केसनंद(Pune) : सध्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना अद्ययावत उपचार मिळावेत, यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप विद्याधर कंद यांनी आपला वाढदिवस साजरा न करता पेरणे (ता. हवेली) येथील मेडिस्क्वेअर हॉस्पिटलला तीन व्हेंटीलेटरसह सुमारे २२ लाख ५० हजार रूपयांचे आधुनिक वैद्यकीय साहीत्य भेट दिले.(22 lakh help with 3 ventilators with money of Birthday Celebration)
ग्रामीण भागातील गंभीर कोरोना रुग्णांना शहरातही ऑक्सिजन तसेच व्हेंटीलेटर बेड मिळत नसल्याने अनेकांच्या प्राणावर बेतत आहे. ही परिस्थिती लक्षात घेवून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप विद्याधर कंद यांनी आपला आजचा आपला वाढदिवस साजरा न करता रुग्णांना अत्यावश्यक असलेले व्हेंटिलेटर बेड तसेच आवश्यक यंत्रणा स्थानिक पातळीवरील सुसज्ज रुग्णालयात देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पेरणे (ता. हवेली) येथील सुसज्ज अशा मेडीस्क्वेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला तीन व्हेंटिलेटरसह १० मॉनिटर, एक ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर, एक व्हेपोरायझर युनिट असा सुमारे २२ लाख ५० हजार रूपयांचे आधुनिक वैद्यकीय साहित्य वाढदिवसानिमित्त भेट दिले.
या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात कोविड सेंटरही सुरु करण्यात आले असून १०० पेक्षाही जा्स्त रूग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. मात्र पुरेशा व्हेंटीलेटर अभावी अत्यवस्थ रूग्णांवर उपचाराला मर्यादा येत होत्या. परंतू प्रदिप कंद यांनी केलेल्या या दातृत्वामुळे आता साधनसुविधा वाढल्या असून अनेक कोरोना रुग्णांवर स्थानिक पातळीवरच वेळेत उपचार होवू शकणार असल्याचे रुग्णालयाचे प्रमुख भाऊसाहेब कंद यांनी सांगितले.
''सध्या ग्रामीण भागातील अनेक रुग्ण केवळ ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर बेड अभावी दगावत असल्याच्या बातम्या वेदनादायक असून मानवतेच्या दृष्टीकोनातून अशा रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळालेच पाहिजेत. याच दृष्टीकोनातून पेरणे येथील मेडिस्क्वेअर हॉस्पिटलला आधुनिक तीन व्हेंटिलेटरसह आवश्यक वैद्यकीय साहित्य दिले आहे. अशा निकडीच्या प्रसंगी प्रत्येकानेच शक्य त्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे. तरच आपण या संकटातून बाहेर पडू, तसेच पुढे आनंदात वाढदिवसही साजरे करु. मात्र सध्या योग्य काळजी घेवून व नियम पाळून परस्परांना मदत करुया व कोरोनाला रोखूया.''
- प्रदिप कंद, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.