Crime Against Women 
पुणे

Indapur Crime : हैवान कारकून! अतिप्रसंगाला विरोध केला म्हणून पाजलं कीटकनाशक; अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

Pune Latest Crime News: राज्याला हादरवून टाकणाऱ्या उरण हत्याकांडानंतर इंदापूर येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रोहित कणसे

राज्याला हादरवून टाकणाऱ्या उरण हत्याकांडानंतर इंदापूर येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शाळेतील कारकूनाने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर मुलीने प्रतिकार केल्यावर तिला कीटकनाशक पाजण्यात आलं. या पीडित १४ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे इंदापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील कारकूनाने इयत्ता ९वीत शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर तिच्या घरी जाऊन अतिप्रसंग करण्यात प्रयत्न केला. पीडितेने विरोध केला असता आरोपीने तिला कीटकनाशक पाजून बळजबरी केली. या घटनेनंतर मुलीवर अकलूजमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र या मुलीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आले असून त्याचे नाव रणजित असे सांगितले जात आहे. आरोपी रणजितने घरी येऊन अंगलगट करण्याचा प्रयत्न केला, बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यास आपण प्रतिकार केल्यानंतर त्याने कीटकनाशक पाजलं, अशी फिर्याद मुलीने दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र आता मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आरोपीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

उरणमध्ये काय झालं?

उरणमध्ये एक २० वर्षीय तरूणी बेपत्ता झाली होती. ती बेलापुरमध्ये एका सरकारी कंपनीत काम करायची. ती घरी परत न आल्याने वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरु केला होता. अखेर तिचा मृतदेह रेल्वेस्टेशन जवळ आढळून आला होता. त्यानंतर या प्रकरणातील प्रमुख आरोपी दाऊद शेखला मंगळवारी कर्नाटकच्या गुलबर्गा येथून अटक करण्यात आली होती. शेख याला आज मुंबईतील कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. त्यानंतर शेखला कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT