पुणे : पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांचा सव्वा लाखाचा तर रुग्णांच्या मृत्यूचा तीन हजारांचा आकडा रविवारी (ता.१६) रात्री क्रॉस झाला आहे. दरम्यान, कोरोनामुक्त रुग्णांचा आकडाही एक लाखाच्या जवळ गेला आहे.
आजअखेरपर्यंत एकूण १ लाख २५ हजार १९७ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी आतापर्यंत तीन हजार २२ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र मृत्यू झालेल्यांपैकी ८१ जण पुणे जिल्ह्याबाहेरील आहेत. दरम्यान, रविवार अखेरपर्यंत ९५ हजार ८६५ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सर्वाधिक कोरोना रुग्ण, कोरोनामुळे झालेले मृत्यू आणि कोरोनामुक्त झालेले रुग्ण हे पुणे शहरातील आहेत. आजपर्यंत पुणे शहरांत सर्वाधिक ७४ हजार ९८ नवे रुग्ण सापडले आहेत. यापैकी ५७ हजार ६५७ कोरोनामुक्त झाले असून १ हजार ८८६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या सात हजार ६९४ रुग्ण शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. याशिवाय सात हजार ८ जण गृह अलगीकरणमध्ये (होम आयसोलेशन) उपचार घेत आहेत.
पुणे जिल्ह्यातील एकूण १५ हजार ६१९ रुग्ण विविध रुग्णालयात, तर १० हजार ८२७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.
दरम्यान, रविवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात एकूण दोन हजार ८०० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्येही पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार ५२२ रुग्ण आहेत. याशिवाय पिंपरी चिंचवडमधील ९५०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २२४, नगरपालिका क्षेत्रातील ६५ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ३९ नव्या रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, फक्त रविवारी दिवसभरात २ हजार ३०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी शनिवारी (ता.१५) रात्री ९ वाजल्यापासून रविवारी (ता.१६) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.
जिल्ह्यातील क्षेत्रनिहाय रुग्ण (कंसात मृत्यूची संख्या) :
- पुणे शहर - ७४ हजार ९८ (१ हजार ८८६).
- पिंपरी चिंचवड - ३५ हजार ३९७ ( ६२४).
- जिल्हा परिषद - ९ हजार ९५६ ( २९९).
- नगरपालिका क्षेत्र - ३ हजार १९ (११५).
- कटक मंडळे - २ हजार ७२७ (९८).
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.