28 students of Vare Guruji Pass in NIOS board vk11 
पुणे

NIOS बोर्डात झळकले वारे गुरुजींचे २८ शिष्य

सकाळ वृत्तसेवा

शिक्रापूर - वाबळेवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) आंतरराष्ट्रीय शाळेच्या निमित्ताने चर्चेत असलेले तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे यांनी सन २०१२ मध्ये इयत्ता पहिलीत दाखल २८ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शिक्षण मंडळ, सीबीएसई वा तत्सम इतर प्रचलित बोर्डातून परीक्षेला न बसविता थेट एनआयओएस (National Institute of Open Schooling) या ओपन स्कूलींग संकल्पनेच्या बोर्डातून इयत्ता दहावी व बारावीला बसवून हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे.

एनआयओएस हा विद्यार्थ्यांच्या चतुरस्त्र विकासाचा, शैक्षणिक वर्षे वाचविणारा, स्वगतीने शिकण्याची संधी देणारा, पालकांचा शैक्षणिक खर्च बचत करणारा आणि प्रचलित शिक्षण पद्धतीला अनोखा पर्याय असल्याचे त्यांनी या निमित्ताने सिद्ध केल्याचा त्यांचा दावा आहे. अर्थात या पुढील काळात एनआयओएस बोर्डाच्या पर्यायाने मोठी शैक्षणिक क्रांती होणार असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.

सन २०१२ मध्ये जेमतेम ३२ पटाच्या वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातातली पाटी काढून टॅबलेट देणारे दत्तात्रेय वारे यांचे शिक्षणक्षेत्रात अनेक वेगवेगळे प्रयोग गेली दहा वर्षे सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून त्यांना राज्यसरकारने दर्जा दिल्यानंतर गेल्या वर्षभरात त्यांच्यावर अनेक आरोप, चौकशीचा ससेमिरा सुरू असताना त्यांचा शिक्षण-क्रांती ध्यास थांबला नसल्याचे २८ विद्यार्थ्यांच्या एनआयओएस बोर्डातून इयत्ता दहावी-बारावीच्या यशाच्या निमित्ताने दिसून आले.

आंतरराष्ट्रीय शाळेमुळे मिळालेली बारावीपर्यंतची सन २०१८ ची मान्यता नंतरच्या काळात रद्द झाल्याने आणि काही खासगी शिक्षण संस्थांनी या विद्यार्थ्यांना असहकार्य करण्याचे ठरविल्याने वारे यांनी पर्यायी शिक्षण बोर्डाचा शोध घेतला अन एनआयओएस हा पर्याय सापडताच गेली तीन वर्षे २८ विद्यार्थ्यांना रवी राठोड, कुणाल गाडेकर व संगीता कामठे या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने ओपन स्कूलींगचा पर्याय यशस्वी करून दाखविला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या अध्ययन गतीनुसार काही विद्यार्थ्यांनी प्रचलीत इयत्ता नववीत असताना दहावी तर काहींनी इयत्ता दहावीत असताना उत्तम गुणांनी बारावी उत्तीर्ण करून दाखविल्याने आपणच चकित झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

यशस्वी विद्यार्थी

इयत्ता दहावी : प्रियांशु जवळकर, सार्थक वाबळे, कुणाल वाबळे, ध्रुव यादव, अवधूत वाबळे, अभिषेक महानुर, पायल वाबळे, संस्कृती वाबळे, संस्कृती गवारे.

इयत्ता बारावी : अंजली बांगर, आशुतोष टेमगिरे, यशराज पचंगे, नीलेश घुंडरे, अंकुश राठोड, प्रतिक्षा वाबळे, सानिया शेख, सानिका वाबळे, प्रणाली मांढरे, साक्षी मासळकर, सिद्धी वाबळे, प्रणाली भोसुरे, गौरी काळे, प्रियंका पोतले, आदित्य शिवले, आदित्य वाबळे, अक्षदा टेमगिरे, प्रणव तांबे, अनन्या चातुर. (बारावीच्या मुलांनी बोर्डाच्या नियमाप्रमाणे यावर्षी पाच पैकी चार विषयांची परीक्षा दिली आहे पाचव्या विषयाची परीक्षा विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार देता येईल.)

एनआयओएसमुळे विद्यार्थ्यांना हे झाले साध्य

१. चार भारतीय व दोन परदेशी भाषा ज्ञान

२. अतिरिक्त संगणक ज्ञान

३. संगीत विशारद पदवीपर्यंतच्या परीक्षा

४. अध्ययन गतीनुसार किमान एक व कमाल दोन वर्षांची बचत

५. शैक्षणिक खर्चाची सुमारे ६० टक्के बचत

६. एनसीईआरटी समकक्ष अभ्यासक्रमाने NEET, JEE, परीक्षांची उत्तम तयारी

७. वाचन कौशल्ये, स्पर्धा परीक्षा कौशल्ये, परदेशी भाषा संवाद कौशल्ये विकसित

८. मागणीनुसार परीक्षा देण्याची सोय

असे असते बोर्डाचे स्वरूप

- महाराष्ट्र-सीबीएसई बोर्डांना शाळाबाह्य शिक्षणाचा एनसीईआरटी समकक्ष पर्याय

- एकूण ३३ विषयांचे पर्याय

- कुठल्याही शाळेत न जाता केवळ लर्निंग सेंटरमध्ये जाऊन थेट परीक्षा

- वर्षातून दोन परीक्षांचे पर्याय

- राज्य-देश-परदेश या स्तरांवर मान्यताप्राप्त बोर्ड

- जिल्ह्यातील १० सेंटर्सवर शास्त्र-प्रॅक्टिकल व लेखी परीक्षांची सेंटर्स

- कुठल्याही शाळेच्या दाखल्याची गरज नाही

- वयाची चौदा वर्षे पूर्ण असताना दहावी व पंधरा वर्षे पूर्ण असताना बारावीची परीक्षा देण्याची सोय

लॉकडाऊनमुळे शाळा पूर्णपणे बंद असताना विद्यार्थ्यांना घरच्या घरी पर्याय म्हणून एनआयओएस आम्हाला हाती लागले. त्यातच वाबळेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतच परवानगी नसताना कसे शिकविले जातेय, म्हणून माझी अन या सर्व विद्यार्थ्यांची चौकशी सुरू झाली अन हीच प्रेरणा आम्हाला एका पर्यायी शिक्षण बोर्डाची सुविधा शिक्षण-क्रांतीचा प्रयोग म्हणून हाती लागली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Track मेन्टेनन्स मशीनची समोरासमोर धडक; 5 कर्मचारी जखमी, देखभालीचं काम सुरू असताना घटना

IND W vs PAK W: ०.४४ सेकंद! Richa Ghosh ची भारी रिअ‍ॅक्शन, अविश्वसनीय झेल घेऊन पाकिस्तानला दाखवला इंगा

Bigg Boss Marathi 5 grand finale LIVE Updates - हे स्पर्धक ठरले 'बिग बॉस मराठी ५' चे टॉप ३? सोशल मीडियावर ट्वीट व्हायरल

Video : शाळेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी गायलं 'अयि गिरि नन्दिनी'; नेटकरी झाले मंत्रमुग्ध, येथे पाहा Viral Video

Latest Maharashtra News Updates: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत अकोले विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT