Pune  Sakal
पुणे

गांजाची तस्करी करणाऱ्या ; सराईत गुन्हेगारास अटक

१० लाख १५ हजार ७७५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीस ठाण्यातील (Police Station) पोलीस पथकाने गांजाची (Ganja) तस्करी करणाऱ्या वाहनास (Car) पाठलाग करून चालकाला (Driver) अटक (Arrest) केली.आरोपींकडून (accused) ६ किलो ९१५ ग्रॅम गांजा व मोटार कार (Car) असा १० लाख १५ हजार ७७५ रुपये किंमतीचा (Prize) मुद्देमाल जप्त केला. जुन्नर न्यायालयाने (Junnar Court) आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी (Police cell) दिली आहे. आशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

या प्रकरणी दीपक बच्चू तामचिकर( राहणार धालेवाडी ता.जुन्नर ,जि. पुणे) याला अटक केली आहे. हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या पूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शना खाली सहायक पोलिस निरीक्षक ताटे,फौजदार रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार सुनील जावळे,प्रकाश वाघमारे, मुकुंद आयचीत , समाधान नाईकनवरे यांनी केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक येथील पुणे नाशिक महामार्गावर १६ ऑगस्ट २०२१ रोजी रात्र गस्त घालत असताना आरोपी दीपक तामचिकर हा रहदारीचे नियमाचे उल्लंघन करून भरधाव वेगाने मारुती सुझुकी विटारा ब्रिझा गाडी ( एम एच १२ जीएच ४१७३) घेऊन नाशिकच्या दिशेने निघाला होता.संशय आल्याने पोलीस पथकाने पाठलाग करून येथील हॉटेल गिरीजा जवळ मोटारीसह आरोपीला ताब्यात घेतले. झडती घेतली असता मोटारीत ६ किलो ९१५ ग्रॅम गांजा आढळून आला. मोटार व गांजा असा १० लाख १५ हजार ७७५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक करून आज जुन्नर न्यायालयात हजर केले.चौकशीत आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या पूर्वी तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ताटे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT