CNG-Bus sakal
पुणे

PMP CNG Bus L ‘पीएमपी’च्या ताफ्यात येणार ३०० ‘सीएनजी’ बस

‘पीएमपी’ स्वमालकीच्या १०० सीएनजी बस घेत आहे. शिवाय ३०० नवीन बस या भाडेतत्वावर घेत आहे. या आठवड्यात निविदा प्रक्रियेला होणार सुरुवात.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘पीएमपी’ स्वमालकीच्या १०० सीएनजी बस घेत आहे. शिवाय ३०० नवीन बस या भाडेतत्वावर घेत आहे. या आठवड्यात निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यात ३०० ‘सीएनजी’ व १०० इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. ‘सीएनजी’ बस दाखल होण्यास किमान तीन महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक बसला मात्र उशीर लागणार आहे. या १२ मीटर लांबीच्या बस असतील.

‘पीएमपी’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्वमालकीच्या १०० ‘सीएनजी’ बस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर २०० सीएनजी बस भाडेतत्वावर व १०० इलेक्ट्रिक बस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय झाला. ‘पीएमपी’त एकूण ४०० नव्या बस दाखल होणार आहेत. यामुळे ‘पीएमपी’ची सेवा सुधारण्यास मदत होणार आहे.

सध्या प्रवासी संख्येच्या तुलनेत बसची संख्या कमी आहे. त्यामुळे बसची उपलब्धता वाढविणे आता अपरिहार्य झाले आहे.

‘सीएनजी’वर भर अधिक

‘पीएमपी’ प्रशासनाने ‘सीएनजी’वर धावणाऱ्या बसची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ‘पीएमपी’च्या स्वमालकीच्या ९८१ बस आहेत, तर सात ठेकेदारांच्या मिळून १०९८ बस आहेत. नव्याने दाखल होणाऱ्या एकूण ४०० बस पैकी ३०० बस ‘सीएनजी’ आहेत, तर १०० इलेक्ट्रिक आहेत. ‘सीएनजी’वर होणारा खर्च हा इलेक्ट्रिक गाड्यांच्या तुलनेत कमी आहे.

दोन लाख प्रवाशांची सोय

‘सीएनजी’च्या एका बसमधून दिवसाला सरासरी ७३० प्रवाशांची वाहतूक होते. ३०० नव्या बस आल्यावर दिवसाला किमान दोन लाख १९ हजार प्रवाशांची वाहतूक होईल. यामुळे प्रवाशांची संख्या वाढेल. शिवाय विविध मार्गावरच्या बसमध्ये प्रवाशांना जागेअभावी उभे राहून प्रवास करावा लागतो. नव्या बसमुळे प्रवाशांची सोय होईल.

पीएमपी स्वमालकीच्या १०० सीएनजी बस घेत आहे. तर ३०० बस ठेकेदारांच्या असणार आहेत. या आठवड्यात निविदा प्रक्रियेला सुरवात होईल. तीन महिन्यांत ‘सीएनजी’ बस प्रवासी सेवेत दाखल होतील.

- नितीन नार्वेकर, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT