयुष्यातील सवयीच्या असतात. जसे की, वेतन, विचारसरणी, निर्णय क्षमता, सहनशीलता, नातेसंबंध, आदी अशा अनेक गोष्टी सांगता येतील त्यात. Akshayya Tritiya Article about Investment in Real Estate

मात्र एक गोष्ट आहे, ज्याची तुलना होऊ शकत नाही, ती म्हणजे गुंतवणूक Investment. मागील पिढीचा विचार करता या गुंतवणुकीचे स्वरूप बदललेय. मालमत्तेत Real Estate प्राधान्याने गुंतवणूक होताना दिसते. चला या अक्षयतृत्तीयेच्या निमित्ताने माणूस आणि मालमत्ता या दोन्ही मधील मंगलदायी गुंतवणूकीचा निर्णय घेऊयात...

आजच्या दोन पिढीतील अंतर खुप कमी झालेय, नव्हे ते दोन एक वर्षांवर येऊन ठेपलेले आहे. असे आपण बोलताना नेहमी या प्रत्ययाचा संदर्भ देत असतो. ही गोष्ट खरी आहे. हा बदल ज्ञान , विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आणला आहे. नव्या गरजांच्या अनुषंगाने ही जीवनशैली देखील बदलते आहे. जीवनशैली आणि गरजांच्या अनुरूप सोयी-सुविधा बदलत आहेत. हा सारा बदल जसा आयुष्याच्या विविध क्षेत्रात होताना दिसतो आहे. तसा बदल गुंतवणुकीच्या क्षेत्रातही झालेला आहे. 

पारंपरिक गुंतवणूक
सोने, चांदी. मुदतठेवी, भविष्य निर्वाह निधी आदी बाबींमध्ये लोक गुंतवणूक करतात. त्याही पुढे जाऊन काही अंशी लोक म्युच्युअल फंड व शेअर बाजारामधील गुंतवणूक करतात. सोने, चांदी, आणि शेतजमिनीतील पारंपरिक गुंतवणूकीला अनेक पर्याय उभे राहिले आहे. त्याकडे देखील लक्ष देण्याची आज खरी गरज आहे. मधून- मधून सोने चांदीच्या भाव पुन्हा एकदा `भाव` खाल्लेले दिसतात. सोने-चांदी मधील गुंतवणूक आज रोजीला फायद्याची ठरताना दिसत असली तरी, अशा गुंतवणूकीबाबत दूरगामी विचार होणे आवश्यक आहे.

सोने, चांदी मधल्या गुंतवणुकीस आपल्या देशात पारंपरिक गुंतवणुकीसह भावनिक गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. या जोडीला पीपीएफ, मुदतठेवी आहेतच... मात्र या सर्वांमध्ये परताव्याची म्हणावी तशी हमी आहे काय. यांचा परतावा आज जागतिक व देशपातळीवरील अर्थव्यवस्थेच्या चढउताराशी जोडला जाताना दिसतो आहे. त्याला आपण खरी गुंतवणूक म्हणू शकतो का, ज्यातून आपल्याला खरंच काही तरी फायदा देणारा परतावा मिळणार आहे ती गुंतवणूक.

आपण रोजचे रोज सोने विकून गुंतवणुकी मधला फायदा घेतो का, तशी आपली मानसिकता आहे का..?. नाही ना, मग ती गुंतवणूक कशी असा प्रश्न पडणे साहाजिकच आहे. गुंतवणूकीचा विचार करताना प्राधान्याने आर्थिक क्षेत्राचा विचार, निरीक्षणे, अभ्यास हा आलाच. मात्र अशा परिस्थितीत चांगला परतावा देणारी गुंतवणूक करणे हिताचे ठरणार आहे. 

रिअल गुंतवणूक 

याउलट रिअल इस्टेट क्षेत्राचा विचार केला तर आज काही विकसनशील शहरांमध्ये वा विकसित शहरांमध्ये केलेली गुंतवणूक काही अंशी होईना भविष्यात फायद्याची ठरू शकणार आहे. याबाबत फार शंका घेण्याचे कारण नाही. महाराष्ट्र राज्याचा विचार करता टिअर टू व टिअर थ्री सिटीजमधील विकास प्रक्रिया लक्षात घेता तिथेही गुंतवणुकीला अधिक चांगला परतावा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्यात पुण्यासह नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर या व इतर शहरांचा समावेश होतो. 

रिअल इस्टेटमधील पर्याय 

आपण रिअल इस्टेटमधील गुंतवणूकीचा विचार करणार असाल तर तो योग्य आहे. रिअल मध्ये असलेल्या गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार केला असता इथे असलेले पर्याय मर्यादित असले तरी, त्यातून परतावा हा निश्चित आणि भरीव असलेला दिसून येतो.

या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये घर, जागा, जमिन, प्लॉट, आदी पर्याय आहेत. याशिवाय काळानुसार या पर्यायांमध्ये देखील अनेक नव्या पर्यायांची भर पडलेली दिसून येते. ज्यामध्ये प्रकल्पात संयुक्त भागीदारी, इक्विटीव्दारे भागीदारी आदी... या पर्यायांचा अभ्यास करून गुंतवणूक केल्यास त्यातून हमखास असा परतावा असलेला दिसेल.

प्लॉट, फ्लॅट व व्यावसायिक जागांमधील गुंतवणूक देखील चांगला परतावा देऊ शकतात. सातत्याने व हमखास परतावा देणारी गुंतवणूक म्हणजे फ्लॅट भाड्याने देण्याचा पर्याय चांगला ठरू शकतो. मात्र ही गुंतवणूक कुठे करायची आणि किती करायची ही गोष्ट मात्र गरजेप्रमाणे व व्यक्तिगत आहे.

हे देखिल वाचा-

रेरा आणि जीएसटीमुळे निश्चिंती
साधारणपणे मागील दोन वर्षे  ही बांधकाम क्षेत्रासाठी उलाढालीचे व एकूणच लक्षणीय परिवर्तनाचे ठरली. नोटबंदी, रेरा, जीएसटी सारख्या केंद्र शासनाच्या निर्णयाने हे क्षेत्र पुरते ढवळून निघाले. जीएसटीपेक्षाही रेरा कायद्यामुळे घरखरेदीचा व्यवहार अधिक स्पष्ट व खुला झाला. घर खरेदीदाराने दिलेली रक्कम एका विशिष्ट अकाऊंटमध्ये जमा केली जावी, ती रक्कम केवळ प्रकल्पासाठीच, फ्लॅटच्या उभारणीसाठीच खर्च केली जावी, घराचा ताबा देण्याची तारीख करारनाम्यात नोंदविणे सक्तीचे, वेळेत घराचा ताबा दिला नाही तर नुकसान भरपाई देणे..., घराच्या विक्रीनंतर पाच वर्षापर्यंत देखभाल व दुरूस्ती सेवा द्यावी लागेल.. या व रेरामधील अशा अनेकविध कायदेशीर तरतुदींनी विकसकावर कायदेशीर बंधने आणली आहेत.

तसे केले नाही तर मोठी शिक्षा व दंडाची तरतूद या कायद्यात आहे. तर जीएसटीने या व्यवसायाला आर्थिक शिस्त आणली. त्यामुळे सामान्य ग्राहकाचे हित जोपासले गेले आहे. त्यामुळे ग्राहक अधिक बांधकाम क्षेत्रातील व्यवहारांबाबत अधिक निश्चिंत झालेला दिसतो आहे.

तुम्ही म्हणाल या गुंतवणूकीचा आणि ती मंगलमयी असण्याचा काय संबंध. जिथे आपण काही तरी चांगले पेरल्यानंतर चांगल्या फळाची अपेक्षा करतो, तसेच इथेही चांगल्या व फलदायी गुंतवणूक केली तर त्यातून मिळणारा फायदा देखील चांगली व फलदायीच असेल. तेव्हा तुम्हीही करा अक्षयतृत्तीयेच्या निमित्ताने करा... मंगलमयी गुंतवणूक या सणांच्या काळात अक्षय्य गुंतवणूक... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT