जुन्नर वनपरिक्षेत्रातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात हिंसक झालेले बिबटे पकडण्यात आले होते. या बिबट्यांवर माणिकडोह येथील बिबटे निवारा केंद्रात उपचार करण्यात आले. आता उपचारानंतर हे हिंसक बिबटे प्रकृती स्थिर झाल्यानंतर गुजरातला पाठविण्यात येणार आहेत.
उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यामुळे बिबटे आणि माणूस यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. या पार्श्वभूमीवर जुन्नर वनपरिक्षेत्रातील बिबट्यांना इतरत्र अभयारण्यात सोडण्याची मागणी होत होती. त्यामुळे आज पहिल्या टप्प्यात १० बिबटे गुजरातला रवाना होणार आहेत.
बिबट्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे पशुधन संकटात आले आहे आणि मानवांवरही हल्ले होत आहेत. या संघर्षात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. माजी खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत आवाज उठवला होता. यानंतर जुन्नरचे बिबटे गुजरातला पाठविण्याचा निर्णय झाला आहे.
जुन्नर वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १० बिबटे गुजरातमधील जामनगरच्या सेंट्रल झु-मध्ये स्थलांतरित केले जाणार आहेत. केंद्र सरकारने याबाबत परवानगी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी जुन्नर वन उपविभागाने महाराष्ट्र शासनाकडे बिबटे प्रजनन नियंत्रणाचा प्रस्ताव सादर केला होता.
जुन्नर वनविभागातील खेड, आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर येथे मानव आणि बिबट्यांचा संघर्ष वाढला आहे. बिबट्यांच्या प्रजननाचा वेग पाहता काही बिबटे गुजरातला हलवून आज कमी होणारी संख्या भविष्यात कधीतरी वाढणारच आहे. बिबटे प्रजनन नियंत्रण व राज्य आपत्ती क्षेत्र घोषित करणे हाच या समस्येवर शाश्वत उपाय असल्याचे कोल्हे यांनी म्हटले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.