वाघोली - नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ४९१ होर्डिंगपैकी ११ धोकादायक होर्डिंग हटविण्यात आली आहेत. याप्रकरणी कारवाई अद्याप सुरू आहे, अशी माहिती परवाना निरीक्षक गणेश भारती यांनी दिली.
महिनाभरात मुंबईसह पुण्यात सहा ठिकाणी होर्डिंग कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत १६ जणांचा बळी गेला तर ५० पेक्षा अधिक जखमी झाले. पुण्यात सुदैवाने केवळ तिघे जखमी झाले असून जीवितहानी टळली. वाहनांचे मात्र नुकसान झाले. वाघोलीत होर्डिंग दुर्घटनेत दोन कार व दुचाकींचे नुकसान झाले.
वाघोली वगळता अन्य दुर्घटनेत होर्डिंग मालकांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोलीतील होर्डिंग अधिकृत तसेच स्ट्रक्चरल ऑडीट केलेले होते. तरीही ते कोसळले मात्र केवळ नोटीस बजाविण्यात आली. गुन्हा दाखल झालेला नाही. या सर्व दुर्घटनांमुळे होर्डिंगचा विषय चांगलाच गाजला.
राज्य सरकारने अनधिकृत व धोकादायक होर्डिंग काढण्याचे आदेश दिले, तर पुणे महापालिका आयुक्तांनीही सात दिवसांत धोकादायक होर्डिंग काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्वेक्षण करून धोकादायक होर्डिंग हटविण्याचे काम सुरू आहे.
लोहगावमधील पाच तर वाघोली व खराडीमधील सहा असे ११ होर्डिंग हटविण्यात आले. अद्याप कारवाई सुरू आहे. सर्व होर्डिंगचे ‘स्ट्रक्चरल ऑडीट’ करावे अशी नागरीकांची मागणी आहे.
दरम्यान, जे होर्डिंग धोकादायक वाटतात, त्याबाबत नागरिकांनी संपर्क साधुन माहिती द्यावी. त्याची पाहणी करून ते हटविण्यात येईल, असे आवाहन परवाना निरीक्षक गणेश भारती यांनी केले आहे.
होर्डिंगचे सांगाडेच सांगाडे
सध्या वळवाचा पाऊस जोरदार वाऱ्यासह कोसळत आहे. या वाऱ्यामुळे होर्डिंगवर लावलेला फ्लेक्स फाटून कुठेही उडुन पडतो. बहुतांश ते विद्युत तारांवर पडतात. यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. यामुळे ते प्लेक्स कापड हटविण्याचा आदेश अधिकाऱ्यांनी दिल्याचे कळते. यामुळे सध्या सर्वत्र उभे असलेले होर्डींगचे सांगाडेच सांगाडे दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.