पुणे - कोरोनामुळे (Corona) देशात आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी जीव गमावले आहेत. विविध क्षेत्रांतील व्यक्तींबरोबर फ्रन्ट लाइन कर्मचाऱ्यांचाही त्यात समावेश आहे. न्याय व्यवस्थादेखील कोरोनाच्या विळख्यातून बचावली नसून गेल्या तीन महिन्यांत शहरातील पस्तीसहून अधिक वकिलांचा मृत्यू (Lawyer Death) झाला आहे. (35 lawyers killed in second wave of corona in Pune)
कोरोनामुळे विविध वयोगटांतील वकिलांचे मृत्यू झाले आहेत. शहरातील वेगवेगळ्या न्यायालयांत ते प्रॅक्टिस करत होते. मात्र, या वकिलांचे निधन झाल्याने त्याचा परिणाम न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांवर होणार आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वकिलांचे त्वरित लसीकरण करून द्यावे, अशी मागणी वकील संघटनांनी केली आहे. त्याबाबतचा पाठपुरावादेखील संघटनांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांत पस्तीसहून अधिक वकिलांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी ४० ते ४५ वकिलांना त्यांचा जीव गमवावा लागला. यामुळे न्यायव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने वकिलांचे लवकरात लवकर लसीकरण करून द्यावे.
- ॲड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.