32 years old man died after a tree branch fell on his head in Pune  Esakal
पुणे

Pune News : पुण्यात टपरीवर चहा पीत थांबलेल्या तरुणाचा फांदी डोक्यात पडून मृत्यू; परिसरात हळहळ

पुणे शहरातील ओंकारेश्वर मंदिर परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घडली

रोहित कणसे

पुणे : पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काल अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकणी गारपीटसह पावसाने झोडपून काढल्याचे पाहयाला मिळाले. यामुले अनेक जिल्ह्यात पिकांचे नुकसान देखील झाले आहे. यादरम्यान पुणे शहरात झाडाखाली चहा पीत उभ्या तरुणाच्या डोक्यावर अचानक झाडाची फांदी कोसळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार. पुणे शहरातील ओंकारेश्वर मंदिर परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घडली. अभिजित गुंड (३२, रा. कसबा पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे.

अभिजित गुंड सायंकाळी चहा पिण्यासाठी ओंकारेश्वर मंदिर परिसराखाली असलेल्या टपरीवर आला. मित्रांसोबत चहा घेताना झाडावरून अचानक वाळलेली फांदी कोसळली. ही फांदी अभिजित याच्या डोक्यावर पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. याचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत. या अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान मृत्यू झालेल्या तरुणांच्या मित्रांनी विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालयाचे तसेच गार्डन विभागाचे अधिकारी या घटनेला जबाबदार आहेत, सर्व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Shami नाहीच; KL Rahulला अभय

Porsche Car Accident : डॉ. तावरेसह हाळनोरविरुद्ध फौजदारी खटला चालणार; राज्य सरकारकडून मंजुरी

South West Nagpur Assembly Election : विरोधकांसाठी आमच्या ‘लाडक्या बहिणी’च पुरेशा; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Imtiaz Jaleel: "ज्यानं मला पाडलं, त्याला पाडण्यासाठी मी काय करतो बघाच"; इम्तियाज जलील यांचा थेट इशारा

IND A vs AFG A : भारतीय संघाचे लोटांगण; अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत वाईट पद्धतीने हरवले

SCROLL FOR NEXT