Vastu Tips esakal
Residential

Vastu Tips : पोळ्या बनवण्याआधी करा या सोप्या गोष्टी, बरसेल लक्ष्मीकृपा

वास्तूशास्त्रात सांगितलेले तव्याचे नियम पाळले तर पैशाची कमतरता भासणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

Rules to keep Tawa in the kitchen : वास्तूशास्त्रात घरातल्या सर्व प्रमुख वस्तूंचा वापर आणि ते ठेवण्याची पद्धत याविषयी काही खास नियम सांगण्यात आले आहेत. यात काही नियम पोळ्या बनवण्याच्या तव्याविषयीदेखील सांगण्यात आले आहेत. प्रत्येकच घरात रोज पोळ्या बनतात, तव्याचा वापर होत असतो. जर या संदर्भात काही नियम पाळलेत तर घर कायम धन-धान्याने भरलेले राहील. लक्ष्मी देवीची कृपा बरसेल. शिवाय तवा ठेवण्याच्या अयोग्य पद्धतीने निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होतील.

श्रीमंत होण्यासाठी तव्याचा उपयोग

ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्रात तव्याविषयी सांगण्यात आलेल्या या उपायाने कायम लक्ष्मीची कृपा बरसते. यासाठी रोज पोळ्या बनवण्यापूर्वी तापलेल्या तव्यावर थोडंसं दूध शिंपडावे. यावर बनवलेली पहिली चपाती गायला खाऊ घालावी. असं केल्याने घर कायम धन-धान्याने भरलेलं राहील.

काही नियम

  • पोळ्या बनवून झाल्यावर तवा तसाच ठेवू नये. स्वच्छ करूनच ठेवावा. नाहीतर घरातल्या प्रमुख व्यक्तीच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.

  • विशेषतः रात्रीच्यावेळी तवा आणि कढई खरगटी ठेवू नये. राहु वाईट फळ देतो.

  • चपात्या बनवण्यापूर्वी गॅसवर ठेवलेल्या तव्यावर थोडं जास्त मीठ टाका. असं केल्याने वास्तू दोष दूर होतो.

  • नेहमी पहिली पोळी गायीला आणि शेवटची कुत्र्याला खाऊ घाला. असं केल्याने संकट टळतं आणि देवी देवतांची कृपा प्राप्त होते.

  • पोळ्या बनवून झाल्यावर तवा साफ करून अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणालाही दिसणार नाही. तवा लपवून ठेवायला हवा.

  • तवा नेहमी आडवा ठेवावा. उभा ठेवणं चांगलं समजलं जात नाही.

  • गरम तव्यावर पाणी टाकू नये. यातून निर्माण होणारा आवाज तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण करू शकतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT