Decorative Lamps for Home: आपण आपलं घर खूप मायेने आणि प्रेमाने सजवत असतो, घराच इनटेरियर सुद्धा आपण आपल्या पद्धतीने करत असतो, अनेकदा बाजारात अशा अनेक वस्तू येतात ज्यांचा मोह आपल्याला आवरत नाही; पण अशा वस्तू बाजारात खूप महाग मिळतात.
प्रत्येकवेळी आपण या वस्तूंवर पैसे खर्च करूच शकतो असं नाही.. पण तुम्ही अशा काही वस्तू घरी सुद्धा बनवू शकतात हे माहिती आहे का? बाजारात दिसणारे काचेचे, सिरॅमीकचे आणि थ्रेडचे दिवे सध्या सगळ्यांच्या मनात घर करता आहेत, शिवाय हे दिसायलाही खूप सुंदर दिसतात.
तुम्हीही असे दिवे आपल्या घरी लावू शकतात; तेही एकही रुपया खर्च न करता.. आपल्या घरातल्या टाकाऊ गोष्टींनी तुम्ही हे सुंदर दिवे बनवू शकतात, बघूयात कसे?
1. थ्रेड लॅम्प: असे थ्रेड लॅम्प सध्या बाजारात खूप चालता आहेत, यात नवनवीन प्रकार सुद्धा आले आहेत. एक फुगा घ्या आणि त्या फुग्यावर सुतळी किंवा सुताचा दोरा फेविकॉलच्या मदतीने गुंडाळा आणि वाळायला ठेवा. वाळल्यावर फुगा कापून घ्या आणि वरच्या बाजूला एक बल्ब लावून आपल्या बेडरूममध्ये किंवा खिडकीत हॅंग करा.
2. सिरॅमीक लॅम्प: सिरॅमीकच्या वस्तू कधीही उठून दिसतात, जर तुमच्याकडे साइड टेबल असेल तर त्यावर ठेवायला तुम्ही असे लॅम्प घेऊ शकतात. त्याच्यावरती छोट्या कुंदनसारख्या आरशांची डिझाईन खूप सुंदर दिसेल.
3. बॉटल लॅम्प: घरी सॉसच्या किंवा कोल्डड्रिंक्सच्या बाटल्या पडल्या असतील तर त्यांना छान नीट स्वच्छ करून त्यांना तारेने हुकसारखं वरच्या बाजूने पॅक करून त्यात लायटिंग लावू शकतात. जर तुम्हाला क्राफ्टिंग येत असेल तर तुम्ही त्याने या बाटल्या सजवू सुद्धा शकतात.
4. कार्डबोर्ड लॅम्प: राजस्थानी स्टाईलच्या इंटेरियरची फॅशन सगळीकडे सुरू आहे, हे लॅम्प दिसायला खूप ऑथेनटिक आणि सुंदर दिसतात आणि नक्कीच तुमच्या घरात एक रॉयल लुक क्रिएट करतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.