बालेवाडी (पुणे) : रुग्णांना वेळेत आणि चांगले उपचार देण्याकरिता बालेवाडीत सध्या तब्बल 1000 खाटांच्या क्षमतेचं "आयसोलेशन सेंटर' उभारण्यात आलयं... तिथे "पॉझिटिव्ह' रुग्णांसाठी तर 325 खोल्या आहेत आणि संशयितांसाठी प्रशस्त हॉलमध्ये व्यवस्था उभारण्यात आलीय. म्हणजे, चकाचक खाटा, तिथेच स्वच्छ आणि पुरेसे स्वच्छतागृहे, शतपावली करण्यासाठी मोकळी जागा आहे. या सगळ्या सुविधा कोरोना बाधित रुग्ण आणि "क्वॉरंटाइन' केलेल्या नागरिकांना मिळणार आहेत.
कोरोना ग्रस्तांची वाढती आकडेवारी पाहता जर भविष्यामध्ये रुग्णांची संख्या अशीच वाढली तर पर्यायी व्यवस्था असणे गरजेचे असल्यामुळे, पुणे महानगर पालिकेकडून बालेवाडी-म्हाळुंगे येथील क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये सध्या शंभर खाटांची व्यवस्था केली असून, या ठिकाणची एकूण 3 वसतिगृहे, 5 हॉल रुग्णांसाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी 1000 रुग्णाची व्यवस्था करता येईल.
तेथे कोरोना पॉझिटिव्ह टेस्ट आलेले पण कोणतेही लक्षण नसणारे असे रुग्ण दहा दिवसांसाठी आयसोलेशन करण्यात येणार आहेत. त्यानंतर जर काही लक्षणे आढळली नाहीत तर त्यांना घरी क्वारंटाइन करण्यात येणार आहे.
तसेच येथे महिलांसाठी व पुरुषांसाठी वेगवेगळी स्वच्छतागृहांची व्यवस्था असून, भरपूर मोकळी हवा, शतपावलीसाठी मोकळी जागा तसेच प्रत्येक 100 खाटांच्या मागे एक डॉक्टरांची टीम सज्ज असून, दोन बेडमध्ये एक पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडर ठेवले जाणार आहे. तसेच गरज भासल्यास रुग्णाची तब्येत बिघडली तर त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यासाठी ऍम्ब्युलन्सची ही व्यवस्था करण्यात येणार आहे.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा
आज या आयसोलेशन सेंटरची पाहणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, तसेच मनपा आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त (जनरल) रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त (विशेष ) शंतनू गोयल, सह आयुक्त कोथरूड संदीप कदम यांनी या ठिकाणी या सेंटरची पाहणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.