fraud  sakal
पुणे

Fraud News : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक

पुणे शहरातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील एका रॅकेटने तीन विद्यार्थ्यांची २२ लाख रुपयांची फसवणूक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील एका रॅकेटने तीन विद्यार्थ्यांची २२ लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार नुकताच उघडकीस आला.

याबाबत वेल्हे येथील एका २० वर्षीय तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सौरभ सुनील कोडग (वय २२, रा. जमीलनगर, मुंबई) आणि संतोष काशिनाथ पवार (वय ५०, रा. विरार, मुंबई) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाला एका वैद्यकीय महाविद्यालयात बीएएमएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा होता. त्याची आरोपी कोडग आणि पवार यांच्याशी ओळख झाली. आरोपींनी त्यांचा शैक्षणिक संस्थेशी कोणताही संबंध नसताना फिर्यादीकडून १३ लाख २० हजार रुपये घेतले. त्यानंतर तरुणाला प्रवेश मिळाल्याचे बनावट पत्र दिले.

त्यानंतर आरोपींनी एका तरुणीसह दोघांना हडपसर येथील एका आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेशाचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून आठ लाख ९० हजार रुपये उकळले. महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने फिर्यादीने आरोपींकडे पैसे परत मागितले. परंतु आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT