पुणे : 'सोमेश्वर फाउंडेशन' पुणे आयोजित महाराष्ट्रातील हौशी गायक, कलाकारांसाठी 'पुणे आयडॉल' या स्पर्धेचे आयोजन (ता.८ ते १४) मे दरम्यान पुण्यात केले आहे. सन २००२ दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली ही स्पर्धा यंदा विसाव्या वर्षी सोमेश्वर फाऊंडेशनच्या माध्यमातून माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण आयोजित करत आहेत.
प्रसिद्ध गायक रवींद्र साठे, प्रभा अत्रे, महेश काळे, शौनक अभिषेकी, वैशाली सामंत, राहुल देशपांडे अशा अनेक मान्यवरांनी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहून कलाकारांना मार्गदर्शन केले आहे. कोमल कृष्णा, सौरभ साळुंखे, तुषार रिठे, अशा अनेक स्पर्धेत यश मिळवलेल्या गायक कलाकार चित्रपट क्षेत्रात पार्श्वगायक म्हणून काम करत आहेत.
यंदाच्या स्पर्धेत परीक्षक म्हणून श्रीपाद सोलापूरकर, मेधा चांदवडकर, मंजुश्री ओक, राजेश दातार, सुभाष केसकर परीक्षक म्हणून सहभागी होणार असल्याचे गायक जितेंद्र भूरुक यांनी सांगितले. सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून वय वर्षे १५ पर्यंत लिटिल चॅम्प्स, १५ ते ३० युवा, ३० ते ५० जनरल व ५० च्या पुढील ओल्ड इज गोल्ड अशा चार वयोगटात ही स्पर्धा घेतली जाणार आहे.
प्रत्येक विभागात विजेत्यास १५ हजार व उपविजेत्यास १० हजार रोख रक्कम व सन्मानचिन्हे दिले जातील. सर्व गायकांना संगीत क्षेत्रातील उत्तम यश संपादित कलाकार संगीताची साथ देणार आहेत. विशेष सहभागी गायक कलाकारास उत्तेजनार्थ रोख बक्षिसे, वैद्यकीय तसेच शैक्षणिक खर्च फाउंडेशनच्या वतीने करणार असल्याचे संयोजक निम्हण यांनी सांगितले.
यंदाच्या या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे व गायिका सुवर्णा माटेगावकर यांच्या हस्ते दिनांक ९ मे रोजी सकाळी १० वाजता पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक हॉल, घोले रोड येथे होणार असून अंतिम फेरी १४ मे रोजी बालगंधर्व येथे होणार आहे. स्पर्धेचे फॉर्म ऑनलाइन पद्धतीने www.sunnynimhan.com वेबसाईट वरती तसेच शिवाजीनगर गावठाण, जंगली महाराज रोड येथे आजपासून नोंदणी सुरू झाली आहे. प्रवेश (ता.6) मे पर्यंत घेणे अनिवार्य राहील असे संयोजकांनी सांगितले. सोमेश्वर फाऊंडेशनचे बिपिन मोदी, उमेश वाघ, अमित मुरकुटे, अनिकेत कपोते आदी कार्यक्रमाचे नियोजन करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.