वाघोली - जमिनीच्या सातबाऱ्यावर इतर हक्कात एका कंपनीची नोंद असताना व विक्रीस बंदी असताना त्या जमिनीतील प्लॉट विकून सुमारे दोन कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोही पार्क नावाने वाघोलीत प्लॉट विक्री करण्यात आली.
याबाबत दीपक आसाराम पळसकर ( वय ३४, रा. वाघोली ) इतर १८ जणांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंदकांत रामचंद्र सांगलीकर ( वय ५६, रा. पुणे ), योगेश बाळासाहेब कटके ( वय ४० रा. वाघोली ) व सुखदेव सुरेश गावडे ( रा. वाघोली ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पळसकर व अन्य १८ जणांनी २०२१ मध्ये आरोही पार्क मध्ये जमीन खरेदी केली. त्यावेळी सांगलीकर यांच्या नावे सातबारा होता. त्यांनी यांना खरेदी खतही करून दिले. मात्र सातबारा उताऱ्यावर त्यांची नोंद झाली नाही. ही नोंद व्हावी यासाठी प्लॉटधारक दोन वर्ष पाठपुरवठा करत होते. मात्र दोन वर्षात नोंद झाली नाही.
पळसकर यांनी ७ जुलै २०२३ रोजी ऑनलाईन सातबारा व फेरफार काढला असता त्यावर इतर हककत न्यायमूर्ती लोढा समितीच्या अहवालानुसार पी ए सी एल कंपनीची नोंद आढळुन आली. समितीच्या निकालानुसार ही नोंद करण्यात आली.
हे कळल्यानंतर प्लॉटधारकांनी कटके व गावडे यांच्या निदर्शनास हे आणून दिले. त्यांनी सांगलीकर यांच्याशी प्लॉट धारकांची भेट घडवून दिली. मी ती नोंद काढून देतो अशी उडवाउडवीची उत्तरे सांगलीकर यांनी प्लॉट धारकांना दिले.
त्यांनी सांगलीकर यांच्या नावे धनादेशाद्वारे रक्कम दिली होती. नोंद निघत नाही व सातबारा ही होत नाही असे लक्षात आल्यावर प्लॉटधारकांनी पोलिसात धाव घेऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.