325 per 10 kg market price of Onion growers are relieved market price of onion increasing esakal
पुणे

Onion Price : कांदा उत्पादकांना दिलासा! मंचरला कांद्याला प्रति 10 किलोला 325 रुपये बाजार भाव

कांद्याचे बाजार भाव वाढत असल्याने कांदा उत्पादकांना दिलासा

डी. के वळसे पाटील

मंचर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारी (ता. 13) कांद्याला प्रति दहा किलोला उच्चांकी 325 रुपये बाजारभाव आठवड्यात प्रति दहा किलोला 270 ते 280 रुपयापर्यंतच बाजार भाव मिळत होता.

कांद्याचे बाजार भाव वाढत असल्याने कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. अशीमाहिती मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव यांनी दिली. कृषि उत्पन्न बाजार समिती मंचर येथे आठवड्यातील रविवार, मंगळवार व गुरुवार या तीन दिवशी कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार शेतकऱ्यांच्या समक्ष लिलाव पद्धतीने होतात. नारोडी, गिरवली चास माळुंगे पडवळ, रांजणी लाखनगाव,

पोंदेवाडी, लांडेवाडी वडगाव काशिंबे तसेच शिरूर तालुक्यातील पिंपरखेड, पाबळ, खेड तालुक्यातील वापगाव वरुडे जवळके आधी गावातून येथे 25 हजार कांद्याच्या पिशव्यांची आवक झाली. दहा किलो गोळा कांद्याला 300 रुपये ते 325 रुपये,सुपर कांदा 250 रुपये ते 280 रुपये, गुलटी कांदा 120 रुपयेते 220 रुपये, बदला कांदा 50 रुपयेते 120 रुपयेअसा प्रतवारीनुसार बाजारभाव मिळाला आहे.

कांद्याच्या बाजारभावात वाढ होत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. मंचर बाजार आवारात खेड व शिरूर तालुक्यातून प्रामुख्याने कांद्याचे आवक होत असते. अधिक मास महिना संपल्याने व श्रावण महिना सुरू झाल्याने कांद्याच्या मागणीत वाढ झाली आहे. गेली अनेक महिने बाजार भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता.कांद्याचे बाजारभाव चढते राहण्याची शक्यता बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी व्यक्त केली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT