sakal property today Co-working spaces that are changing office culture sakal
Land

Sakal Property Today : ऑफिस कल्चर बदलणारी को-वर्किंग स्पेसेस

स्टा र्टअप कल्चरमुळे काम करण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलास पूरक ठरणारा ट्रेंड म्हणजे को-वर्किंग स्पेसेस

सकाळ वृत्तसेवा

काम करण्याच्या पद्धतीत झालेल्या आमूलाग्र बदलांच प्रत े िबिब को-वर ं ्किंग स्सच्या ट्र ेंडमधून द पे िसून यते . े उपलब्ध जागचे ा परिणामकारक वापर, मिळणारी लवचीकता आणि व्यवसायासाठी आवश्यक नटवर े ्किंग या वैशिष्ट्यांमुळे जगभरात आणि भारतातही को-वर्किंग स्सपे ेसची संकल्पना पाय रोवताना दिसत आहे.

स्टा र्टअप कल्चरमुळे काम करण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलास पूरक ठरणारा ट्रेंड म्हणजे को-वर्किंग स्पेसेस. सध्या कार्यपद्धतीच्या बाबतीत आणखी एक बदल बघायला मिळत आहे, तो म्हणजे को-वर्किंग स्पेसला प्राधान्य दिले जात आहे. म्हणूनच हा नवा ट्रेंड नेमका काय आहे, यावर एक प्रकाशझोत...

जगभरात वाढीस लागलेल्या स्टार्टअप कल्चरमुळे अनेक नव्या व्यवसायांचा उदय होताना पाहायला मिळतो आहे. हे नवे व्यवसाय पारंपरिक व्यवसायाच्या व्याख्येत न बसणारे असल्यामुळे व्यवसाय करण्यास अमुक एवढीच जागा हवी, अशी गरज उरलेली नाही. अशा अनेक छोट्या आणि नव्या व्यावसायिकांसाठी को-वर्किंग स्पेसची संकल्पना वरदान ठरत आहे.

ज्या व्यवसायांची घडी उत्तम बसली आहे आणि विस्ताराच्या दिशेने प्रवास सुरू आहे, त्यांच्यासाठीही कॉस्ट ऑप्टिमायझेशन स्ट्रॅटेजी म्हणून को-वर्किंग फायदेशीर ठरत आहे. म्हणूनच को-वर्किंग स्पेस म्हणजे काय, त्याचे फायदे आणि त्याचे आर्थिक गणित हे प्रत्येक नवउद्यमीने, तसेच व्यावसायिकाने समजून घेतले पाहिजे.

को-वर्ग स्पेसची वाढती लोकप्रियता को-वर्किंग स्पेसमध्ये काम करणाऱ्यांना ऑफिस सांभाळण्याचा कसलाच त्रास होत नाही. त्यामुळे व्यावसायिकांवर येणारा ताण मोठ्या प्रमाणात कमी होतो. शिवाय, एका दिवसाच्या, एका आठवड्याच्या किंवा एका महिन्याच्या भाडेकरारावर अगदी एकच डेस्क किंवा क्युबिकल भाडेतत्त्वावर घेण्याची मुभाही यात असते. त्यामुळे खर्चातही कपात होण्यास मदत होते.

स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार, २०१० मध्ये जगभरातील को-वर्किंग स्पेसची संख्या केवळ ६०० इतकी होती. २०१९ पर्यंत १८,२८७ वर असलेली ही संख्या कोविडनंतर अचानक वाढून २०२२ अखेर २८,५५२ वर पोहोचली. २०२४ पर्यंत ती जवळपास ४२,००० चा टप्पा ओलांडेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही आकडेवारीच को-वर्किंग स्पेसची लोकप्रियता आणि उपयुक्तता सांगण्यास पुरेशी आहे. या लोकप्रियतेमागची काही ठळक कारणे

स्टार्टअप कल्चर

आयटीसह इतर अनेक क्षेत्रांशी संबंधित तंत्रज्ञानाधारित स्टार्टअप्स पुण्या-मुंबईसह देशातील अनेक शहरांत स्थापन झाले आहेत. लहानशा को-वर्किंग स्पेसमधून सुरुवात करून युनिकॉर्न झालेले स्टार्टअप्सही आज पाहायला मिळतात. परवडणारे दर, कामातील लवचीकता आणि उत्तम नेटवर्किंगची संधी या वैशिष्ट्यांमुळे स्टार्टअप्स को-वर्किंग स्पेसला पसंती देताना दिसतात.

गिग इकॉनॉमीचा उदय

दैनंदिन आयुष्यात भेडसाविणाऱ्या अडचणी सोडविणारी स्टार्टअप्स गेल्या काही वर्षांत उदयास आली. या कंपन्यांना मनुष्यबळ लागते, पण ते विविध शहरांत विखुरलेले असते. शिवाय, ते कायमस्वरूपी नसते. या प्रकारच्या व्यवस्थेस गिग इकॉनॉमी म्हणतात. या कंपन्यांना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत कमी जागा लागते. ती गरज को-वर्किंग स्पेसच्या माध्यमातून पूर्ण होते.

कॉर्पोरेट कं पन्यांचा प्रतिसाद

स्टार्टअप कंपन्यांप्रमाणे कॉर्पोरेट कंपन्याही कॉस्ट ऑप्टिमायझेशच्या दृष्टीने स्वतःचे ऑफिस घेण्याऐवजी को-वर्किंग स्पेस घेण्याकडे वळताना दिसत आहेत. कमी खर्चात एकाच वेळी अनेक शहरांत कंपनीचा विस्तार करणे यामुळे शक्य होत.

५० जणांची क्षमता असणारी को-वर्ग स्पेस

को-वर्किं ग स्पेसचे फायदे लक्षात घेता, आपणही अशा व्यवसायाची सुरुवात करावी, असा विचार मनात येणे साहजिक आहे. सर्वसाधारण कल्पना येण्यासाठी ५० जणांची क्षमता असणारी को-वर्किं ग स्पेस कशी सुरू करता येईल, याची ढोबळ आखणी : प्रत्येक सदस्यास काम करण्यासाठी पुरेशी जागा असेल, याचा विचार प्रामुख्याने करायला हवा. साधारण ८० ते १०० स्क्वेअर फू ट जागा प्रत्येकासाठी असावी.

याशिवाय कॅ फे टेरिया, मीटिंग रूम, रेस्ट रूम यांचाही विचार करायला हवा. स्पेस प्लॅनरच्या मदतीने जागेचे योग्य या अंदाजानुसार, तुम्हाला ५० जणांची क्षमता असणारी को-वर्किंग स्पेस सुरू करण्यासाठी ५,०००-५,५०० स्क्वेअर फू ट जागेची आवश्यकता भासू शकते.

ओपन वर्क स्पेस २० व्यक्तींना प्रत्येकी ८० ते १०० स्क्वे. फू ट जागा १,६०० ते २,००० स्क्वे. फू ट क्युबिकल्स प्रत्येकी चार वर्कस्टेशन्सची ५ क्युबिकल्स १,६०० ते २,००० स्क्वे. फू ट मीटि ंग रूम २ मीटिंग रूम्स, एका रूममध्ये ६ व्यक्ती, ५० स्क्वे. फू ट प्रत्येकी ६०० स्क्वे. फू ट इतर सुविधा रिसेप्शन, कॅ फे टेरिया, रेस्ट रूमसाठी एकू ण जागेच्या ३० ते ४० % जागा १,२०० ते १,६०० स्क्वे. फू ट नियोजन के ल्यास जागेचा पुरेपूर वापर होण्यास निश्चितपणे मदत होईल. ५० जणांची क्षमता असणाऱ्या को-वर्किंग स्पेसची खालीलप्रमाणे विभागणी करता येईल.

को-वर्ग स्पेस कशी सुरू कराल?

जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप इकॉनॉमी म्हणून भारताकडे पाहिले जाते. २०२२ अखेर भारतात तब्बल ८०,१५२ नोंदणीकृत स्टार्टअप्स असल्याची आकडेवारी डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन फॉर इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेडने (डीपीआआयटी) दिली आहे. या संख्येत दरवर्षी १५ ते २० टक्क्यांची भर पडत असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट होते.

देशातील एकूण स्टार्टअप्सपैकी ५२ टक्के स्टार्टअप्स मोठ्या शहरांत, तर ४८ टक्के स्टार्टअप्स टिअर-टू व टिअर-थ्री शहरांत आहेत. स्टार्टअपसाठी भारतात तयार झालेले पोषक वातावरण, फ्रीलान्सरची वाढती संख्या आणि कॉर्पोरेट क्षेत्राचा को-वर्किंगकडे असलेला कल यांचा सकारात्मक परिणाम म्हणून देशात को-वर्किंग स्पेसेचा वेगाने विस्तार होताना दिसतो आहे. स्टार्टअप्सना को-वर्किंग स्पेस पुरविण्याची मोठी संधी साधायची असल्यास उत्तम कमर्शियल जागा घेऊन तीत अशा प्रकारचा व्यवसाय उभा करता येऊ शकतो. या प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे असे..

मार्के ट रीसर्च : संभाव्य ग्राहकांचा प्राधान्यक्रम, या क्षेत्रातील स्पर्धा आणि मागणी समजून घेण्यासाठी कमर्शियल रिअल इस्टेटच्या मार्केटचा व्यवस्थित अभ्यास करा. तुमचे ग्राहक फ्रीलान्सर, स्टार्टअप किंवा कॉर्पोरेट यांपैकी नेमके कोण आहेत, ते जाणून घ्या.

लोकेशनची निवड : सहजपणे पोहोचता येईल असे लोकेशन निवडा. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक सुविधा, रेस्टॉरंट्स आणि इतर अॅमेनिटीज जवळ उपलब्ध असतील, याकडे लक्ष द्या.

डिझाईन आणि लेआऊट : को-वर्किंग स्पेसचे डिझाईन कम्फर्ट देणारे, प्रॉडक्टिव्हिटी वाढविणारे आणि नेटवर्किंगसाठी पूरक असावे. असे करताना ओपन वर्क एरिया, मीटिंग रूम, ब्रेक एरिया, कॅफेटेरिया या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

अॅमेनिटीज : हाय-स्पीड इंटरनेट, वाय-फाय, प्रिंटर, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या ऑफिससाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा आहेत. कॅफे, रिक्रिएशनल स्पेस, जिम, योगा स्टुडिओसारख्या प्रीमियम सुविधाही पुरविण्याचा प्रयत्न करावा.

कायदेशीर बाबी : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व आवश्यक परवानग्या घेत नियमांचे पालन केले जात असल्याची खातरजमा करावी. भाडेकराराचा मसुदा तयार करण्यासाठी वकिलांचे मार्गदर्शन घ्यावे आणि जागेचा मालक म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या समजून घ्याव्यात.

नेटवर्ग इव्न्ट हे ्स : को-वर्किंग स्पेसमुळे मिळूनमिसळून काम करण्याची संस्कृती वाढीस लागते. त्यामुळे नेटवर्किंग इव्हेंट्स, वर्कशॉप, पार्टी यांचे नियमित आयोजन करावे.

मार्केटिग आण ं ि प्रमोशन : सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग आणि पारंपरिक जाहिरात पद्धतींचा वापर करीत तुमच्या को-वर्किंग स्पेसचे प्रमोशन करावे. अधिकाधिक सदस्य आकर्षित करण्यासाठी रेफरल डिस्काऊंट द्यावे.

आर्क नियोजन : झालेला खर्च आणि अपेक्षित फायदा यांचा विचार करून भाडे आकारावे. जागेतून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुमचे सर्व खर्च भागतील या दृष्टिकोनातून नियोजन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT