बारामती - सन 2019 ते 2022 या चार वर्षांच्या काळात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व खालील बाजूस असलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-यांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. अनेक बंधा-यांचे भराव वाहून गेले, या पार्श्वभूमीवर क-हा, नीरा व इंद्रायणी नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या 43 पैकी 31 बंधा-यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने 136 कोटी 42 लाख रुपयांच्या प्रस्तावांना मंजूरी दिली असून लवकरच याची कामे सुरु होणार आहेत.
यामध्ये कऱ्हा नदीवरील 19, नीरा नदीवरील 11 बंधा-यांचा यात समावेश आहे. दगडी बांधकामातील जीर्ण झालेल्या स्तंभाचा उर्ध्व भाग, उंबरठा पातळी, सांडवी भिंत या ठिकाणीचे बांधकाम काढून त्या ठिकाणी सलोह संधानकाचे बांधकाम करणे, कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-यांच्या अधो व उर्ध्व बाजूस भिंतीचे काम करणे, माती व भराव पिचिंगचे काम, संरक्षक भिंत, दगडी अस्तरीकरण, बर्गे काढणे व बसविण्यासाठी लोखंडी खाचा बसविणे, कोल्हापूर पध्दतीच्या पारंपरिक द्वारांऐवजी नव्याने तयार करण्यात आलेले द्वार यंत्रणेद्वारे संचलित करणे, ढापे सुरक्षितपणे साठवून ठेवण्यासाठी ढापे साठवून ठेवण्याच्या जागेभोवती कुंपण करणे अशी कामे यात करण्यात येणार आहेत.
या बंधा-यांचा आहे समावेश
• बारामती तालुका - मेडद, नेपतवळण, क-हावागज, गुनवडी, फोंडवाडा, जळगाव कडेपठार, जळगाव सुपे, नीरावागज, सोनगाव, संगम, मुरुम, होळ, लाटे, कांबळेश्वर, कोऱ्हाळे खुर्द, शिरवली, अंजनगाव, बऱ्हाणपूर, फोंडवाडा जगताप वस्ती, काऱ्हाटी, काऱ्हाटी हायस्कूल, माळवाडी, आंबी जगताप वस्ती, आंबा माळवाडी, बाबुर्डी ढोपरेमळा, बाबुर्डी साळोबाडोह, मोरगाव, तरडोली,
• भोर तालुका- निघुटघर, आपटी, वडगाव, शिंद, भोर आरलॅब्ज
• पुरंदर तालुका- मांडकी
• इंदापूर तालुका - चिखली, वालचंदनगर, निरवांगीखलाल, निघोजे, जांब, कुरवली, निमसाखर, पिठेवाडी, बोराटवाडी, खोरोची
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.