पुणे

‘भामा आसखेड’मध्ये १५ टक्के साठा शिल्लक

CD

आंबेठाण, ता. ८ : खेड, शिरूरसह पुणे शहराच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या भामा आसखेड (ता. खेड) धरणात शनिवारी (ता. ८) अवघा १५.५६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा जवळपास ११ टक्क्यांनी कमी असून मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात २६.४८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. चालू वर्षी धरण परिसरात १ जून पासून १४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मागील वर्षी धरण क्षेत्रात ८८४ मिमी पावसाची नोंद झाली होती.
धरणात सध्या एकूण पाणीसाठा हा १.६७ टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा हा १.१९ टीएमसी इतका आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात २६.४८ टक्के पाणीसाठा होता. धरणातून पुणे शहराच्या पूर्व भागासह तीर्थक्षेत्र आळंदीला पाणीपुरवठा केला जात आहे. या धरणातून पुढील काळात पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा सुरू होणार आहे. पिंपरी चिंचवड करिता भामा आसखेड धरणातून २.१४ टीएमसी पाणीसाठा देण्यात येणार आहे. अजून हे पाणी देणे सुरू झाले नसल्याने धरणात पाणीसाठा शिल्लक दिसत आहे.
पावसाचे आगमन होईपर्यंत आणि धरणात पुरेसा पाणीसाठा जमा होईपर्यंत पाणी जपून वापरावे असे आवाहन सहाय्यक अभियंता (श्रेणी १) आश्विन पवार, शाखा अभियंता नीलेश घारे-देशमुख, कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT