26th acharya atre marathi sahitya sammelan sant tukaram literature laxman gaikwad Sakal
पुणे

Pune News : संत तुकारामांचा वारसा साहित्यिकांनी पुढे न्यावा – लक्ष्मण गायकवाड

सासवडला २६व्या आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटना निमित्त कार्यक्रम

श्रीकृष्ण नेवसे

सासवड : स्वातंत्र्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू झाले. त्यांच्या काळात शिक्षण, कृषी, विज्ञान, आरोग्य, संरक्षण अशा विविध क्षेत्रात देशाने प्रगती केली. देवतांची मंदिरे उभारताना ज्ञान मंदिराच्या उभारणीकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले, म्हणूनच निधर्मवादी व पुरोगामी विचाराचा देश घडला.

दुर्दैवाने सध्याची परिस्थिती जातीवादाच्या बाजूने झुकलेली आहे. याचे दुःख वाटते. मानवतेला नवा आयाम देणारा संप्रदाय अजूनही निर्माण झाला पाहिजे. यासाठी संत तुकारामाचा वारसा पुढे नेण्याचे काम साहित्यिकांनी करावे., अशी अपेक्षा “उचल्या” कार ज्येष्ठ लेखक लक्ष्मण गायकवाड यांनी व्यक्त केली.

आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर,महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा व साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या २६ वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

२६ व्या आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन “रिंगाण” या कादंबरीला नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले कृष्णात खोत यांच्या हस्ते करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर येथील अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे यांनी भ्रमणध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या.

साहित्य संमेलनाचे उद्घाटक कृष्णात खोत म्हणाले की. मला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या “रिंगाण” कादंबरी मध्ये विस्थापितांचा आवाज मांडता आला आहे. सध्याचा काळ भयानक आहे. जेलर झोपला असून, कैदी एकमेकांवर नजर ठेवून आहे.

अशा विचित्र स्थितीमध्ये समाज आहे. साहित्यिकांनी आपल्या लिखाणातून चुकीचे काम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सुद्धा धाडसाने उभे राहिले पाहिजे. लेखकांचा आवाज हा बुद्धीचा असला पाहिजे. तो गांधीचा असला पाहिजे. असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकाच्या रूपाने विजय कोलते यांनी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान करीत असलेल्या साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन संमेलनाच्या रूपाने साहित्य , सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचे काम करीत असल्याचे सांगितले.

साहित्य संमेलनाच्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत स्वागताध्यक्ष बाळासाहेब भिंताडे यांनी केले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य दिनेश औटी, मणीभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता चव्हाण, जिल्हा परिषद माजी सदस्य सुदाम इंगळे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी मनोगते व्यक्त केली.

उद्घाटन समारंभाचे आभार साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष अण्णासाहेब खाडे यांनी केले. एकदिवसीय साहित्य संमेलनामध्ये कथाकथन, “मराठी आणि भारतीय भाषा एक अनुबंध” या विषयावर परिसंवाद, बालानंद मेळावा व कवी संमेलन हे कार्यक्रम संपन्न झाले.

प्रतिष्ठानचे सचिव शांताराम पोमण, सहसचिव बंडूकाका जगताप, महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेचे कार्यवाह वसंत ताकवले, डॉ.अरुण कोळेकर, संदीप टिळेकर, डॉ.जगदीश शेवते, दिलीप निरगुडे, शिवाजीराव घोगरे, प्राचार्य बालाजी नाटकरे इत्यादींनी संमेलन यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT