mla benke sakal
पुणे

Pune : बिबट सफारी सह शासकीय कार्यालय उभारणीसाठी 120 कोटी रुपयांचा निधी मंजूर

आमदार बेनके यांची माहिती

रवींद्र पाटे ः सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव,जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे बिबट सफारी उभारण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी 80 कोटी रुपयांचा, तसेच जुन्नर येथे तहसील,भूमापन, पोलीस स्टेशन व इतर शासकीय कार्यालयाची सुसज्ज इमारत उभारण्यासाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या मुळे गेले अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या या विकास कामांना गती येणार आहे.उपमुख्यमंत्री पवार यांच्या माध्यमातून शुक्रवारी जुन्नर तालुक्याच्या विकास कामासाठी निधीच्या माध्यमातून 120 कोटी रुपयांची भेट दिली आहे.अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

आमदार बेनके म्हणाले सन 2016-2017 दरम्यान आंबेगव्हाण येथे बिबट सफारीला मंजुरी मिळाली होती.मात्र बिबट सफारीचा डीपीआर झाला नसल्याने व प्रस्ताव परिपूर्ण नसल्याने बिबट सफारी बाबत पुढे काहीच हालचाल झाली नाही. मी आमदार झाल्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल ( डीपीआर) तयार करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. मधल्या काळात अनेक राजकीय घडामोडी झाल्या. त्यामुळे बिबट सफारीचा प्रश्न प्रलंबित होता.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्नरच्या बिबट सफारीसाठी  परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश वन विभागाला दिले होते.

तालुक्यातील आंबेगव्हाण येथे बिबट सफारी उभारण्याचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आल्या नंतर बिबट सफारी निधीच्या प्रतीक्षेत होती. निधीसाठी माझा पाठपुरावा सुरू होता. उपमुख्यमंत्री पवार यांनी बिबट सफारीसाठी 80 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने पुढील काळात या कामाला गती येणार आहे. जुन्नर येथील महसूल, पोलीस स्टेशन व इतर शासकीय कार्यालया साठी पुरेशी जागा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. धान्य गोडावूनच्या जागेत शासकीय कार्यालयाची इमारत उभारणीसाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

धान्य गोडाऊन अन्यत्र स्थलांतरित करण्यात येणार आहेत. धान्य गोडाऊन बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. जुन्नर येथील ऐतिहासिक वाड्याची पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली पुनरस्थापना करण्यात येणार आहे. या कामासाठी 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. ओतूर येथे पोलीस स्टेशनची अद्यावत इमारत उभारणीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी यापूर्वी मंजूर करण्यात आला आहे. पुढील दोन वर्षाच्या कालावधीत बिबट सफारीसह मंजूर विकास कामे पूर्ण होतील असा विश्वास आमदार बेनके यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT