पुणे - शासनाकडून कोव्हीशील्ड (Covishield) व कोव्हॅक्सीन (Covaxin) लसीचे डोस (Vaccination Dose) उपलब्ध झाल्याने महापालिकेने (Municipal) उद्या (शनिवारी) १८५ केंद्रांवर लसीकरण (Vaccination) सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक केंद्रावर १०० डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिका (Municipal) प्रशासनाने दिली आहे. तसेच १५ ठिकाणी ३० ते ४४ वयोगटासाठी लसीकरण केले जाईल. (185 Places Vaccination in Pune City)
शासनाकडून महापालिकेला गुरुवारी कोव्हीशील्डचे ३० हजार उपलब्ध झाले आहेत. त्याद्वारे शुक्रवारसाठी महापालिकेने लसीकरणाचे नियोजन केले आहे. यामध्ये १७० केंद्रावर कोव्हिशिल्ड तर १५ केंद्रावर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहे.
कोव्हीशील्डचा पहिला डोस २७ मार्चपूर्वी घेतला आहे अशा ४५ वयाच्या पुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी ४० टक्के राखीव आहे. ४० टक्के लस ही ४५च्या पुढील आॅनलाईन बुकिंग केलेल्या नागरिकांच्या पहिल्या डोससाठी आहे. तर २० टक्के लस फ्रंटलाइन कर्मचारी व इतर नागरिकांसाठी असणार आहे. तर २१ मे पूर्वी पहिला डोस घेतलेल्या १८ वयाच्या पुढील सर्वांना कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळेल. ४० टक्के लस थेट केंद्रावर येणाऱ्या नागरिकांसाठी राखीव. ६० टक्के लस आॅनलाइन बुकिंगद्वारे उपलब्ध अाहे.
शहरात १६ हजार लसीकरण
शहरात महापालिकेने १८६ केंद्रांवर लसीकरण मोहिम घेतली. तर खासगी रुग्णालयात देखील लसीकरण सुरू आहे. दिवसभरात १५ हजार ९०० जणांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील ११ हजार २३३ जणांनी लस घेतली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.