घर खरेदीचं स्वप्न Esakal
Home Loan

Home Buying पाच-दहा वर्षांचे आर्थिक नियोजन लक्षात घेऊनच करा घर खरेदी

घर खरेदी करणाऱ्यांना सरतेशेवटी एक सांगू इच्छितो की गुगल व फेसबुक कोणत्याही घराविषयी माहिती देऊ शकतात. मात्र प्रकल्पाला भेट देऊन, तसंच लोकांना भेटूनच तुम्ही जे घरखरेदी करणार आहात त्याविषयी नेमकी माहिती मिळू शकते

सकाळ डिजिटल टीम

घर हे भारतीयांचे स्वप्न असते.. तो या स्वप्नपर्तीसाठी आयुष्यभर मेहनतीने जमविलेली पुंजी खर्ची घालतो. मेहनतीच्या कमाईने घेतलेल्या त्या घराच्या चार भिंतींच्या आत त्यांच्या आयुष्यातील सुख- दुखाः चे असंख्य क्षण घडलेले असतात. Decide why want to buy home to fulfill your dreams

घरखरेदीसंबंधाने Home Buying या नवीन वर्षाची सुरूवात सकारात्मक झालीय. रिअल इस्टेट Real Estate क्षेत्रात खूप वर्षांनी सकारात्मक हालचाल होतेय. अनेक जण या वर्षाकडे (२०२३) आशेने पाहताहेत. घरखरेदी एकतर निवासासाठी, भविष्यात दर आणखी वाढतील वा गुंतवणुकीसाठी Investment घेतले जाते. कोणत्याही महागड्या स्मार्ट फोनचं पाहा... बाजारात आल्यानंतर सहा महिन्यात दर काही अंशी का होईना कमी होतात, एक ते दोन वर्षात त्याचे दर निम्म्याने कमी होतात. घर हे एकमेव उत्पादन आहे ज्याचे दर प्रकल्प जाहीर झाल्यापासून दर वाढलेलेच आपण पाहत आलेलो आहोत. मागील चार- पाच वर्षांचा कालावधी याला अपवाद असू शकतो. 

आज वन आर.के. असो किंवा आलिशान ड्युप्लेक्सचा ग्राहक, त्यांच्यासाठी अनेक मार्गांनी ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. स्पर्धा मोठी आहे. त्यात आता अडचण अशी झाली आहे की, तुमच्याकडे अनेक पर्याय असतात तेव्हा तुम्ही अंतिम निवडीसाठी आणखी काही पर्याय मिळण्याची वाट पाहाता... ही ग्राहकाची मानसिकता असते, घरखरेदीदार ग्राहकही या नियमाला अपवाद नाहीत. भारतीय खरेदीदाराची आणखी साधारण मानसिकता म्हणजे... चांगली सवलत मिळाली तर आपल्याला शंका वाटायला लागते. हा माणूस इतक्या कमी दरात का घर विकतोय म्हणून..? आणखी थोडा वेळ थांबलो तर तो कदाचित आणखी दर कमी करेल. ..? 

आपल्याला नेमकं कसं घर हवंय या बाबतीत ग्राहक बहुतांश वेळा गोंधळेलेले असतात. ही वस्तुस्थिती आहे. नवी पिढी हुशार आहे त्यामुळे सगळीकडून माहिती घेते. मात्र त्या माहितीचं तुम्ही नेमकं काय करता यावरून तुम्ही खरंच हुशार ग्राहक आहात का नाही हे ठरतं… 

घर खरेदी करणाऱ्यांनी फक्त इंटरनेटवरून एखाद्या प्रकल्पाविषयी किंवा बांधकाम व्यावसायिकाविषयी किंवा भोवतालच्या प्रकल्पाविषयी माहितीचा उपयोग होतोच. पण त्यासाठी व्यवहारासंबंधाने तर्कशुद्ध दृष्टिकोन असला पाहिजे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता तुम्ही विचाराल की, घरखरेदी करण्याचा तर्कशुद्ध दृष्टिकोन काय असतो..? म्हणजेच तुमच्या गरजा नेमक्या काय आहेत..?  हे आधी ठरवणे व त्यासाठी तुम्ही आधी घरखरेदी का करताय ..?  हे स्पष्ट असलं पाहिजे.

हे देखिल वाचा-

बहुतेक लोक सांगतील की त्यांना स्वतःच्या मालकीचं घर हवंय म्हणून खरेदी करतात. पण तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की पुढील पाच वर्षांचे आपले नियोजन काय आहे..?, पुढील दहा वर्षांचे नियोजन काय आहे, खरंच कुठे स्थायिक व्हायचं आहे आपल्याला. ..?  आपण जसं नियोजन करतो तसंच सगळं होत नाही हे मान्य असलं तरीही नियोजनाचं महत्व कमी होत नाही.. तुम्ही किती वर्षं त्या घरात राहणार आहात तसंच तुम्ही त्या घरात कधी राहायला जाणार याचा विचार घराची निवड करताना महत्वाचा असतो. तुम्ही घरासाठी जे पैसे खर्च करणार आहात त्याच्याशी याचा सरळ संबंध असतो. 

तुम्ही या सगळ्या पायाभूत सुविधा असतील अशा ठिकाणी घर खरेदी केल्यानंतर तुम्हाला त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात, कारण अशा ठिकाणी घरे महाग असतात. त्याऐवजी तुम्हाला दोन-तीन वर्षांनी घर हवं असेल तर तुम्ही या सगळ्या पायाभूत सुविधा नसलेल्या ठिकाणी घर घेऊ शकता जे तुम्हाला बरंच स्वस्त पडेल.. जी घरखरेदीचा निर्णय पक्का झाल्यावर तपासावी लागते. एक लक्षात ठेवा रिअल इस्टेटमध्ये पायाभूत सुविधा नंतर तयार होतात. हे दुर्दैवी असलं तरीही, पुणे व भोवतालच्या परिसरात गेल्या अनेक दशकांपासून असंच होत आलं आहे.

याशिवाय आणखीही बऱ्याच गोष्टींची चेकलिस्ट बनवावी लागते... जी घरखरेदीचा निर्णय पक्का झाल्यावर तपासावी लागते. घर,बजेट, सुविधा, तसंच बांधकाम व्यावसायिकाच्या सर्व पैलूंकडे पाहा, त्यानंतर खरेदी करणं योग्य किंवा अयोग्य ते ठरवा. तुम्ही जेव्हा भोगवटा प्रमाणपत्रं वगैरे सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता झालेले एखादं तयार घर खरेदी करता, तेव्हा बांधकाम व्यावसायिक इमारतीची देखभाल तसेच सोसायटीचे हस्तांतरण वगैरे सारख्या कोणत्याही समस्या सोडविण्यासाठी आणखी काही वर्षं तिथे असेल याची खात्री करून घ्या. बांधकामाच्या दर्जाविषयी चौकशी करा.. 

बांधकाम व्यावसायिकाशी, त्यांच्या टीमशी बोला, त्याने पूर्ण केलेल्या प्रकल्पांना भेटी द्या, त्यात राहणाऱ्या लोकांशी बोला, सदनिका खरेदी करताना तसंच ताबा मिळाल्यानंतर बांधकाम व्यावसायिकाचा दृष्टिकोन जाणून घ्या.

घर खरेदी करणाऱ्यांना सरतेशेवटी एक सांगू इच्छितो की गुगल व फेसबुक कोणत्याही घराविषयी माहिती देऊ शकतात. मात्र प्रकल्पाला भेट देऊन, तसंच लोकांना भेटूनच तुम्ही जे घरखरेदी करणार आहात त्याविषयी नेमकी माहिती मिळू शकते. शेवटी घर व सिमेंट/विटांच्या इमारतीत काय फरक असतो तर त्यात राहणारी एकमेकांशी भावनांनी जोडलेली माणसं! तेव्हा सावधपणे घरखरेदीसाठी आगामी वर्षात तुमच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्तीसाठी शुभेच्छा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT