जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.त्यामुळे मागील दीड-दोन महिन्यांपासून शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्याचबरोबर परीक्षासुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक संस्थांनी घरातून अभ्यास आणि कार्य ऑनलाईन पद्धतीने सुरू केले आहे. मात्र शालाबाह्य व वंचित घटक, ग्रामीण भागातील झोपडपट्टीतील दिवसा काम करून रात्रीच्या वेळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी या सेवेपासून दूर आहेत. ज्याठिकाणी ज्ञानाची गंगा पोहोचलेली नाही, त्याठिकाणी तंत्रज्ञान कोठून पोहचणार अशी अवस्था आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना बदलत्या अभ्यासक्रमाची माहिती होणे आवश्यक वाटते.
पारंपरिक शिक्षण व मूल्यमापन पद्धतीत बदल करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष-2018-19 इयत्ता 10 वी व इयत्ता बारावी 2020-21 पासून अभ्यासक्रम व मूल्यमापन पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या अभ्यासक्रमात भाषेसह शब्दसंपत्तीचा विकास, तंत्रज्ञानाचा वापर, चिकित्सक वृत्ती, निरीक्षण,निर्णयक्षमता, संवेदनशीलता, स्व-अध्ययन, नागरिकत्वाचे भान इत्यादी बाबींवर भर देण्यात आला आहे. पारंपरिक शिक्षण व मूल्यमापन पद्धतीत बदल करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने अनेक इयत्तांच्या अभ्यासक्रम व मूल्यमापन पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला. अर्थात यामागे शासनाची चांगली धोरणे व भूमिका आहे. प्रत्येक अभ्यासक्रम नव्या युगासाठी नागरिकत्वाची स्वप्ने घेऊनच येतो. इतर सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य बोर्डाचे विद्यार्थी मागे राहू नयेत, हा या बदलामागचा एक उद्देश आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना मिळेल, याचा विचार करून अभ्यासक्रमाचे स्वरूप ठरवले गेले आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक पाठाच्या खाली क्यूआर कोड देण्यात आला आहे. तो स्कॅन करून भरपूर माहिती मिळविता येते. डिजिटल अभ्यासक्रमाकडे केलेली ही कूच नक्कीच स्वागतार्ह आहे. क्यूआर कोडसोबतच विविध लिंक वेबसाइटही दिल्या आहेत. क्यूआर कोडच्या मदतीने सर्व विद्यार्थी इंटरनेटमुळे जोडले जाणार असले, तरी ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा असमान असतात हे लक्षात घेतले पाहिजे. अनेक गावांना वीजपुरवठा सुरळीत मिळत नाही, तर नेटवर्कचे कुठे घेऊन बसताय? क्यूआर कोडचा वापर करण्यासाठी स्मार्टफोन प्रत्येकाकडे असणे अनिवार्य आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
खेडोपाड्यातील सर्वच विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन असणे अशक्य आहे. ग्रामीणव व शहरी भागातील विद्यार्थ्यांचा आर्थिक स्तर असमान असणे साहजिकच आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थी इंटरनेटमुळे जोडले अशक्य आहे. किंबहुना क्यूआर कोड वापरण्याबाबतची मर्यादा येणे अपेक्षितच होते. मूल्यमापन प्रक्रियेमध्ये प्रश्नपत्रिकेचे (कृतिपत्रिका) स्वरूप बदलण्यात आले आहे. ते ज्ञानावर आधारित न ठेवता आकलनावर जास्त भर देण्यात आला आहे. दहावीच्या गणित, विज्ञान व इतरही विषयासाठी अंतर्गत गुणदानाची व्यवस्था आहे.शिवाय त्यांचे भाग-1 व भाग-2 असे दोन स्वतंत्र पेपर प्रत्येकी दोन-दोन तासांसाठी आहेत. मार्च-2010 दहावी परीक्षेचा निकाल इतर बोर्डाच्या तुलनेत कमी लागल्यामुळे मार्च 2020 मध्ये विद्यार्थ्यांना सर्व विषयांसाठी अंतर्गत गुण देण्यात आले आहेत, तर बारावी (कला, वाणिज्य, विज्ञान) फेब्रुवारी-2021 मध्ये सर्व विषयांसाठी अंतर्गत गुण देण्याचा निर्णय अद्यापही झालेला नाही.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
विद्यार्थ्यांमध्ये भाषाविषयक क्षमता विकसित करण्यासाठी उद्दिष्टांमध्ये भाषण संभाषण कौशल्याचा समावेश करण्यात आला आहे.शैक्षणिक वर्षात ते कौशल्य विद्यार्थ्यांने कितपत प्राप्त केले आहे, याचे मूल्यमापन करण्याकरिता तोंडी मूल्यमापनाची व्यवस्था आहे. एकंदरीत अभ्यासक्रम व मूल्यमापनातील बदल हा कालसुसंगत असायला हवा. शिक्षण प्रक्रियेतील सर्व घटकांनी तो बदल स्वीकारला की त्यातील चांगले पैलू आणि उणिवा यथावकाश समोर येऊ लागतात. बदलता अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धतीला सामोरे जाताना वरील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.
- अविनाश ताकवले (अभ्यासगट सदस्य-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ पुणे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.