Ghodganga Sugar Factory Sakal
पुणे

Pune : रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा

कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू होऊन ११० उमेदवारांनी अर्ज दाखल

नितीन बारवकर

शिरूर : अतिवृष्टीच्या कारणास्तव स्थगित झालेल्या आणि पुढे न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या, तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूकीची प्रक्रिया ज्या टप्प्यावर थांबली त्याच टप्प्यापासून पुढे निवडणूक कार्यक्रम राबवावा, असा आदेश आज उच्च न्यायालयाने दिला.

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू होऊन ११० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, ३१ जुलै रोजी होणारी निवडणूक अतिवृष्टीच्या कारणास्तव राज्य सरकारने स्थगित केली होती. तीस सप्टेंबर नंतर या निवडणूका आहे त्या टप्प्यावरून पुढे घेण्याबाबत सरकारने सूचित केले होते.

त्यामुळे जिथे कार्यक्रम थांबला तिथून पुढे प्रक्रिया सप्टेंबरनंतर राबविली जाणार होती. या निवडणूकीसाठी उमेदवारी दाखल केलेल्यांना माघारीसाठी तीन दिवसांची मुदत बाकी होती. दरम्यान, या निवडणूकीसाठी शिरूर गटातून माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

निवडणूक स्थगितीदरम्यान, ११ ऑगस्टला त्यांचे निधन झाल्याने, निवडणूक प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार, या निवडणूकीचा नव्याने कार्यक्रम घेण्याचे सहकार खात्याने ठरविले होते. मात्र, यास कारखान्याच्या वतीने आक्षेप घेण्यात आला होता.

कोरोनामुळे मूळातच दोन वर्षे निवडणूका लांबल्या असल्याने आता पुन्हा पहिल्यापासून निवडणूक प्रक्रिया राबविल्यास त्यात वेळ व खर्चाचा अपव्यय होईल, असे कारखान्याकडून उच्च न्यायालयात सांगण्यात आले होते. त्यानूसार आज उच्च न्यायालयाने जिथे निवडणूका थांबल्या तिथूनच त्या घ्याव्यात असे आदेश दिले.

प्रत्यादेश रद्द झाल्याने जेथपर्यंत प्रक्रिया झाली होती, तेथून पुढे निवडणूकीची प्रक्रिया राबविली जाईल, असे घोडगंगा चे निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी सांगितले. उर्वरित प्रक्रियेचा फेर निवडणूक कार्यक्रम तयार करून तो निवडणूक प्राधिकरणाला सादर केला जाईल व त्यांच्या मान्यतेनंतर उर्वरित काळासाठीचा कार्यक्रम जाहिर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

चौकट विद्यमान संचालक मंडळाला मूळात सात वर्षे झाली आहेत. त्यामुळे निवडणूका होण्याबाबत आम्ही आग्रही होतो. नव्याने प्रक्रियेचा घाट घालून निवडणूका पुढे ढकलण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता. मात्र, आमचा न्यायदेवतेवर विश्वास होता.

न्यायदेवतेने योग्य न्याय देताना विरोधकांच्या या अडथळ्यांना व कारवायांना जोरदार दणका दिला आहे. येनकेन प्रकारे निवडणूक कार्यक्रम लांबविण्याचा विरोधकांचा डाव उच्च न्यायालयाच्या निकालामुळे असफल ठरला आहे. फेरनिवडणूक कार्यक्रमातून सभासदांवरच खर्चाचा बोजा पडला असता, तो वाचला.

ॲड. अशोक पवार आमदार तथा अध्यक्ष,

रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रक्रियेदरम्यान, माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे निधन झाल्याने व ते या निवडणूकीतील महत्वाचे घटक असल्यानेच फेरनिवडणूक घेण्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ठरविले होते आणि ते रास्तही होते. मात्र, त्याविरोधात कारखान्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. परिस्थिती नसताना कारखान्याचा न्यायालयीन कामकाजावर मोठा खर्च झाला. त्यास जबाबदार कोण.

ॲड. सुरेश पलांडे माजी संचालक, घोडगंगा सहकारी साखर कारखाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT