10th Board Result sakal
पुणे

10th Board Result : शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

पुणे: नुकत्याच लागलेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालात पुणे शहरासह उपनगरांतील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी भरीव यश संपादित केले. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण लक्षणीय असून, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह, पालकांकडून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

सुंदराबाई मराठे विद्यालय

खराडी येथील गेनबा सोपानराव मोझे संस्थेच्या सुंदराबाई मराठे विद्यालयातील शंभर टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. विद्यालयातील १८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १०२ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले. तर २६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण आहेत. विद्यालयातील यशराज खैरे (९७ टक्के), सत्यम बोराडे आणि महेंद्र चव्हाण (९५ टक्के), वेदश्री साबणकर (९४.८० टक्के), कृष्णा हरीजीवन (९४.६० टक्के), वैष्णवी धरम (९४.४० टक्के) गुण मिळाले आहेत. संस्थापक अध्यक्ष रामभाऊ मोझे, अलका पाटील, ज्ञानेश्वर मोझे, संजय सोमवंशी, पर्यवेक्षक सुनील वळसे यांनी मार्गदर्शन केले.

नारायणराव सणस विद्यालय

रयत शिक्षण संस्थेच्या धायरी येथील नारायणराव सणस विद्यालयातील ९९.७१ टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत यशस्वी ठरले आहेत. १३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण आहेत. विशेष प्राविण्य गटात ७६ विद्यार्थी, तर प्रथम श्रेणीत १२६ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. शिवांगी पवार (९४.६० टक्के), अंजली खोंडे (९३.८० टक्के), अनामिका गौंड (९३.२० टक्के) यांनी घवघवीत यश मिळविले. स्थानिक स्कूल कमिटीच्या सदस्या विभावरी सणस, संस्थेचे विभागीय अधिकारी किसनराव रत्नपारखी, सहायक विभागीय अधिकारी शंकर पवार, मुख्याध्यापक राजेंद्र देशपांडे, पर्यवेक्षिका सुवर्णा परदेशी यांनी मार्गदर्शन केले.

आरएमडी स्कूल, कोंढवा

कोंढवा येथील रसिकलाल एम. धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूलमधील शंभर टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. रेहान शेख (९४ टक्के), आकांक्षा जावीर (९१.२० टक्के), देवयानी आसगेकर (९१.२० टक्के), नीलाद्री दास (९०.४० टक्के) हे विद्यार्थी अव्वल ठरले आहेत. चेअरमन शोभा धारिवाल, अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, सचिव डॉ. अशोककुमार पगारिया, संचालक कुशलचंद बोरा, अविनाश कोठारी, मुख्याध्यापिका स्वाती बहुलेकर, उपमुख्याध्यापिका संध्या नाडगौडा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

भेकराईमाता विद्यालय

श्री शंभु महादेव देवस्थान ट्रस्टच्या फुरसुंगी येथील श्री भेकराईमाता माध्यमिक विद्यालयातील दहावीचे ९६.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील करण भोसले (९५.२० टक्के), प्रतीक क्षीरसागर (९४.८० टक्के), तनुजा घुले (९४.४० टक्के) यांनी अव्वलस्थान पटकाविले. संस्थेचे पदाधिकारी शिवाजीराव कामठे, राखी हरपळे पाटील, उत्तम कामठे, अमित हरपळे, सुनील रुकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील कामठे, उपमुख्याध्यापक रंजना जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘

सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल

पाषाण येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता दहावी-बारावीचे शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेच्या संस्थापिका स्वाती विनायक निम्हण, मुख्याध्यापिका स्वाती पवार, तसेच शाळेच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दांगट पाटील विद्यालय

वडगाव बुद्रुक येथील चंद्रकांत दांगट पाटील माध्यमिक विद्यालयातील ९० टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातील प्रथमेश खैराटे (८४.४० टक्के), गौरव नलगे (८२.६० टक्के), दीप्ती सपकाळ (८१.८० टक्के) यांनी शाळेत अव्वलस्थान पटकाविले आहे. संस्थेचे संचालक चिरंजीव विकास दांगट पाटील, मुख्याध्यापक मोहन तांबडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

रॉयल रोजेस स्कूल

चंद्रकांत यशवंत दांगट पाटील शिक्षण मंडळ संचलित रॉयल रोजेस इंग्लिश मीडियम स्कूल (वडगाव बुद्रुक) मधील दहावीचे १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सिद्धी मदने (९४ टक्के), मुस्कान यादव (८९ टक्के), आर्या नवले (८६ टक्के), मुस्कान यादव (८५ टक्के) यांनी अव्वलस्थान मिळविले. संस्थेचे संचालक चिरंजीव दांगट पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

एनसीएल ‘मॉडर्न’

मॉडर्न हायस्कूल इंग्रजी माध्यम एनसीएल शाळेतील १०० टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. तनिष्का पवार (९६.४० टक्के), प्रथम निंबळे (९६.२० टक्के), आर्या मानकर आणि अवनिश सोनोणे (९४.८० टक्के) या अव्वल ठरल्या आहेत.

संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सचिव प्रा. श्यामकांत देशमुख, सहसचिव डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाथा एन., पर्यवेक्षक वसंत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

बाबूराव फुले विद्यालय

नंदादीप एज्युकेशन सोसायटीच्या समाजभूषण बाबूराव फुले माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीतील ९८. ०३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सिद्धार्थ इगवे, सार्थक चोरगे, आयुष पाल हे अव्वल ठरले आहेत,

तर कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालयातील १०० टक्के विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. सानिका चोरगे, हेमंत बनसोडे, सानिका काते आणि समृद्धी चोरगे हे अव्वल ठरले आहेत. संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र कोठारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

गणेशखिंड मॉडर्न हायस्कूल

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या गणेशखिंड येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीचे १०० टक्के विद्यार्थी परीक्षेत यशस्वी झाले आहेत.

संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह श्यामकांत देशमुख, शाळा समितीचे अध्यक्ष दीपक मराठे, चित्तरंजन कांबळे, समन्वयक उद्धव खरे, प्राचार्या रोहिणी काळे, उपमुख्याध्यापिका सीमा कुळधरण, पर्यवेक्षक विजय पाचारणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

न्यू इंडिया स्कूल

कोथरूड येथील भुसारी कॉलनी येथील न्यू इंडिया स्कूलमधील दहावी-बारावीचे १०० टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यंदा २२२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यातील १९८ विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य श्रेणी मिळाली आहे, तर अंशुका पाठक (९९.४० टक्के), अवनी श्रीवास्तव (९८.८० टक्के), गौरी मागिरे (९८.६० टक्के) यांनी विद्यालयात अव्वलस्थान पटकाविले आहे. शाळेच्या संचालिका पूर्णा विद्वांस, मुख्याध्यापिका मानसी मारुलकर, पर्यवेक्षिका कीर्ती देशपांडे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

ज्ञानगंगा इंग्रजी माध्यमा

झील एज्युकेशन सोसायटीच्या हिंगणे येथील ज्ञानगंगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील दहावीचे १०० टक्के विद्यार्थी परीक्षेत यशस्वी झाले असून, शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राहिली. शाळेतील ३१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. शलाका मडगे (९९.६० टक्के), सबुरी मुजुमले आणि भक्ती मायदेव (९८.२० टक्के), जयवंत निरुती आणि समृद्धी साळुंके (९६.२० टक्के), हिंदवी भोसले (९६ टक्के), तसेच दिक्षा गांगुर्डे, तुषार जगनाडे आणि आदित्य थोपटे (९५. ८० टक्के) यांनी घवघवीत यश मिळविले आहे. संस्थेचे संस्थापक-संचालक एस. एम. काटकर, सचिव डॉ. जयेश काटकर, सल्लागार प्रदीप खांदवे, मुख्याध्यापिका एलिझाबेथ डेव्हिड, प्राचार्या अनुराधा निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT