pune porsche acciden esakal
पुणे

Porsche Accident Pune: पोर्शे अपघात प्रकरणी मोठी घडामोड! बाल न्याय मंडळाच्या दोन सदस्यांना...

Porsche Car Crash: बाल न्याय मंडळाने रस्ता सुरक्षेवर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यासह अत्यंत सौम्य अटींवर आरोपीला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर देशभरातून यावर संताप व्यक्त करण्यात येत होता.

आशुतोष मसगौंडे

पुणे पोर्शे क्रॅश प्रकरणातील अल्पवयीन आरोपींना जामीन देण्याच्या संदर्भात बाल न्याय मंडळाच्या दोन सदस्यांच्या अहवालात त्रुटी सापडल्या आहेत. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना येत्या चार ते पाच दिवसांत या नोटिशीला उत्तर द्यावे लागणार आहे.

पुण्यातील कल्याणीनगर येथे एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श कारने एका मोटारसायकलला धडक दिल्याने दोन आयटी व्यावसायिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बाल न्याय मंडळाने रस्ता सुरक्षेवर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यासह अत्यंत सौम्य अटींवर आरोपीला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर देशभरातून यावर संताप व्यक्त करण्यात येत होता.

“19 मे रोजी बाल हक्क न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला होता. हा जामीन मंजूर करताना सादर केलेल्य अहवालात गंभीर त्रृटी आढळल्या होत्या. यामध्ये जामीन मंजूर करण्याचा आदेश एका सदस्याने जारी केला होता तर त्यावर सही दुसऱ्या सदस्याने केली होती.

दोन सदस्यांकडून गैरवर्तन आणि नियम मोडले असल्याचे आढळून आले आहे आणि त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.

महिला व बाल विकास विभागाने नेमलेल्या समितीने यापूर्वीच दोन बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्यांचे जबाब नोंदवले आहेत.

राज्य सरकारने नियुक्त केलेल्या दोन सदस्यांची चौकशी करण्याचे काम या पाच सदस्यीय पथकाला देण्यात आले होते.

बाल न्याय मंडळामध्ये महिला व बाल विकास विभागाद्वारे नियुक्त केलेले दोन सदस्य आणि न्यायव्यवस्थेतील एका सदस्याचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT