पुणे : कोरोनामुळे (corona) जिल्ह्यात एक हजार ६२० बालकांनी पालक गमावल्याचे ऑनलाइन (Online) पोर्टलवर झालेल्या नोंदणीवरून समोर आले आहे. अशा बालकांना सरकारी मदत, शैक्षणिक आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. (1620 homeless children in Corona pune )
दरम्यान, अशा बालकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधित यंत्रणांना दिले. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृतिदलाची बैठक झाली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी परम आनंद आदी या वेळी उपस्थित होते.
विधवांना योजनेचा लाभ
कोरोनामुळे पतीचे निधन झालेल्या विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात येत आहे. कोरोनामुळे एक पालक दगावलेल्या बालक आणि विधवा महिलांची नोंद वारसदार म्हणून लावण्यात येणार आहे. दहा वर्षांखालील ज्या बालकांचे दोन्ही पालक दगावले आहेत, अशा बालकांच्या पुनर्वसनासाठी पालकत्व आणि वारसा हक्क मिळवून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.