Property Deal Mistakes: वास्तुचे व्यवहार खूप महत्वाचे असतात, आपल्या आयुष्यात या वास्तुंच्या व्यवहारांचे चांगले आणि वाईट दोन्हीही परिणाम होतात. सध्या घर खरेदी करण्याचा दर झपाट्याने वाढतो आहे.
अनेकदा लोकं आपलं जून घर विकून नवीन घर किंवा प्रॉपर्टी विकत घेत असतात काही वेळेस गरज असते म्हणून आपण आपलं घर विकत असतो अशात ते घर विकतांना या चुका कधीही करु नका कारण याचा त्रास सर्वात जास्त तुम्हालाच होईल. चला जाऊन घेऊया या चुका:
घराचे व्यवहार करतांना टाळा या ७ चुका:
१. डिलर किंवा ब्रोकरशी न बोलणे
मार्केटमध्ये अनेक ब्रोकर आहेत जे आपले घर खरेदी करण्यासाठी, विकण्यासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी आपल्याला मदत करु शकतात, अर्थात यात ते आपल्याकडून थोडंसं कमिशन घेतात पण आपला वेळ बाकीच्या प्रोसिजरसाठीची पळापळ सगळंच ते करुन घेतात आणि आपल्याला कमी कष्ट पडतात.
२. चुकीचा एजंट निवडणे
जो एजंट आपण निवडता आहात त्याचा अनुभव गरजेचा आहे शिवाय तो तुम्हाला किती महिन्यात तुमच घर विकून देऊ शकतो हे देखील महत्वाचं आहे, त्याने सांगितलं आहे आणि खूपच वेळ जातो आहे याला काही अर्थ नाही. शिवाय तुमच्या एजंटला तुमच्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती हवी, असं नको की त्याने तुम्हाला कमी किंमत मिळेल आणि तुम्हाला तडजोड करावी लागेल.
३. घर व्यवस्थित न ठेवणे
अनेकदा लोकं जून घर आहे काय दुरुस्त करायचं असं म्हणत डागडुजी न करताच घर विकायला काढतात याचा परिणाम असा होतो की तुमचे घर खराब आहे खूप काम आहे असं सांगून तुमचे व्यवहाराचे पैसे कापले जातात आणि तुमच्या मनातली रक्कम तुम्हाला मिळत नाही.
४. वेळेवर घर न विकणे
रिअल इस्टेटमध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. मालमत्तेच्या किमतीत वेळेनुसार खूप चढ-उतार होत असतात. किंबहुना, सणाचा काळ घर विकण्यासाठी सर्वात योग्य असतो. शिवाय पितृपक्षात कोणी घर विकत घेत नाही शिवाय जे घराच्या आजूबाजूला काही घटना घडल्या जसे की रस्त्यांचे खोदकाम, बस स्टॉप बदलला जाणे यामुळेही किमतीवर परिणाम होऊ शकतो.
६. समोरच्या व्यक्तीशी असभ्य वर्तवणूक
जो तुमच्याकडे घर विकत घेयला आला आहे त्याच्याशी जर तुम्ही नीट वागला नाहीत किंवा बोलला नाहीत तर तो तुमच्याशी व्यवहार कसा करेल? आपणही एखाद्या विचित्र स्वभावाच्या व्यक्तीशी बोलणार नाही, शिवाय त्या व्यक्तीला उगाच खोट्या गोष्टीही सांगू नका. अशाने त्या माणसाचा तुमच्यावरचा विश्वास उडेल.
७. मार्केटिंगला वेळेचा अपव्यय मानणे
घर विकणे हा तुमच्यासाठी खूप मजेदार अनुभव असू शकतो. घर खरेदी करणाऱ्यांसाठीही हा एक अनोखा अनुभव आहे. तुम्ही प्रत्यक्षात आपल्या खरेदी-विक्रीचा कार्यक्रम बनवू शकता. तुम्ही शिकलेली सर्व मार्केटिंग स्ट्रेटेजी वापरुन पहा. जीवनात संयम खूप महत्त्वाचा आहे, यासोबतच खरेदीदाराला वाटले पाहिजे की त्याने मोठे यश मिळवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.