LED Lamp Sakal
पुणे

पुणे शहरात लागणार १८ कोटीचे एलईडी दिवे

शहरातील पोलवर आणि जुने आणि बंद असलेल्या दिव्यांऐवजी नव्याने एलईडी दिवे खरेदी करण्यासाठी १८ कोटी ३० लाख रुपयांचा खर्च स्थायी समितीने मान्य केला.

सकाळ वृत्तसेवा

शहरातील पोलवर आणि जुने आणि बंद असलेल्या दिव्यांऐवजी नव्याने एलईडी दिवे खरेदी करण्यासाठी १८ कोटी ३० लाख रुपयांचा खर्च स्थायी समितीने मान्य केला.

पुणे - पुणे महापालिकेच्या (pune Municipal) रस्त्यावर यापूर्वी टाटा कंपनीकडून ९० हजार एलईडी दिवे (LED Lamp) बसविल्याचे प्रकरण महापालिकेच्या अंगलट आल्यानंतर आता शासनाने नियुक्त केलेल्या कंपनीकडून एलईडी दिवे खरेदी करण्याचा निर्णय स्थायी समितीने (Standing Committee) घेतला आहे. यासाठी ईईएमएल कंपनीकडून १८ कोटी ३० लाख रुपये खर्च करून ४७ हजार ५४५ दिवे खरेदी केले जाणार आहेत. यामध्ये ही कंपनी केवळ दिवे पुरविणार असून, महापालिका स्वतःची यंत्रणा वापरून दिवे बसविणार आहे.

शहरात समाविष्ट झालेल्या समाविष्ट गावांसह संपूर्ण हद्दीत १ लाख ७७ हजार पथदिव्यांचे खांब आहेत. त्यावर १ लाख ९७ हजार ५७२ इतके पथदिवे आहेत. यासाठी दरवर्षी वीज बिलासाठी किमान ४५ कोटी रुपयांचा खर्च महापालिका करत आहे. ऊर्जा संवर्धनासाठी म्हणून एलईडी दिवे लावण्यासाठी महापालिकेने प्राधान्य दिले. २०१७ पूर्वी महापालिकेने टाटा कंपनीकडून एलईडी फिटींगसह स्काडा बेस फिटर बसविण्याचे काम करून घेतले. त्यामध्ये १२ वर्षाची देखभाल दुरुस्तीचे काम याच कंपनीकडे आहे. दरम्यान टाटा कंपनीने १ लाख ९५ हजार ५७२ पैकी ९० हजार ३२५ एलईडी दिवे १ हजार ५०० फिडर पिलर बसविले आहेत. त्यासाठी महापालिकेने आत्तापर्यंत सुमारे ८५ कोटी रुपये दिले आहेत. तर दरवर्षाला २४ कोटी रुपये द्यावे लागतात. या करारातील अटीशर्तींचे महापालिकेकडून पालन होऊ शकले नसल्याने आर्थिक भूर्दंड पडला होता, ईईएमएल कंपनीकडून दिवे घेताना काळजी घेण्यात आली आहे, असे विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले.

शहरातील पोलवर आणि जुने आणि बंद असलेल्या दिव्यांऐवजी नव्याने एलईडी दिवे खरेदी करण्यासाठी १८ कोटी ३० लाख रुपयांचा खर्च स्थायी समितीने मान्य केला. यामध्ये सहा प्रकारचे ४७ हजार ५४५ दिवे विकत घेतले जाणार आहेत. हे दिवे महापालिकेला मिळाल्यानंतर महापालिकेचे कर्मचारीच दिवे लावणार आहेत. पाच वर्षाच्या आत दिवे खराब झाले तर ते कंपनीकडून बदलून दिले जाणार आहेत, असे कंदुल यांनी सांगितले.

‘केंद्र शासनाच्या धोरणानुसार शहरातील रस्त्यांवर पर्यावरणपूरक एलईडी दिवे बसविण्याचे धोरण आहे. त्यासाठी शासनाने अधिकृत केलेल्या ईईएमएल कंपनीकडून ४७ हजार ७३५ एलईडी पथदिवे खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी १८ कोट ३० लाख रुपयांच्या निधीला स्थायी समितीने मान्यता दिली.’

- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT