PMP 
पुणे

पीएमपीच्‍या प्रवाशांत तीन लाखांची

मंगेश कोळपकर

पुणे - पीएमपीच्या इतिहासात यंदाच्या एप्रिलमधील सोळा दिवसांत प्रवासी संख्या सात वेळा दहा लाखांपेक्षा कमी झाली आहे. त्यात तीन वेळा, तर नऊ लाखांपेक्षा कमी प्रवाशांनी पीएमपीचा वापर केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पीएमपीची दुरवस्था होत असल्याचे परिणाम प्रवाशांना भोगावे लागत असताना, सत्ताधाऱ्यांचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. 

पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी तुकाराम मुंढे असताना पीएमपीची प्रवासी संख्या बारा लाखांवर गेली होती. त्यानंतर ती संख्या साडेअकरा ते अकरा लाखांवर आली. आता ती दहा लाखांपेक्षाही कमी होताना दिसत आहे.

पीएमपीच्या २०५० पैकी दररोज १४५० बस मार्गावर धावतात, असा दावा प्रशासनाकडून केला जातो. प्रत्यक्षात ही बस संख्या १२६७ असल्याचे सोमवारी दिसून आले. मार्च २०१० मध्ये पीएमपीच्या ताफ्यात एकूण १६२० बस होत्या. मात्र त्या महिन्यात पीएमपीने तब्बल १२ लाख ८१ हजार प्रवाशांचा टप्पा ओलांडला होता.

नेमके कारण काय?
पीएमपीमध्ये वाहतूक, अभियांत्रिकी आदी विभागांत एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना विभागप्रमुख, महाव्यवस्थापक पदावर कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आले आहे. त्यांचा अनुभव आणि पीएमपीचे दैनंदिन कामकाज यामध्ये फरक पडत आहे. परिणामी, ते अधिकारी आणि पीएमपीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांत शीतयुद्ध सुरू आहे. त्याचा फटका पीएमपीच्या दैनंदिन कामकाजावर होत आहे. 

पीएमपीचे नियोजन ढासळले असून, कामकाजात बेशिस्तता वाढली आहे. ठेकेदार मुजोर झाले आहेत. बंद पडणाऱ्या बसची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक मार्गांवर एकामागे एक बसची रांग असते, तर त्याच मार्गावर अनेकदा बससाठी ३० ते ४५ मिनिटे थांबावे लागते.  
- जुगल राठी, पीएमपी प्रवासी मंच

प्रशासन म्हणते...
 बसच्या देखभाल दुरुस्तीमध्ये शैथिल्य आले आहे
 आयुर्मान संपलेल्या ३०० पेक्षा जास्त बस आहेत 
 गेल्या तीन-चार वर्षांपासून नव्या बस आलेल्‍या नाहीत 
 पीएमपी आणि ठेकेदारांच्या बंद बसची संख्या ६०० पेक्षा जास्त झाली आहे

अध्यक्षा महिन्याच्या रजेवर 
पीएमपीच्या अध्यक्षपदी आलेल्या नयना गुंडे यांनी महिनाभर काम केल्यावर त्या एका महिन्याच्या प्रशिक्षणासाठी रजेवर गेल्या आहेत. त्यामुळे पीएमपीच्या अध्यक्षपदाची सूत्रे पिंपरी- चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे आहेत. त्यांनी नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. परंतु उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचे दिसत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: हॉटेल मध्ये काय चाललं होतं? 5 कोटी वाटल्याच्या आरोपावर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया

Vinod Tawde : 'भाजपमधील बहुजन चेहरा संपविण्याचा हा डाव; गृहखात्याकडून तावडेंवर पाळत' राऊतांचा इशारा कोणाकडे?

IND vs AUS: अश्विनकडून शिकायला मिळते...! कसोटी मलिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या स्टार गोलंदाजाकडून कौतुकाचा वर्षाव

Pune drink and drive: दारूच्या नशेत स्कॉर्पिओने रिक्षाचालकाला उडवले, अल्पवयीन तरुणाचा प्रताप, पुण्यात कार प्रकरणाची पुनरावृत्ती

कर्नाटकातील काँग्रेस सरकार कोसळणार? सत्ता स्थापनेपासूनच 'ऑपरेशन कमळ'चे प्रयत्न, आमदारांचा मोठा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT