आजकालच्या काळात घर सजावटीस अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातील किचनकडे घराची एक प्राथमिक गरज म्हणून पाहावे लागेल. किचन म्हणजे महिलांचे, आजच्या जमान्यात पुरुषांचे सुद्धा 'विकएंड सेलिब्रेट' Weekend Celebrationकरण्याचे ठिकाण झाले आहे. त्याचे आज मार्केटमध्ये Market विविध प्रकार उपलब्ध आहेत. कन्व्हेश्नल, मॉड्युलर व फ्युजन किचन असे पर्याय आहेत. Marathi Kitchen Decor Tips For your Home
किचनची Kitchen जागा कितीही लहान किंवा मोठी असली, तरीही यातील कुठलेही किचन आपणाला बसविता येते. कन्व्हेशनल म्हणजे साधे सिव्हिल किचन. मॉड्युलर म्हणजे संपूर्ण नॉक डाऊन सिस्टीममधील किचन. ज्यामध्ये तयार कारकेस (कॅबिनेट) अॅक्सेसरीज व शटर्स हे सर्व विविध कंपन्यांच्या डीलर्समार्फत मिळतात.
फ्युजन म्हणजे कन्व्हेश्नल व मॉड्युलर किचनचे Moduler Kitchen कॉंबिनेशन असे संबोधले जाते. यामध्ये प्रामुख्याने किचन हे कामाचा त्रिकोण (वर्किंग ट्रेंगल) या डिझाईनमध्ये केलेले असावे. यामध्ये प्रामुख्याने फ्रिज सिंक व शेगडी या एकमेकांशी निगडित वस्तूंचा वापर नजीकच्या व सहजतेने वापरण्याच्या अंतरात असाव्यात. यामध्ये दोन भाग केले जातात, ते वेट एरिया व ड्राय एरिया.
वेट एरियामध्ये फ्रीजजवळ सिंक व त्याच्याजवळ त्याच्याशी निगडित वस्तूंचे स्टोअरेज (डिटर्जंट- डस्टबीन कप सॉसर, डिश, गार्बेज क्रशर). ड्राय एरियामध्ये आपणास विविध प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या स्टेनलेस स्टील व प्लॅस्टिक कोटेड, कप- सॉसर, डिश होल्डर, नाईफ होल्डर, स्पाइस रॉक, थाळी ड्रॉवर, पूल आउट, कॉर्नरसाठी- करोझल, डी- युनिट, मॅजिक कॉर्नर, ट्रिन कॉर्नर युनिट, मोंडो युनिट, प्रोआर्क करोझल अशी विविध प्रकारची युनिट्स मिळतात. हेवी व्हेसलसाठी व डब्यांसाठी प्लेन ड्रॉवर, ग्रेन ट्रॉली, मेटा बॉक्स, टँडम बॉक्स, पार्टिशन ड्रॉवर्स, वूडन ड्रॉवर्स विथ अॅण्ड विदाऊट गॅलरीज असे असंख्य प्रकार मिळतात.
एक्स्ट्रॉ स्टोअरसाठी टॉल युनिट, लँडर युनिट, टॅबोर युनिट, पेंट्री युनिट, एलिप्स कॉर्नर युनिट असे प्रकार उपलब्ध आहेत. किचनमधील अप्लायन्सेस बघायचे झाले, तर यामध्ये विविध कंपन्यांचे बिल्ट इन हॉब, चिमणी, बिल्ट इन ओव्हन, मायक्रोव्हेव, डिश वॉशर, गार्बेज क्रशर, वॉटर प्युरिफायर, वेट ग्राइंडर, आटा चक्की, मिक्सर, ओव्हन, टोस्टर, ब्लेंडर असे विविध प्रकारचे युनिट ज्या त्या जागी बसवून घ्यावे लागते.
चिमणी घेताना प्रामुख्याने घ्यावयाची काळजी म्हणजे सक्शन कपॅसिटी व नॉईज लेव्हल बघूनच चिमणी घ्यावी, तसेच हॉब घेताना ७० सेंटिमीटर तीन बर्नर किंवा ९० सेंटिमीटर चार बर्नरचा घ्यावा म्हणजे प्रत्येक बर्नर स्वतंत्ररीत्या वापरता येतो. वरील सर्व वस्तू बसवीत असताना त्याचे हार्डवेअरसुद्धा चांगल्या दर्जाचेच घ्यावे म्हणजे स्लायडिंग चॅनल, हिंजेस, स्कटिंग, स्टे युनिटस् वगैरे.
कारण प्रत्येक युनिटचे वर्किंग यावरच अवलंबून असते. यामध्ये हँडेलचेसुद्धा विविध प्रकार मिळतात. एक म्हणजे आपण नेहमी वरून लावतो तो व दुसऱ्या प्रकारामध्ये प्रोफाइल हँडेल- जी सेक्शन, यु सेक्शन व कन्सिल्ड हँडेल. ही हँडेल्स दरवाजाच्या लेव्हलमध्येच बसतात. पहिल्या प्रकारातील हँडेल दरवाजाच्या बाहेर साधारण एक इंच येतात. त्यामुळे पायाला लागण्याची शक्यता व त्याची दुरुस्ती करावी लागते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.