पुणे शहर घर खरेदीचं हाॅट डेस्टिनेशन Esakal
Residential

Pune घर खरेदीसाठी Hot डेस्टिनेशन

वैद्यकीय पर्यटन, ऐतिहासिक ठिकाण, सांस्कृतिक राजधानी म्हणून देखील पुणे शहर स्थलांतरासाठी प्राधान्य क्रमावर असते त्याची दखल आज घेतली जाते वरील सर्व कारणांमुळे स्थलांतरित नागरिकांचा ओघ सुरूच आहे

नरेंद्र जोशी

देशभरातील इतर महानगरातील बांधकाम क्षेत्राची परिस्थिती पाहता पुणे शहरात मात्र घरांना मोठी मागणी आहे. आवाक्यातील घरांची उपलब्धता करून दिल्यास पुण्यातील चोखंदळ ग्राहक त्याला प्रतिसाद देताना दिसतो. Real Estate Info in Marathi Pune Hot Destination of Home buying

शहरातील अर्थव्यवस्थेच्या घडीचा विचार केला तर पुणे शहरातील Pune City आर्थिक उलाढालीचा, ग्रोथ इंजिन्सचा विचार केला तर, पुणे शहर कोण्याही एका क्षेत्रावर अवलंबून नाही. केवळ शिक्षण Education नाही, केवळ रोजगार क्षेत्र नाही ना केवळ ऑटो उद्योग Auto Industry नाही.

शिक्षण, ऑटो, आयटी, आयटीज्, बीटी, रोजगाराची केंद्रे, ही पुण्याची ग्रोथ इंजिन्स आहेत. ही क्षेत्रे पुणे शहराची पुण्यातील आर्थिक घडी, तिची व्यवस्था अबाधित राखण्याचे कार्य करतात.
शिक्षण व ऑटो प्रमुख दोन क्षेत्राचा विचार केला तर पुणे शहरातच २५ हून  अधिक विद्यापीठे आहेत.

त्यामुळे देशी व परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही लाखांच्या घरात आहेत. ऑटो क्षेत्राची दखल घेतली तर सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाहन कंपन्यांची उत्पादन केंद्रे पुणे शहर परिसरात आहेत. त्यामुळे रोजगाराचा आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची उपलब्धता ही पुरेशा प्रमाणात असलेली दिसते.

एवढेच नव्हे तर याच्या जोडीला वैद्यकीय पर्यटन, ऐतिहासिक ठिकाण, सांस्कृतिक राजधानी म्हणून देखील पुणे शहर स्थलांतरासाठी प्राधान्य क्रमावर असते त्याची दखल आज घेतली जाते वरील सर्व कारणांमुळे स्थलांतरित नागरिकांचा ओघ सुरूच आहे. या स्थलांतरित नागरिकांची गरजच मागणी आणि पुरवठ्यात अंतर निर्माण करते. घरांच्या किंमती आवाक्यात नाहीत ही बाब मान्य आहे.

पण घरांच्या किमती मागणी आणि पुरवठ्याच्या नियमांसोबत इतर कारणे परिणाम करतात... याचीही विचार व्हायला हवा. देशी अर्थव्यवस्थेची कामगिरी दिवसागणिक खराब होत असली तरी जागतिक आर्थिक परिस्थिती मात्र काही अंशी सुधारताना दिसते आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील आयटी कंपन्यांना चांगल्या पद्धतीचे व लक्षणीय संख्येने प्रकल्प निर्यात करताना दिसत आहेत. म्हणजेच पुण्यातील आयटी कंपन्या व त्याच्या आर्थिक उलाढालीवर देशी अर्थव्यवस्थेचा म्हणावा तसा थेट परिणाम होताना दिसत नाही.

आयटी क्षेत्राची कामगिरी
आयटी मधील काम करणारे तरूणांना कमी वयात अधिक चांगले वेतन हाती येते. त्यामुळे या तरूणांचे करिअर इतर शहरातील तरूणांच्या तुलनेने या शहरातच अधिक लवकर सेट झालेले दिसतात. त्यामुळे देखील याचा परिणाम घरांच्या मागणीवर होताना दिसतो. मुंबई शहराशी असलेली पुण्याची जवळीकता हा पुणे शहरासाठीचा सर्वात मोठा प्लसपॉंईंट आहे. या भौगोलिक स्थितीचा आणि वेगवान अशा एक्सप्रेस वेचा खुप मोठा फायदा पुणे शहराला लाभला आहे.
तसेच कोरोना परिस्थितीनंतर वर्क फ्रॉम होमचा विचार करता आयटीयन्सचा घरी चांगल्या व गुणवत्तापूर्ण सुविधा हव्या आहेत. त्याचा प्राधान्याने विचार करून आयटीमधील तरूण मंडळी हक्काचे स्वतःचे मोठे घर घेण्यासाठी प्राधान्य देताना दिसतात.

हे देखिल वाचा-

विकास योजना मार्गी
विकास योजनाच्या मार्गावर पुणे शहराने घेतलेली आघाडी सुद्धा लक्षणीय अशी आहे. रिंगरोड, मेट्रो प्रकल्प, विमानतळाचा विस्तार, नवी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी गतीने होत असलेले प्रयत्न, पीएमआरडीएच्या विकास आराखडा व त्या अंतर्गत असलेल्या विकास योजनांना होत असलेली सुरवात या व अशा विकास कामात मोलाची भर पडते आहे. हे काही प्रकल्प प्राथमिक अवस्थेत असले तरी याचा फायदा शहर विस्तारासाठी व इथल्या भविष्यातील विकास नियोजनात होताना दिसणार आहे.

हे देखिल वाचा-

अपेक्षा विकासाच्या वाटेवरच्या
विकास योजनांच्या बाबतीत विचार करताना आणखी काही अपेक्षा आहेत. त्या मार्गी लागल्यास कोणत्याही आर्थिक वा इतर आव्हानात्मक परिस्थितीचा फारसा परिणाम होताना दिसणार नाही. असे बांधकाम व आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

ज्यामध्ये, पीएमआरडीएचा विकास आराखडा, बांधकामांच्या मंजरीकरिता प्रशासकीय पातळीवरील गतिमानता, वाहतूकीच्या समस्यांवर तोडगा निघून सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणे, शहराचा हॉरिझाँटल (आडव्या) विकासापेक्षा व्हर्टिकल (उभ्या) विकासासाठी प्रयत्न करणे या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्नांचा एक परिपाक म्हणून पायाभूत सुविधांच्या विकासावर धोरणकर्त्यांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

शहर वाढीचा विचार केला तर यात जुन्या सोसायट्यांचा व पेठांमधील वाड्याच्या पुनर्विकासाचा मुद्दा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. या यासंबंधाने असलेल्या विविध अडचणींच्या मुद्यांचा सकारात्मक विचार करून धोरणकर्त्यांनी धोरणांची आखणी केल्यास ते शहर विकासाच्या हिताचे ठरले.

सध्याच्या काळा सामान्य घर खरेदीराचे स्वप्न देखील पूर्ण होण्यासाठी उपयुक्त असा काळ आहे. त्याअनुषंगाने घर खरेदीदाराने देखील यात सकारात्मक पाऊले उचलीत निर्णय घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT