रिडेव्हलपमेंट Esakal
Home Loan

येणारा काळ Re-Development चा

माहिती घेऊन, पारदर्शकता जपत उघड्या डोळ्यांनी व्यवहार केला, तर पुनर्विकासाचा निर्णय आनंददायी आणि भविष्यात समाधान देणारा ठरेल, यात शंका नाही

नरेंद्र जोशी

पुनर्विकासाचा हा मुद्दा गेल्या पाच - सात वर्षांत ऐरणीवर आला आहे. कोणत्याही इमारतीच्या पुनर्विकासाचा मुद्दा चर्चेत आल्यास त्यात राहणाऱ्या सदनिकाधारकांच्या Flat Owners मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. पुनर्विकास केव्हा, का व कसा करायचा हे त्यातले मूलभूत प्रश्न असतात. मला काय मिळणार, यावर त्याची संमती अवलंबून असते. या सर्व प्रश्नांची उत्तरे....Future is in Re-Development of Properties in Construction Sector

पुनर्विकासासंदर्भातील अफवा व वास्तव, नियम व बंधने याविषयी एव्हाना बऱ्याच बाबी स्पष्ट झाल्या आहेत. योग्य पुनर्विकासाला Re-Development चालना देणारे अनेक न्याय-निवाडेही उपलब्ध झाले आहेत. दुसरीकडे बांधकाम व्यावसायिकांनीही Builder गुणवत्तापूर्ण पुनर्विकासाची अनेक उदाहरणे घालून दिली आहेत. माहिती घेऊन, पारदर्शकता जपत उघड्या डोळ्यांनी व्यवहार केला, तर पुनर्विकासाचा निर्णय आनंददायी आणि भविष्यात समाधान देणारा ठरेल, यात शंका नाही. हे केवळ कागदावरचे मत नव्हे, तर पुणे शहरात अशा अनेक इमारती नवं रुप लेवून सदनिकाधारकांना निवारा देत आहेत.

आता तर युडीसीपीआर आणि टीओडी झोन संबंधातील आलेल्या नवीन नियमांमुळे तर सुवर्ण झळाळी आली आहे. नऊ व त्यापेक्षा अधिक मीटरचे रस्ते असलेल्या रस्त्यालगत सोसायटी व इमारतींसमोरच्या रस्ता रुंदीप्रमाणे टीडीआरचा वापरसासंबंधीची समस्या पूर्णपणे सुटलेली नसली तरी त्या संबंधाने हळू हळू नियमांत सुसुत्रता येते आहे. तसेच पेड एफएसआय मिळविता येतो. बेसिक एफएसआय १:१ असून कार्पेट एरिया रेराच्या नियमानुसार मोजला जातो. त्यामुळे कार्पेट बिल्टअप गोंधळ संपुष्टात आला आहे. पुनर्विकास जास्तीत जास्त ग्राहकाभिमुख झाला आहे, त्यात सातत्याने बदलही होत आहेत.

आता शहरातील कुठल्याही झोनचा टीडीआर आपल्या कोणत्याही इतर भागात वापरता येतो. पार्किंगच्या नियमामुळे पार्किंगची उपलब्धता वाढली आहे. टेरेसचा वापर उत्तम रितीने होताना दिसतो आहे. पुरेशा जागेच्या अभावी टेरेसवरती बाग, स्विमिंग पूल होताना दिसतात. पुनर्विकासाला रेरा RERA नियमांमुळे शिस्त आली असून केवळ पुनर्विकास प्रकल्प करणारे विकसक अशी नवीन शाखा बांधकाम व्यवसायात निर्माण झाली आहे. वेळेवर ताबा मिळणे पैसे त्याच प्रकल्पासाठी वापरणे यामुळे ग्राहकांना सुरक्षिता मिळाली आहे.

हे देखिल वाचा-

मेट्रो झोनमुळे पेड एफएसआयसह तीन एफएसआयपर्यंत वापरता येऊ लागला आहे. या सर्वांचा परिणाम मुळे मूळ सभासदाला जास्त क्षेत्र आणि आधुनिक सोयी मिळू लागल्या आहेत. जिथे रस्ते आणि क्षेत्र इत्यादी कारणांमुळे पुनर्विकास करताना विकसकाला प्रकल्प उभारता येणं शक्य होत नाही, त्या ठिकाणी विकसन करायला कोणीही मिळत नाही. परिणामी तेथे सेल्फ डेव्हलपमेंट Property Self Re-Development हा सक्षम संकल्पना पर्याय म्हणून समोर येताना दिसतो आहे. विशेष म्हणजे सोसायट्यांना या कामी सेवा देणारे नवीन व्यवसाय व व्यावसायिक देखील तयार झाले आहेत. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंपन्या यात उतरलेले दिसून येतात. दरम्यान एकूणच काय तर पुण्यात पुढे येणारा काळ पुनर्विकास आणि स्व-पुनर्विकास याकरिता उज्वल आहे यात शंका नाही..

..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT