16 year girl fell into 40 feet empty tank fire brigade guard save her life pune news Sakal
पुणे

Pune : नशीब बलवत्तर, ४० फुट खोल टाकीत पडलेल्या मुलीचे वाचवले प्राण; अग्निशामक दलाच्या जवानांच्या प्रयत्नांना यश

रिकाम्या टाकीत १६ वर्षीय मुलगी अचानक पडली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोंढवा परिसरातील एनआयबीएम रस्ता...दोराबजी मॉलसमोर रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे ४० फुटांहून अधिक खोल असलेल्या रिकाम्या टाकीत सोमवारी रात्री १६ वर्षीय मुलगी अचानक पडली... पायाला आणि डोक्याला गंभीर मार लागल्याने गंभीर ती जखमी झाली होती. रात्री अंधारात काही दिसत नव्हते.

अशा परिस्थितीत अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करत मुलीला सुखरूप बाहेर काढत तिचे प्राण वाचवले.

दोरबजी मॉलसमोर मोकळ्या परिसरात पाण्याच्या मोठ्या तीन टाक्या बांधलेल्या आहेत. त्या सद्यःस्थितीत रिकाम्याच असून, त्यावर झाकण किंवा संरक्षक जाळी बसविण्यात आलेली नाही. या परिसरात लहान मुले-मुली खेळत असतात.

रात्री नऊच्या सुमारास कोंढवा परिसरातील बादशाहनगर येथील १६ वर्षीय मुलगी फोनवर बोलत होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या टाकीचा मुलीला अंदाज आला नाही आणि ती अचानक खोल रिकाम्या टाकीत पडली. खोल मोठ्या टाकीमध्ये पडल्याने ती गंभीर जखमी झाली होती. स्थानिकांकडून ही बाब कळताच कोंढवा येथील अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशामक दलाचे अधिकारी कैलास शिंदे स्वतः आणि जवान अनिकेत गोगावले सेफ्टी बेल्ट परिधान करत शिडी आणि दोरीच्या साह्याने खोल टाकीमध्ये उतरले. इतर जवान बाहेर थांबून त्यांना मदत करीत होते.

शिंदे यांनी मुलीला जखमी अवस्थेत पाहून नियंत्रण कक्षामार्फत रुग्णवाहिका आणि डॉक्टर बोलावण्यास सांगितले. त्यांनी लगेच मुलीला सेफ्टी बेल्ट लावून जाळीमध्ये सुरक्षित बसवून टाकीबाहेर पाठवण्यास सुरवात केली.

टाकीच्या वर असलेल्या जवानांनी मुलीला दोरीने सुरक्षित टाकीबाहेर काढले. तेथे उपस्थित डॉक्टरांनी तिच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करून तिला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. मुलीच्या पायांना व डोक्याला मार लागला आहे.

जखमी अवस्थेत जवानांनी वेळेत तिला सुरक्षित बाहेर काढले. अग्निशामक दलाच्या जवानांचे प्रयत्न आणि केवळ नशीब बलवत्तर म्हणून तिचे प्राण वाचले.

कोंढवा खुर्द येथील अग्निशामक दलाचे अधिकारी कैलास शिंदे, वाहनचालक दीपक कचरे, फायरमन मोहन सणस, रवि बारटक्के, अनिकेत गोगावले, संतोष माने, रामराज बागल यांनी मुलीला सुखरूप बाहेर काढत तिचे प्राण वाचवण्यास मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT