पावसाळ्यापूर्वी घराची काळजी Esakal
Residential

घराची काळजी घेणं महत्वाचं ; Monsoon पूर्वी करून घ्या तयारी

पावसाळ्याचा त्रास जाणवू नये, म्हणून काही गोष्टींची दखल प्रत्यक्ष मॉन्सूनला सुरवात होण्यापूर्वीच घेतली पाहिजे. प्रत्यक्ष पावसाळ्यात घराच्या नूतनीकरणाची किंवा रंगकामाची, दुरुस्तीची अशी कोणतीच कामे करायला घेऊ नये

सकाळ डिजिटल टीम

ग्रीष्माच्या तप्त झळांनंतर पावसाच्या शिडकाव्यासाठी Monsoon Rains आपण सगळेच आसुसलेले असतो. पावसाळ्याचे स्वागत त्यामुळे जोरदार होते. मात्र, चार महिने तळ ठोकून बसणाऱ्या या ऋतूच्या Season स्वागताची तयारीही केली पाहिजे. Monsoon Arriving Take care of your Home

पावसाळ्याचा हंगाम घराच्या सुरक्षेच्या Security दृष्टीने कटकटीचा असतो. या काळातच घराची Home अधिक काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात Monsoon भिंतींना ओल येणे, छतावरून पाणी गळणे, दारे फुगणे, खिडक्या, दरवाजांच्या फटी रुंदावून त्यामधून कीटकांना आयतीच जागा मिळते. त्यामुळे पावसाचे स्वागत करताना घराचीही काळजी घेतली पाहिजे.

पावसाळ्याचा त्रास जाणवू नये, म्हणून काही गोष्टींची दखल प्रत्यक्ष मॉन्सूनला सुरवात होण्यापूर्वीच घेतली पाहिजे. प्रत्यक्ष पावसाळ्यात घराच्या नूतनीकरणाची किंवा रंगकामाची, दुरुस्तीची अशी कोणतीच कामे करायला घेऊ नये. म्हणूनच पावसाळ्यापूर्वीचे हे दिवस घराकडे नीट लक्ष देऊन आवश्यक त्या दुरुस्त्या करून घेण्याचे आहेत.

खिडक्यांची दारे आणि इतर ठिकाणांमधून पाणी आत यायची शक्यता आहे का, हे मॉन्सूनपूर्व जोरदार पावसाच्या सरींनी लक्षात आणून दिले असेलच. या पाणी गळण्याच्या ठिकाणांचा तातडीने शोध घेऊन खिडक्यांच्या फटी एमसील किंवा तत्सम पेस्टने भरून घ्याव्यात. फुटलेल्या काचा तातडीने बसवून घ्याव्यात.

गच्चीवरच्या किंवा छतावरचे पाणी वाहून नेणारे नळे साफ करावेत. ते शक्यतो बाहेरच्या भिंतींपासून दूर असावेत. म्हणजे छतावर पाणी साठून राहणार नाही. भिंतींना ओल येत असल्याचे लक्षात आले, तर तातडीने गळती शोधून त्यावर व्यावसायिकांकडून दुरुस्ती करून घ्यावी. छताला वॉटरप्रूफ करून घ्यावे. या काळात भिंतींवर सतत पाण्याचा मारा होत असल्याचे रंग उडतो आणि भिंतीचे पोपडे पडतात.

त्यामुळे घरातील भिंतींचा पाण्याची कमीत कमी संबंध येईल, याची काळजी घ्यावी. गच्चीवर बाग असणाऱ्यांनी या ऋतूमध्ये विशेष काळजी घेतली पाहिजे. हार्डवूडची फ्लोअरिंग असेल, तर ते ओलसर राहणार नाही, याची काळजी घ्यावी. मेणाचा थर देऊन त्याचे संरक्षण करता येईल. पावसाळ्यातील मोठी समस्या म्हणजे घरात साठून राहणारा दमटपणा. घरात मोकळी हवा खेळत नसेल, तर एक प्रकारचा कुबट वास भरून राहतो. त्यासाठी नैसर्गिक व्हॉटलेशन आवश्यक आहे.

हे देखिल वाचा-

या काळात कार्पेट, गालिचे ओलसर राहतात. त्यामुळेही त्रास होतो. चॉल टू वॉल कार्पेट असेल, तर व्हॅक्यूम क्लिनरने त्यातील ओल काढून घ्यावी किंवा मुळात ओलसर होणारच नाही, हे बघावे. म्हणजे घरात कुबटपणा जाणवणार नाही. घराची स्वच्छता, घर शक्य तितके कोरडे राखण्याचा प्रयत्न आणि ओल येऊ न देण्याची उपाययोजना केली की हा पावसाळा तुमचे घर छान एंजॉय करू शकेल.

पावसाळ्यापूर्वी घराची काळजी घ्यायच्या काही टिप्स:  

१. घराच्या नूतनीकरणाचे किंवा किरकोळ दुरुस्त्यांचे, फर्निचरचे काम पावसाळ्यापूर्वीच उरकून घ्यावे.

२.  ऐन पावसाळ्यात रंगकाम करू नये. वातावरण दमट असल्याने रंग लवकर वाळत नाही.

३. पाणी साठून राहणारी गच्चीवरील किंवा छतावरील ठिकाणे पहिल्या पावसानंतरच हेरून त्यावर उपाययोजना करावी.

४. गच्चीवर किंवा छतावर असणारा पालापाचोळा, कचरा साफ करावा, म्हणजे पाण्याचा निचरा होऊ शकेल आणि पाणी साठून राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT