पुणे

बारामतीत पोलिस विभागाच्या कामांना 157 कोटींचा बूस्टर डोस

मिलिंद संगई

बारामती : येथील पोलिस विभागाला आता ख-या अर्थाने अच्छे दिन येणार आहेत. बारामतीनजिक ब-हाणपूर येथील पोलिस उपमुख्यालयासाठी 142 कोटी 62 लाख तर येथील कारागृहाच्या बांधकामासाठी 14 कोटी 96 लाख रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 

बारामतीनजिक ब-हाणपूर येथे पुण्यातील पोलिस मुख्यालयावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने पोलिस उपमुख्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली होती. या साठी 220 कोटी 33 लाख रुपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबतचा प्रस्ताव दाखल झाला होता. 

मंत्रालय स्तरावर सुधारणा करुन या कामासाठी 142 कोटी 62 लाख रुपयांच्या खर्चाच्या अंदाजासह प्रस्तावास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यात प्रशासकीय इमारत, सायबर ट्रेनिंग सेंटर, कंट्रोल रुम, व्हीआयपी विश्रामगृह, प्रशिक्षण केंद्र, मुले व मुलींचे वसतिगृह, मल्टीपर्पज हॉल, क्लब हाऊस, बँडमिंटन हॉल, शॉपिंग सेंटर, वर्कशॉप, गोळीबार सराव केंद्र यासह फर्निचर, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते, क्रिडांगणाचा विकास, पार्किंग, लँडस्केपिंग या बाबींचा समावेश असेल. 

दुसरीकडे कारागृहाची रचना करतानाही पुरुष व महिला कैद्यांसाठी स्वतंत्र बराकी उभारण्यात येणार असून कुंपण, लँडस्केपिंगसह सीसीटीव्ही व इतर बाबींचा समावेश करण्यात येणार आहे. या कामासाठी 24 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते, त्या पैकी 14 कोटी 96 लाखांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Latest Marathi News Updates : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

Eknath Shinde: ...विरोध काँग्रेसला भोवणार , तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र विकसाच्या वाटेवर

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT